Prakash Ambedkar on Majha Katta : "तुम्ही हरलेल्या जागाही शेअर करु शकत नाहीत.तुम्हाला उदाहरण द्यायचे असेल तर औरंगाबादचं आहे. सातत्याने 9 वेळेस हरलेली जागा होती. एका मुस्लीमाच्या जोरावरती ती आम्ही पुन्हा जिंकवून दाखवली. तिथे मुस्लीम हा टर्न झाला. औरंगाबाद पॅटर्न बाकी ठिकाणी होईल. आत्ता होईल. मी तु्म्हाला सांगतोय. 2024 च्या निवडणुकीत हे होईल. पण मी त्या जागाबद्दल सांगणार नाही", असं वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले. ते माझा कट्टावर बोलत होते. 


शिवसेनेचा आणि काँग्रेसचा 10 जागांवर वाद आहे


प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले, हरले ते स्वीकारत का नाहीत? तुम्ही शिवसेनेचा आणि काँग्रेसचा 10 जागांवर वाद आहे. हे सांगत का नाहीत? शिवाय तीन पक्षांमध्ये 5 जागांवर वाद आहे. मी 5 जागांवर स्वत:हून जिंकण्याच्या परिस्थितीत आहे. आम्ही तयारी केलेली आहे. पण यांचे भांडण मिटत नाही, तर मी काय माझ काय सांगू? असा सवालही प्रकाश आंबेडकर यांनी केला. आम्ही वेगळं लढलो तर तुमचं दुखण का? तुम्ही आम्हाला बी टीम का म्हणता? आमच्या बॅगा वापरायच्या आणि चालत राहायचे, अशी मेंटॅलिटी आहे. वंचितांच्या वर्गाने वरती येऊ नये, अशी यांची भूमिका आहे. 


सिताराम केसरी यांच्याकडून समझोता झाला होता


पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले, 27 जागा आम्ही मागितल्या त्यावर काही वाद झाला. माझ्या पहिल्या निवडणुकीपासून म्हणजे 1985 मध्ये मला पाडण्यासाठी काँग्रेस आणि भाजपचा समझोता झाला होता. काँग्रेस भाजपची बी टीम आहे, अंस कधीही म्हणाले नाहीत. त्यावेळेस सिताराम केसरी यांच्याकडून समझोता झाला होता. शरद पवारांनी मला पाठिंबा दिला नव्हता, असं आंबेडकर यांनी स्पष्ट केले. मला मान सन्मान हवा. तो मिळत नाही. आमच्या प्रतिनिधींना बैठकीतून बाहेर बसायला लावलं. आमचे प्रतिनिधी तरीही तिथेही जाऊन बसले. आमच्याबरोबर केवळ एकच बैठक झाली. याला पॉलिटिकल बैठक म्हणत नाहीत. मी माझ्या शब्दात सांगतो कोंबडी सर्वांनी शिजवली, मी यांना एकट्याला खाऊ देणार नाही, असेही प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी सांगितले. 





इतर महत्वाच्या बातम्या 


Prakash Ambedkar : काँग्रेस आणि ठाकरेंमध्ये जागावाटपात नेमक्या किती जागांवर थेट घमासान? प्रकाश आंबेडकरांनी आकडा सांगितला!