नागपूर :  पुण्याचे माजी उपमहापौर आणि काँग्रेस नेते आबा बागुल (Aaba Bagul) नागपूरमध्ये फडणवीस (Devendra Fadnavis) आणि बावनकुळेंच्या भेटीला  पोहोचले आहेत.आबा बागुल यांनी काँग्रेसने (Congress)  रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar)  यांना उमेदवारी दिल्यानंतर नाराजी व्यक्त केली होती. त्याचबरोबर पुण्यातील (Pune Lok Sabha) कॉंग्रेस पक्ष कार्यालयासमोर आंदोलन देखील केले होते. तेव्हापासून आबा बागुल भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याची चर्चा होती. त्यामुळे आता नागपुरात भाजप नेत्यांची भेट घेतल्यावर बागुल हे ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश करणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. तसं झाल्यास त्याचा फटका धंगेकर यांना किती बसतो हे देखील पाहावं लागेल. 


आबा बागुल यांनी रविंद्र धंगेकरांना उमेदवारी दिल्यानंतर जाहीर नाराजी व्यक्त केली होती. पुण्यातील काँग्रेसचे जे पक्ष कार्यालय आहे ज्याला काँग्रेस भवन म्हणून ओळखले जाते तिथे त्यांनी आंदोलन देखील केले होते.आपल्यावर  अन्याय झाला अशी भावना व्यक्त केली होती. तेव्हापासून कदाचीत त्या आधीपासूनच आबा बागुल हे भाजप नेत्यांच्या संपर्कात होते.  खासकरुन देवेंद्र फडणवीसांच्या संपर्कात असल्याची चर्चा होती. आज जी चर्चा प्रत्यक्षात उतरल्याचे चित्र आहे. 


बागुलांच्या नाराजीचा किती फटका बसणार आहे?


आबा बागुल हे नागपुरात पोहचले आहे. त्यांना या बाबत विचारले असता आपण खासगी कामासाठी नागपुरला आल्याचे त्यांनी सांगितले. आर्थातच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट होत आहे. त्यामुळे आता बागुल भाजपमध्ये पक्षप्रेवश करणार का? आणि जर आबा बागुल यांनी पक्ष प्रवेश केला तर काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांना बागुलांच्या नाराजीचा किती फटका बसणार आहे? हे आगामी काळात पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


आबा बागुल हे काँग्रेस पक्षाकडून पाचवेळा नगरसेवक


काही दिवसापूर्वी बाळासाहेब थोरात यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर आढावा बैठक घेतली. या बैठकीला देखील आब बागुल गैरहजर होते.आबा बागुल हे लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक होते.  पुण्यात 40  वर्षे काम  केलेल्या पक्षातल्या निष्ठावंतांवर अन्याय झाला. निष्ठावंतांना न्याय नसेल, तर न्याय यात्रेचा उपयोग काय, असा सवाल काँग्रेसचे माजी उपमहापौर आबा बागुल यांनी केला होता. त्यामुळे आबा बागुल यांची नाराजी ही उघड आहे.   आबा बागुल हे काँग्रेस पक्षाकडून पाचवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत.  


हे ही वाचा :


Ravindra Dhangekar : मोदी जिथे सभा घेतील तिथे भाजपचा पराभव होईल; रवींद्र धंगेकरांचा दावा