Prakash Ambedkar on Ajit Pawar : "अजित पवारांची राष्ट्रवादी आमचा वापर करत आहे. आम्ही वंचितकडे चाललो म्हणतात. आम्हाला थांबवायचं असेल तर आमच्या सीट वाढवा, असं महायुतीला म्हणत असतील. अजित पवारांनी महायुतीतून बाहेर पडावे, त्यांचं राजकारण आम्ही पुर्नप्रस्थापित करु. " अशी ऑफर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिली आहे. ते छत्रपती संभाजीनगरमधील पत्रकार परिषदेत बोलत होते. 


26 जुलै रोजी आरक्षणाची शाहू महाराजांनी घोषणा केली होती


प्रकाश आंबेडकर म्हणाले, 26 जुलै रोजी आरक्षणाची शाहू महाराजांनी घोषणा केली होती म्हणून , कोल्हापूर येथून त्यांच्या पुतळ्याला नमन करून आरक्षण बचाव यात्रेला सुरुवात करणार आहोत. कोल्हापूर ,सांगली ,सोलापूर उस्मानाबाद ,लातूर ,बीड नांदेड परभणी ,यवतमाळ ,अमरावती,अकोला, बुलढाणा, जालना या जिल्ह्यात ही यात्रा काढली जाईल. तर 7 किंवा 8 तारखेला औरंगाबादला समारोप होईल. यात्रेत कॉर्नर बैठका घेतल्या जातील, आणि मुक्कामाच्या ठिकाणी सभा होतील.


MIM  ने ओबीसींचा वापर करून घेतला


पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, MIM  ने ओबीसींचा वापर करून घेतला. सत्तेत जाण्याची संधी आली तेव्हा त्यांनी शंभर जागा मागितल्या. त्यामुळे युती तुटली,त्यामुळे अशा संघटनेसोबत आपण जायचं नाही. जायचं असेल तर आपण सर्व मुस्लिम समाज सोबत बसले पाहिजे.  त्यांच्याबरोबर बसून आपण डायरेक्ट सीट शेअरिंग चर्चा केली पाहिजे.


संभाजी महाराज आणि शाहू महाराजांमध्ये वाद असेल असं मला वाटत नाही


संभाजी महाराज आणि शाहू महाराजांमध्ये वाद असेल असं मला वाटत नाही. रिपोर्टनुसार तोडफोड भिडेशी साधक्य आहे, त्यामुळे तोडफोड करणाऱ्या वर कारवाई झाली पाहिजे. संभाजी भिडे यांच्यामार्फत मशीदीच्या विरोधात राजकारण केलं जात आहे. पूजा खेडकरबाबत तुम्ही पेपरवाले ट्रायल करत आहात. डॉक्टरने सर्टिफिकेट दिले आहे त्याच्यावर कारवाई का करत नाहीत? दिलीप खेडकर रिटायर आहेत त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये घोटाळा केला असेल तर त्यांच्यावर कोणतीही इन्क्वायरी नाहीये. तिच्या आईने पोलिसांविरोधात काय केलं असेल तर पोलिसांनी कारवाई करावी.चूक असेल तर त्यांना दोषी धरा, असंही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Prakash Ambedkar : सगे सोयरे ही भेसळ आहे, घाई घाईत काढलेली कुणबी सर्टिफिकेट रद्द करा, प्रकाश आंबेडकरांच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे