Satara Lok Sabha : सातारा लोकसभेच्या (Satara Loksabha) उमेदवारीचा तिढा सुटला आहे.  आजच सातारच्या जागेवर भाजपकडून  खासदार उदयनराजे भोसले  यांच्या  (Chhatrapati Udayanraje Bhosale)  नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीसांच्या पत्रकार परिषदेतच ही घोषणा केली जाईल, अशी शक्यता आहे. तर  दुसरीकडे साताऱ्याची जागा आम्हाला मिळावी अशी मागणी प्रफुल पटेलांनी केलीये. 


महायुतीत साताऱ्याच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा अजूनही कायम आहे. एकीकडे, ही जागा भाजपकडे जाईल आणि उदयनराजे भोसले यांना उमेदवारी मिळेल अशी चर्चा आहे, मात्र दुसरीकडे, राष्ट्रवादीचा दावा कायम आहे. तशी स्पष्ट भूमिका प्रफुल पटेल यांनी व्यक्त केली आहे.  साताऱ्यात अजित पवारांनाही मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे साताऱ्याची जागा आम्हाला मिळावी अशी मागणी प्रफुल पटेलांनी केलीये. तर दुसरीकडे आजच सातारच्या जागेवर भाजपकडून उदयन राजेंच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.देवेंद्र फडणवीसांच्या पत्रकार परिषदेतच ही घोषणा केली जाणार आहे . उदयनराजे यांची उमेदवारी आज जाहीर होण्याची शक्यता आहे.


आज सातारा जाहीर करून नाशिकचे नंतर बघू


 सातारा लोकसभेच्या (Satara Loksabha) उमेदवारीचा तिढा कायम असताना उदयनराजेंनी  तरी जाहीर होण्याची वाट न बघता प्रचाराचा धडाका सुरूच ठेवला आहे. त्यांनी काल महाबळेश्वर, पाचगणीचा दौरा केल्यानंतर मतदारसंघात  भेटीगाठींचा सिलसिला सुरुच ठेवला आहे.  सातारा येथे अजून भाजपने उमेदवार जाहीर केला नाही, कारण याजगी राष्ट्रवादीची जागा होती .  मात्र नाशिक राष्ट्रवादीला सोडून सातारा भाजप स्वतः कडे घेण्याच्या विचारात होते. मात्र नाशिकच्या जागेचा तिढा अजूनही न सुटल्याने सातारा जागा देखील जाहीर झाली नव्हती. मात्र आज सातारा जाहीर करून नाशिकचे नंतर बघू, असा विचार करून उदयन राजे यांचे नाव जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.


नाशिकचा तिढा सुटला?


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार यांच्या नेतृत्त्वातील पक्षाचं कर्जत येथे शिबीर झालं होतं. अजित पवार यांनी सातारा, बारामती, रायगड आणि शिरुर या लोकसभा मतदारसंघात आपले उमेदवार निवडणूक लढवतील, असं जाहीर केलं होतं.  यापैकी अजित पवारांनी बारामती, रायगड, शिरुर या ठिकाणी उमेदवार जाहीर केले आहेत. नाशिक लोकसभा मतदारसंघ देणार असाल तर साताऱ्याची जागा भाजपला सोडू अशी भूमिका अजित पवारांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रवादी काँग्रेसनं घेतली आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढवण्यात येईल हे अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेलं नाही.