Praful Patel भंडारामहाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) तर्फे मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचे नाव चर्चेत आहे. अशातच नाना पटोले यांच्या बाबतीत भावी मुख्यमंत्री हे भावीच राहतील, असं विधान राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी केलं होतं. यावर नाना पटोले यांनी जिल्ह्याचा एक पोरगा मोठा होत असेल तर, त्याला प्रफुल्ल पटेल यांचं नावं नं घेता सर्वांनी आशीर्वाद द्यावा, असं वक्तव्य केलं होतं.


यावर प्रफुल्ल पटेल यांनी आज लाखांदुरात माध्यमांशी बोलताना नाना पटोले यांच्याबाबत मोठे विधान केलंय. चांगलं काम करत राहावं, तुम्हाला सदैव माझा आशीर्वाद मिळत राहील, असं वक्तव्य प्रफुल्ल पटेल यांनी केलंय. यावरून भविष्यात काही वेगळ्या राजकीय घडामोडी बघायला मिळतील का? असा तर्कवितर्क राजकीय वर्तुळातून लावल्या जात आहे. 


मी सगळ्यांच्या डोक्यावर हात ठेवलेला आहे- प्रफुल्ल पटेल 


भंडारा - गोंदिया जिल्ह्याच्या प्रत्येक नेत्यांचा मग तो कुठल्याही पक्षाचा असो, सगळ्यांच्या डोक्यावर हात ठेवलेला आहे. चांगलं काम करत राहावं, तुम्हाला माझा सदैव आशीर्वाद मिळत राहणार. चांगलं काम केलं तर, बाकी मला काही कोणाच्या बद्दल बोलायचं नाही.  अनेक लोकांना या राज्यामध्ये मंत्री सुद्धा मी केलेलं आहे. मला त्याच्याविषयी काही क्रेडिट नकोय. राजकारणात आम्ही अनेक गोष्टी पाहिलेल्या आहेत. राजकारणात लांब प्रवास करून आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. ज्यांनी चांगलं काम केलं, त्यांचे लोक पुरस्कृत करतील, असं वक्तव्य खासदार प्रफुल्ल पटेल यांनी नाना पटोले यांच्या वक्तव्यावर केलंय. दोन दिवसापूर्वी नाना पटोले यांनी जिल्ह्याचा माणूस मोठा होत असेल तर सर्वांनी आशीर्वाद द्यावा, असं वक्तव्य केलं होतं. यावर प्रफुल्ल पटेल बोलत होते. 


जो काम करेल त्याला प्रतिसाद द्या आणि निवडून आणा


महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो. मुख्यमंत्री कोण होईल, यावर चर्चा करणे योग्य नाही. महाविकास आघाडीची सुरुवात इथूनच झाली. महाविकास आघाडीतून चेहरा जाहीर करा, काही लोकं स्वयंमचं जाहीरात करतात की मला काही पाहिजे. सगळ्यांना शुभेच्छा आहे. शेतकरी,  गोरगरिबांसाठी कोण काम करतं. कोण महत्त्वाचा आहे आणि म्हणून या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न केलाय, जो काम करेल त्याला प्रतिसाद द्या आणि निवडून आणा. अशी खोचक टीका राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी महाविकास आघाडी मधील मुख्यमंत्री पदाच्या दावा प्रति दावा आणि त्यानंतर आता महायुतीने मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा यावर केलेल्या वक्तव्यावर केली आहे.


दोन चार दिवसात जागा वाटपाचा तिढा क्लिअर होईल


महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नसल्याची चर्चा असताना जवळपास 225 ते 230 जागांवर एकमत झालं असून उर्वरित जागांबाबत दोन चार दिवसात निर्णय होईल, असा दावा राष्ट्रवादीचे नेते  प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे. जागा वाटपांबाबत मीडियात चर्चा होत आहे. कोण किती जागा मागते, कोण किती जागा पकडून आहे, असं काहींचं नाही. योग्यतेनुसार जागा वाटप होतं चाललेलं आहे. 288 पैकी सव्वा दोनशे, दोनशे तीस जागांवर एकमत आमचं झालेलं आहे. उरलेल्या जागा एकदा फायनल झालं की, पुढच्या दोन चार दिवसात चित्र स्पष्ट होईल, असं वक्तव्य खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केलंय.


हे ही वाचा