गेल्या दहा वर्षात नाही, पण लोकसभेच्या निकालानंतर लाडकी बहीण आठवली, पृथ्वीराज चव्हाणांचा अजितदादांवर हल्लाबोल
पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी लाडकी बहीण योजनेचे पुढील हफ्ते पाहिजे असतील तर आम्हला मतदान करा असं म्हटल आहे. दरम्यान, अजित पवार यांच्या वक्तव्यानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी जोरदार टीका केली आहे.
पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी लाडकी बहीण योजनेचे पुढील हफ्ते पाहिजे असतील तर आम्हला मतदान करा असं म्हटल आहे. दरम्यान, अजित पवार यांच्या वक्तव्यानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी जोरदार टीका केली आहे. " त्यांना त्याशिवाय काहीही दिसत नाही. दहा वर्ष त्यांना लाडकी बहीण आठवली नाही. लोकसभेच्या निकालाच्या नंतर त्यांना लाडकी बहीण आठवली ही चांगली गोष्ट आहे. ही योजना आम्ही कर्नाटकमध्ये यशस्वीरीत्या राबवली आहे. तसेच तेलंगणा येथे देखील ही योजना आम्ही राबविली आहे. आम्ही काय करणार आहोत हे आमच्या जाहिरनाम्यात कळेल, असंही यावेळी चव्हाण यांनी सांगितलं. रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण लिखित 'हॉस्पिटलचे बिल माफ कसे करावे?' पुस्तकाचे प्रकाशन राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते.
बंद दाराआड जागावाटपाच्या बाबत चर्चा होत आहे
यावेळी जागावाटपाच्या बाबत पृथ्वीराज चव्हाण यांना विचारलं असता ते म्हणाले की, याबाबत जाहीररित्या सांगता येणार नाहीये. काल पासून जागावाटपाच्या बाबत चर्चेला सुरुवात झाली आहे. बंद दाराआड जागावाटपाच्या बाबत चर्चा होत आहे. आम्ही आमचं आकलन करत आहोत. जेव्हा आमचं ठरेल तेव्हा आम्ही नक्कीच याबाबत सांगू असंही चव्हाण म्हणाले.
मुख्यमंत्री जर निवडणुकीला सामोरे जात असेल तर त्याचा चेहरा हा आपोआप मुख्यमंत्री म्हणून पुढे केला जातो
मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबत पृथ्वीराज चव्हाण यांना विचारलं असता ते म्हणाले की, महाराष्ट्राची परंपरा आहे . एखादा मुख्यमंत्री जर निवडणुकीला सामोरे जात असेल तर त्याचा चेहरा हा आपोआप मुख्यमंत्री म्हणून पुढे केला जातो. विरोधक म्हणून जेव्हा निवडणुकीला सामोरे जातो आणि बहुमत मिळतो आणि ज्या पक्षाचे सर्वाधिक आमदार निवडून येतात त्या पक्षाचं मुख्यमंत्री हा होत असतो. ही साधारणतः पद्धत असते आता आम्ही विरोधात निवडणूक लढवत असल्याने आधीच मुख्यमंत्री पदाचा चेहेरा ठरवणे योग्य नाही, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.
भारतातील हिंदू हा धोक्यात असून प्रत्येकाने दोन मुलं जन्माला घातली पाहिजे
पुढे बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, भारतातील हिंदू हा धोक्यात असून प्रत्येकाने दोन मुलं जन्माला घातली पाहिजे, असं विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून सांगण्यात आल आहे. याबाबत पृथ्वीराज चव्हाण यांना विचारलं असता ते म्हणाले की, मला हे समजत नाही की हिंदू कोणामुळे धोक्यात आहे. जर मुस्लिम समाजापासून धोक्यात आहे, असं म्हणत असतील तर देशात हिंदूंची संख्या मुस्लिमांपेक्षा सहा पटीने जास्त आहे.
इतर महत्वाच्या बातम्या