Supriya Sule on PM Narendra Modi, Baramati : "नमो रोजगार मेळाव्याचा मंडप 5 कोटींचा होता. निवडणुकीत आपण एकदा बटन दाबले की, पेट्रोल आणि सिलेंडरचे भाव वाढतात. आजकाल महिलाच मला येऊन सांगतात की, आम्हाला सर्व माहिती आहे. निवडणूक झाली की आमच्या सिलेंडरचे भाव वाढणार आहेत. निवडणुकीच्या तोंडावर पेट्रोल आणि डिझेलचे भाव 2 रुपयांनी कमी केली. भाव वाढवला तर कंपनीने वाढवला आणि कमी केला तर आम्ही केला. म्हणजेच आपला तो बाळ्या आणि दुसऱ्याच कारटं असे हे प्रशासन आहे", अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली. बारामती येथे शरद पवार गटाचा शेतकरी, कामगार महामेळावा पार पडला. यावेळी त्या बोलत होत्या. 


महागाई, बेरोजगारी, आणि भ्रष्टाचार भाजपने केला


सुप्रिया सुळे म्हणाल्या, मी भाषण करते म्हणून माझ्यावर टीका करतात. कामगार विरोधी कायदे आहेत. कुणीही पर्मनंट होणार नाही. नमो रोजगार मेळाव्याचा मंडप 5 कोटींचा होता. रोहित पवार एमआयडीसी मागत आहेत. मंजूर केली जात नाही. महागाई, बेरोजगारी, आणि भ्रष्टाचार भाजपने केला. रोहितला एवढा त्रास दिला की त्यांच्यामागे ईडी लावली. राऊत साहेब 3 महिने जेलमध्ये जाऊन आले. तरीही रोज सकाळी 10 वाजता भांडतात. देशमुख साहेबांवर 100 कोटींचा आरोप केला. भाजपमध्ये गेले नाहीत म्हणून त्यांना त्रास देण्यात आला.  असंही सुळे यांनी यावेळी स्पष्ट केलं.


अशोक चव्हाण काही न करता 6 वर्षांसाठी खासदार झाले


सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या, अशोक चव्हाणांवर बोलून थकले पण भाजपचे लोक उत्तर देत नाहीत. आम्ही सहा सहा महिने काम करून खासदार होतोय. आम्ही 5 वर्षासाठी खासदार होतो.अशोक चव्हाण काही न करता 6 वर्ष खासदार झाले. अशोक चव्हाण यांनी भ्रष्टाचार केला नसेल तर, भाजपने अशोक चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबियांची माफी मागितली पाहिजे. आम्ही खोटे आरोप केले असेही त्यांनी सांगितले पाहिजे, असेही सुळे यांनी स्पष्ट केलं.  अतिशी यांना आंदोलन करीत होत्या म्हणून अटक केली. काही लोकांना फोन येतात घाबरायचं नाही. जे तिकडे आहेत त्यांचा प्रचार करीत आहेत त्यासंदर्भात आम्ही काही तरी बोलतो का?दडपशाही आम्ही बारामतीत चालू देणार नाही, असा इशाराही सुळे यांनी यावेळी बोलताना दिला. 


इतर महत्वाच्या बातम्या 


मोठी बातमी: अभिनेत्री स्वरा भास्कर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, पुनम महाजनांच्या मतदारसंघातून रिंगणात उतरणार?