Prasad Lad : मी टाईम्स ऑफ इंडियात आधी हमाली करायचो. मी 19 व्या वर्षी लग्न केलं. त्यावेळच्या विधानपरिषद सदस्याची मुलगी पळवून हे लग्नं केलं. त्याच वेळी ठरवलं की एक ना एक दिवस आमदार व्हायचं असं वक्तव्य भाजप आमदार प्रसाद लाड यांनी विधान परिषदेत  केले आहे.  त्यांच्या या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा आहे, लाड यांनी केलेल्या भाषणात त्यांनी आपल्या जीवनातील अनेक गोष्टींचा उलगडा केला आहे. 


त्याच वेळी मी ठरवलं की एक ना एक दिवस आमदार व्हायचं


संघर्षातून मी विश्व निर्माण केलं असून मी एका गरीब कुटुंबातील असून परळच्या छोट्या खोलीत मी राहिलो. तिथून जीवनाला सुरूवात झाली. कॉलेज काळात प्रेमप्रकरणाची सुरूवात झाली. माझ्या बायकोचे वडिल होते विधान परिषदेचे सदस्य बाबुराव बापसे, त्यावेळी त्यांचा जो रूबाब होता, तो पाहूनच त्याच वेळी मी ठरवलं की एक ना एक दिवस आमदार व्हायचं


त्यावेळी विधानपरिषद सदस्याची मुलगी पळवून लग्नं केलं


मी वयाच्या 19 व्या वर्षी लग्न केलं. त्यावेळी विधानपरिषद सदस्याची मुलगी पळवून लग्नं केलं. आणि त्यावेळी पत्नीचे वडिल बाबुराव भापसे यांची मुलगी पळवून जाऊन लग्न करणे म्हणजे पार मोठी गोष्ट होती, खिशात पैसे नव्हते. मी टाईम्स ऑफ इंडियात आधी हमाली करायचो. पुस्तक पोहचवायची टुरिस्चटची गाडी चालवायचो.  70 रुपये मिळायचे, त्यातले 40 रुपये बायकोला द्यायचो. बाकी उरलेल्या पैशात समाजकारण करायचो. 2000 साली उद्योग सुरू केला. पत्नीची साथ लाभली. आयुष्यात सर्व काही लवकर मिळालं. 21 व्या वर्षा मुलगी झाली. जयंत पाटलांमुळे सिद्धीविनायक न्यासाचा मी 31 व्या वर्षी विश्वस्त झालो. तेव्हा खूप कठीण होतं. आणि संघर्षातून यशाची पायरी गाठली. जाणून घ्या आणखी काय म्हणाले आमदार लाड..


 



 


संबंधित बातम्या


Prasad Lad : कोणाची झोप उडणार ते चार वाजण्याच्या आधीच राऊतांना कळेल, प्रसाद लाड यांचा टोला


ED raids in Mumbai : मुंबईत ईडीचे छापासत्र, शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले...


Paper Leak : पेपरफुटी प्रकरणात राज्यातील विद्यमान मंत्र्यांचा समावेश; भाजप आमदार प्रसाद लाड यांचा दावा