Prakash Ambedkar & PM Modi: मोदी, पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी कुठेत, तुम्ही कसला आनंदोत्सव साजरा करताय? प्रकाश आंबेडकरांचा खरमरीत सवाल
Pahalgam attack: पहलगाम हल्ल्यात 26 भारतीय पर्यटकांना दहशतवाद्यांनी ठार मारले होते. त्यानंतर हे दहशतवादी पळाले होते. अजूनपर्यंत या दहशतवाद्यांचा पत्ता लागलेला नाही.

Pahalgam attack: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधीनंतर भाजपकडून देशभरात तिरंगा यात्रांचे आयोजन केले जात असताना आता वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांना लक्ष्य केले आहे. प्रकाश आंबडेकर यांनी 'एक्स' या समाजमाध्यमावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामधून प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) पंतप्रधान मोदींना थेट सवाल विचारला आहे. "मोदी, पहलगाम हल्ल्यासाठी (Pahalgam Terror attack) जबाबदार असलेले दहशतवादी कुठे आहेत? तब्बल महिनाभर उलटून गेला आहे. तुम्ही कसला आनंदोत्सव साजरा करताय. पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या पत्नीला अद्याप न्याय मिळालेला नाही, असे प्रकाश आंबेडकरांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
एप्रिल महिन्यात 22 तारखेला पहलगामच्या बैसरन खोऱ्यात दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला होता. यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला होता. त्यापैकी सहा पर्यटक महाराष्ट्रातील होते. दहशतवाद्यांनी फक्त पुरुषांना गोळ्या घातल्या होत्या. बहुतांश पर्यटकांच्या डोक्यात गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. यानंतर भारतीय सैन्याने 7 एप्रिलला 'ऑपरेशन सिंदूर' राबवून याचा बदला घेतला होता. यावेळी पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळ क्षेपणास्त्रांचा मारा करुन उद्ध्वस्त करण्यात आले होते. यामध्ये नियंत्रण रेषेपासून 100 किलोमीटर आत असणाऱ्या बहावलपूर येथील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या मुख्यालयाचाही समावेश होता. भारतीय सैन्याच्या या एअर स्ट्राईकमध्ये तब्बल 100 दहशतवादी ठार झाले होते.
Modi, where are the terrorists responsible for the Pahalgam terrorist attacks?
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) May 19, 2025
Almost a month has passed!
What are you celebrating?
Justice is not served yet to the wives of the victims who were killed in the attack! pic.twitter.com/er840V72Nb
Amit Thackeray : भारत-पाक युद्धाचा निकाल स्पष्ट नसताना विजयी जल्लोष टाळा: अमित ठाकरे
मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहले आहे. या पत्रात अमित ठाकरे यांनी म्हटले आहे की, सध्या काही ठिकाणी विजयाचं प्रतीक म्हणून जे उपक्रम राबवले जात आहेत, त्याबाबत समाजात भावनिक संभ्रम आहे. ही परिस्थिती विजयाची नसून ‘ceasefire’ (युद्धविराम) आहे. आणि म्हणूनच, ज्या घटनेत आपल्या शूर जवानांनी प्राणत्याग केला, त्याच काळात साजरे होणारे उत्सव अनेकांच्या मनाला वेदना देणारे आहेत. मा. मोदीजी, आपल्याकडून आजही देशवासियांना हा विश्वास आहे की, आपण सैनिकांच्या योगदानाबाबत संवेदनशील आणि कृतज्ञ आहात. आणि म्हणूनच, या पत्राद्वारे एक मनापासूनची विनंती करतो की, युद्धाचा निकाल अजून स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा, आणि देशासाठी शहीद झालेल्या वीरांना खरी श्रद्धांजली म्हणून या काळात संयम बाळगावा, असे अमित ठाकरे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
आणखी वाचा






















