पुणे : पुणे लोकसभेसाठी महाविकास  (Pune Lok Sabha Constituency) आघाडीकडून रवींद्र धंगेकरांना (Ravindra Dhangekar)a उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांनी प्रचारालादेखील सुरुवात केली आहे. धंगेकरांचा दणक्यात प्रचार सुरु आहे. त्यातच आता सगळं सुरळीत सुरु असताना  पुण्यातील ठाकरे गटाने धंगकेरांची डोकेदुखी वाढवली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आता कसबा विधानसभा मतदारसंघावर (Udhav Thackray Shivsena) दावा केला आहे.  लोकसभेची जागा तुम्हाला दिली आता कसबा विधानसभेची जागा आम्हाला द्या.तरच आम्ही रवींद्र धंगेकरांचं काम करु, असा आक्रमक पावित्र ठाकरे गटाने घेतला आहे. 


ठाकरे गटाने घेतलेल्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत आतापासूनच धुसफूस  सुरू झाल्याचे पहायला मिळत आहे. सध्या सगळीकडे शहरात बैठकांचं सत्र सुरु आहे. भाजपच्या बैठका होत आहेत. त्यासोबतच महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्यादेखील बैठका सुरु आहेत. या बैठकांमध्ये प्रचाराची रणनिती आखली जात आहे याच बैठकीत ठाकरे गटाच्या नेत्यांनी थेट कसबा विधावसभेवर दावा केला आणि जागा आम्हाला द्या, अशी मागणी केली आहे. गेल्या वर्षी लागलेल्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विजयी झाले होते. भाजपचा गड असणारा कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीने आपल्या एकीच्या बळावर सर केला होता. या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तिन्ही पक्षांनी एकत्रित जोर लावून काम केल्यामुळे रवींद्र धंगेकर यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला. आपल्या एकीचं बळ दाखवून यंदाही भाजपला पराभूत करु शकतो, असा विश्वास ठाकरे गटाच्या नेत्यांनी दाखवला आहे. 


कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्यावेळी महाविकास आघाडी म्हणून एकत्र निर्णय घेण्यात आला होता. त्यावेळी रवींद्र धंगेकरांना उमेदवारी दिली होती. त्यानंतर त्यांना जिंकून आणण्यासाठी सगळ्यांनी एकत्र प्रयत्न केले आणि भाजपच्या उमेदवाराचा दारुण पराभव करुन धंगेकरांना विजयी केलं होतं. आता मात्र त्यांना लोकसभेचंदेखील सीट दिलं त्यामुळे आता आम्हाला कसब्याची जागा मिळावी, अशी मागणी केली. आताच विधानसभेची जागा देणार असं जाहीर करा तरचं लोकसभेत धंगेकरांचा प्रचार करणार असल्याचं ठाकरे गटाचे नेते म्हणाले आहे. ठाकरे गटाने अशी भूमिका घेतल्यामुळे धंगेकरांची धाकधूक वाढल्याचं दिसत आहे. 


इतर महत्वाची बातमी-


Ravindra Dhangekar On Murlidhar Mohol : मुरलीधर मोहोळ आवडतात का ? विचारल्यावर धंगेकर थेटच बोलले, मला….