ABP News C-Voter Opinion Poll : पश्चिम बंगालमध्ये पुन्हा ममता बॅनर्जींना जनतेचा कौल; भाजप मोठी मुसंडी मारणार?
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा ममता बॅनर्जींना जनतेचा कौल पहायला मिळत आहे. तर भाजपही मोठी मुसंडी मारणार असल्याचे दिसतंय. एबीपी न्यूज सी-व्होटरचा ओपिनियन पोल जाहीर झाला आहे.
![ABP News C-Voter Opinion Poll : पश्चिम बंगालमध्ये पुन्हा ममता बॅनर्जींना जनतेचा कौल; भाजप मोठी मुसंडी मारणार? public support for Mamata Banerjee in West Bengal, challenge for BJP ahead election ABP News C-Voter Opinion Poll : पश्चिम बंगालमध्ये पुन्हा ममता बॅनर्जींना जनतेचा कौल; भाजप मोठी मुसंडी मारणार?](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/28002150/WB.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने देशातील चार राज्ये आणि एक केंद्र शासित प्रदेशातील निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. यात पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसामसह पद्दुचेरीचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यासाठी मतदान आतापासून एक महिन्याने 27 मार्च रोजी होणार आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे, पाचपैकी फक्त एका राज्यात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे भाजपसाठीही या निवडणुका अत्यंत महत्वाच्या ठरतील. 27 मार्चला पाचही राज्यात मतदानाला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर एबीपी न्यूज सी-व्होटरने सर्व्हेक्षण करुन ओपिनियन पोल जाहीर केले आहेत.
2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी या पाच राज्यांच्या निवडणुकांना सेमीफायनल म्हणून पाहिले जात आहे. या पाच राज्यापैकी पश्चिम बंगालवर सर्व देशवासीयांची नजर आहे. एकीकडे दीदी म्हणजे ममता बॅनर्जी पुन्हा एकदा सत्तेवर येताना दिसत आहे तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांच्या नेतृत्वात भाजप ‘सोनार बांगला’ घोषणा टक्कर देत असल्याचे दिसत आहे. 2 मे रोजी ईव्हीएममधून येणारा निकाल बंगालचं राजकीय भवितव्यावर ठरवणार आहे.
2021 चा ओपिनियन पोल
- तृणमूल काँग्रेस – 156
- भाजप – 100
- काँग्रेस + डावेपक्ष – 35
- इतर – 3
- तृणमूल काँग्रेसला 148 ते 164 च्या दरम्यान जागा मिळण्याचा अंदाज
- भाजपला 92 ते 108 च्या दरम्यान जागा मिळण्याचा अंदाज आहे.
पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी सर्वाधिक पसंती कुणाला?
- ममता बॅनर्जी (तृणमूल काँग्रेस) – 54.5 टक्के
- दिलीप घोष (भाजप) – 24.6 टक्के
विद्यमान राज्य सरकारच्या कारभारावर किती लोक समाधानी आहेत?
- पश्चिम बंगाल
- खूप समाधानी – 37 टक्के
- काही प्रमाणात समाधानी – 34 टक्के
- असमाधानी – 26 टक्के
- सांगता येत नाही – 3 टक्के
पश्चिम बंगालमध्ये कोणतंही सत्तांतर होताना दिसत नाही. मात्र, ममता बॅनर्जींच्या जागांमध्ये मोठी घट होईल असा अंदाज आहे. भाजपला मात्र इथं मोठं यश मिळताना दिसतंय, असं असलं तरी भाजप सत्तेपासून दूर राहण्याचा अंदाज आहे.
2016 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत टीएमसीने 211 जागा जिंकत सत्ता हस्तगत केली होती. काँग्रेस 44, डावी आघाडी 26 आणि भाजपला फक्त 3 जागांवर विजय मिळाला होता. अन्य पक्ष आणि अपक्षांनी 10 जागा जिंकल्या होत्या. बंगालमध्ये बहुमताचा आकडा 148 आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)