पुणे : पुण्यात लोकसभेच्या निवणुकांची (Pune Loksabha Election 2024) रणधुमाळी सुरु झाली आहे. उमेदवारांकडून आरोप प्रत्यारोप होताना पाहायल मिळत आहे. महायुतीकडून मुरलीधर मोहोळ तर महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर तर वंचितकडून वसंत मोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तिन्ही नेत्यांचा प्रचार जोरात सुरु आहे. या तिन्ही नेत्यांचा प्रचार करण्यासाठी दिग्गजांच्या सभा आणि रोड शो करण्यात येणार आहे. त्यातच रवींंद्र धंगेकरांच्या प्रचारासाठी राहूल गांधी आणि प्रियंका गांधी येणार असल्याची माहिती आहे. त्यावर भाजपकडून निशाणा साधण्यात आला आहे. जिथे राहुल गांधी प्रचार करतात तिथे कंॉग्रेसचा पराभव होतो, असं भाजपचं म्हणणं आहे तर त्यावर पुणे लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर रवींद्र धंगेकरांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. ज्या लोकसभा मतदारसंघात मोदी प्रचार करतील त्या मतदारसंघात भाजपचा पराभव निश्चित असल्याचा हल्लाबोल, धंगेकरांनी (Ravindra Dhangekar) केला आहे. एबीपी माझाच्या महाभारत एक्स्प्रेस या कार्यक्रमात बोलताना त्यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. 


रवींद्र धंगेकर म्हणाले की, माझ्या प्रचारासाठी राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि त्याच्यासोबत विविध दिग्गज नेते येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुण्यात कसबा पॅटर्न चालणार आहे. मला पोटनिवडणुकीच्या वेळी पुणेकरांनी निवडूण दिलं आहे. त्यात यावेळीदेखील मी निवडून येणार आहे. पुण्यातील जनता माझ्या पाठीशी आहे. 


धंगेकरांची स्टॅटजी काय?


धंगेकरांची स्टॅटजी काय?, असं विचारल्यावर धंगेकरांनी  बिनधास्त उत्तर दिलं आहे. राज्यात निवडणुकीचं वारं बदलत आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींवरचा विश्वास कमी झाला आहे. हे चित्र काहीच दिवसात आपल्याला पाहायला मिळणार आहे. कसब्यातील विजय खेचून आणल्यामुळे मला पुन्हा संधी दिली नाही तर सच्चा कार्यकर्ता म्हणून मला लोकसभेची संधी दिली आहे. नेत्याला संधी न देता लोकनेत्याला संधी दिली आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. 


इतर महत्वाची बातमी


-मी जे सांगायचे ते सांगितलं, मला मूर्ख समजू नका; 'त्या' प्रश्नावरुन अजित पवारांनी पत्रकारांना फटकारलं!



-मतदार जागृतीच्या बोर्डावर ‘इन्कलाब जिंदाबाद’, ‘नोटा’; पुण्यातील गोखले संस्थेत नेमका कोणता प्रकार घडला?



-माझ्या मनाला मुरड घालून मी माघार घेतली; सासवडच्या सभेपूर्वी शिवतारेंची कबुली