Prasad Lad : संजय राऊत (Sanjay Raut) यांना मी सांगू इच्छितो की, भाजप असल्या खोट्या धमक्यांना घाबरणारा पक्ष नसल्याचे वक्तव्य भाजपचे नेते प्रसाद लाड (Prasad Lad ) यांनी केले आहे. ईडीचे इब्राइच्या बाबतीत जे धाडसत्र चालू आहे, त्यामध्ये अनेक राजकीय नेत्यांची झोप उडणार आहे. कोणाची झोप उडणार ते चार वाजण्याच्या आधीच राऊत यांना कळेल असे लाड यावेळी म्हणाले. त्यामुळे राऊत यांनी स्व:ताची झोप वाचवावी असा टोला देखील लाड यांनी राऊतांना लगावला. तसेच राऊत साडेतीन नावाचा चित्रपट काढणार का? हे बघावं लागेल असेही लाड म्हणाले.
भारतीय संविधानामध्ये जे तपास यंत्रणांना अधिकार दिले आहेत, त्यानुसार त्या यंत्रणा काम करत आहेत. दिलेल्या अधिकारानुसार यंत्रणा काम करत असतील, जर ती यंत्रणा एखाद्या राजकीय पक्षांपर्यंत पोहोचत असेल आणि तो राजकीय नेता त्यामध्ये सामील असेल तर, ती तपास यंत्रणा चुकीचे काम करते का? राज्यातील पोलीस भजपच्या लोकांना त्रास देते. काल भाजपच्या लोकांच्या गाड्या अडवून त्यांना अटक केली असे लाड यावेळी म्हणाले. त्यामुळे यंत्रणेचा गैरवापर कोण करते हे देशाला माहित असल्याचे त्यांनी सांगितले. तुम्ही जर चुकीची कृत्ये करत नसाल तर तुम्हाला घाबरायची कारण काय? आम्ही घाबरत नाही असे ते म्हणाले.
भाजपच्या साडेतीन नेत्यांना जेलमध्येही जावं लागणार असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले होते. आम्ही खूप सहन केलं आहे. त्यामुळे आता बरबादही आम्हीच करू, असा इशारा राऊत यांनी दिला. दरम्यान भाजपचे हे साडेतीन नेते कोण? हे आज संजय राऊत घेणाऱ्या पत्रकार परिषदेत कळणार आहे. यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला इशारा दिला आहे. आज दुपारी चार वाजता शिवसेना भवनात संजय राऊत पत्रकार परिषद घेणार आहेत. तिथं संपूर्ण पक्षासह पदाधिकारी, सर्व आमदार, खासदार उपस्थित असतील.
महत्त्वाच्या बातम्या: