VBA on Maha Vikas Aghadi : जाणीवपूर्वक हरणाऱ्या जागा आम्हाला द्यायच्या आणि उर्वरित वंचितच्या लक्षणीय मतदारांचा पाठींबा मिळवायचा हा हेतू महाविकास आघाडीतील घटक पक्षांचा आहे, असं मत वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी पत्राद्वारे मांडले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. शिवाय वंचितला किती जागा द्यायचा, यावरुनही महाविकास आघाडीमध्ये दोन गट पडल्याचे दिसून येत आहे. 


रेखा ठाकूर म्हणाल्या, महाविकास आघाडीत जागावाटपावरून आमचा अवमान होत आहे. जागावाटपात वंचित बहुजन आघाडीला अवघ्या 2 जागा दिल्याचा रेखा ठाकुर यांनी दिला आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेत फूट पडलेली आहे तर कांग्रेस मधील नेते भाजपमध्ये गेले आहेत. त्यामुळे आमची ताकद लक्षात घ्यावी, असंही रेखा ठाकूर यांनी नमूद केलं आहे. 


महाविकास आघाडीच्या दिरंगाई आणि अनिर्णयाक दृष्टीकोणाबाबत चिंतेत आहोत


रेखा ठाकूर म्हणाल्या, भाजप आणि आरएसएसच्या विनाशकारी आणि नीच अजेंड्याविरोधात सातत्याने ठामपणे उभा असलेला माझा पक्ष आहे. आम्ही जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीच्या दिरंगाई आणि अनिर्णयाक दृष्टीकोणाबाबत चिंतेत आहोत. 2 फेब्रुवारी आणि 27 फेब्रुवारी वगळता इतर बैठकांमधून वंचित बहुजन आघाडीला वगळण्यात आले. महाविकास आघाडीची संथपणाची आणि आम्हाला टाळण्याची भूमिका असली तरी आम्ही सकारात्मक आहोत, असंही ठाकूर यांनी पत्रातून स्पष्ट केलय. 


आम्हाला केवळ 2 जागा देण्यात आल्यात


रेखा ठाकूर पुढे या पत्रात म्हणाल्या, वंचित बहुजन आघाडीचा पाया दलीत, आदिवासी, गरिब मराठा आणि मुस्लिमांमध्ये विस्तारत असताना आम्हाला केवळ 2 जागा देण्यात आल्या आहेत. या मतदारसंघातील कार्यकर्त्यांसोबत आम्ही चर्चा केली. यावेळी असे जाणवले की, या जिल्ह्यांत आमचे काम कमी असले तरी, महाविकास आघाडीचे अस्तित्व कमी आहे. त्यांना या मतदार संघामध्ये जनाधार नाही, त्यामुळे या जागा आमच्यासाठी त्रासदायक आहेत, असं मत वंचितच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी पत्रातून मांडले आहे. 


वंचित बहुजन आघाडीला सन्माजनक आणि जिंकणाऱ्या जागा द्याव्यात. महाविकास आघाडीला टाकाऊ वाटणाऱ्या जागा आम्हाला नको आहेत. उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी दोन्हीही पक्ष विभाजीत झालेले आहेत. शिवाय, काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यासह अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. अशा परिस्थितीत महाविकास आघाडीने सक्षण राजकीय शक्ती म्हणून पाहणे महत्वाचे आहे, असंही ठाकूर यांनी पत्राद्वारे नमूद केलं आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Rohit Pawar : मोठी बातमी : रोहित पवारांना ED चा सर्वात मोठा झटका, बारामती अॅग्रोने खरेदी केलेला कारखाना जप्त!