भंडारा : हे खरं आहे की, आम्ही आजचं नाही तर यावर अनेक वेळा बोललेलो आहोत की, भाजपसोबत (BJP) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं जावं, हे प्रयोग वेळोवेळी केले गेलेत. मात्र ऐनवेळी त्यात काहीतरी बदल झाला. अजित दादा म्हणतात त्यात काही चुकीचं नाहीये आणि हे आजच बोलले नाही. जेव्हापासून आम्ही महायुतीत गेलो. अनेक वेळी अनेक प्रसंगात अजित दादांनी आणि आमच्यासारख्या अनेक नेत्यांनी याबाबतीत वक्तव्य केलेलं आहे. असं स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल (Praful Patel) यांनी अजित पवार यांनी केलेल्या शरद पवारांच्या संमतीनेचं राजकीय वेगळी चूल मांडल्याच्या वक्तव्यावर पुनरुच्चार केलाय. 


यासोबतच काल उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्याच्या चेहरा कोण आधीच जाहीर करा,असे म्हटले आहे. तर या मधूनच हे स्पष्ट होत आहे की,  तोंडात काही वेगळं आणि पोटात काही वेगळं आहे. हेच काहीतरी चालले आहे. दरम्यान, सकाळचा भोंगा त्यांचीही भाषा आणि सूर बदललेला आहे, अशी टीका करत प्रफुल्ल पटेल यांनी संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधाला आहे.


तत्वाचा आधारहीन आघाडी किती दिवस टिकणार?-  प्रफुल्ल पटेल 


सुरुवातीपासून महाविकास आघाडी ही काही एक वाक्यानं काम करणारी आघाडी नाही. तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, आम्ही सगळे एकत्रचं होतो. बाहेर पडण्याचं हे एक महत्वाचं कारण आहे, एकवाक्यता नसलेली काही संधीसाधून केवळ खुर्चीसाठी तयार केलेली आघाडी आहे. तत्वाचा आधारहीन हे किती दिवस टिकणार आहे आणि त्यामुळं दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राचे किती मोठ नुकसान, महाराष्ट्राच्या विकासाचे, शेतकऱ्यांचा, गोरगरिबांचा होत होता. त्यामुळे आम्ही महाविकास आघाडीमधून बाहेर पडलो आणि महायुतीसोबत आदरणीय मोदिजींच्या नेतृत्वात महायुती प्रेवेश केल्याची खोचक टीका  प्रफुल्ल पटेल यांनी महाविकास आघाडीवर केली. हरियाणाच्या पराभवानंतर सामनामधून काँग्रेसवर टीका करण्यात आली आणि संजय राऊत यांनी काँग्रेस स्वबळावर लढल्यामुळे हरियाणात काँग्रेसचा पराभव झाल्याची टीका केली. यावर प्रफुल्ल पटेल भंडाऱ्यात माध्यमांशी बोलत होते.


235 - 240 जागांच्या आसपास आमच्यात एक वाक्यता


पुढे बोलताना प्रफुल पटेल म्हणाले की, मी तुम्हाला सांगतो, आकड्यावर कुठल्याही जाऊ नका. ही फक्त मीडियामध्ये पसरवलेली चुकीची गोष्ट आहे. एक मी तुम्हाला स्पष्ट सांगू इच्छितो, की तिन्ही पक्षांमध्ये महायुतीच्या चर्चा झालेली आहे. आजपर्यंत 235-240 जागांच्या आसपास आम्ही एक वाक्यता केली आहे. पुढच्या दिवसांमध्ये ज्या उरलेली जागा आहे, त्याच्यावरही चर्चा होणार आहे. तुम्हाला 2-4 दिवसामध्ये दिसेल की याला अंतिम स्वरूप दिला जाईल.  तिन्ही पक्ष योग्यतेनुसार आणि क्षमतेनुसार जागावाटप करतील. असेही प्रफुल्ल पटेल म्हणाले.


आम्हाला निवडणूक जिंकायची आहे. आम्हाला आकडेवारीवर जायचं नाही. त्यामुळे हे पण मान्य करावे लागेल, ही भारतीय जनता पार्टी या महायुतीमध्ये सर्वात मोठा पक्ष आहे. त्यांचे वर्तमान पक्षाचे जर 106 आमदार आहेत तर त्यांच्यासोबत असलेले नऊ आमदार आहेत यांच्याकडे 115 आमदार आज या महायुतीमध्ये आहेत. ज्यांना योग्यता, क्षमता आणि संख्येप्रमाणे पण हे जागा काहिनकाही अधिकच मिळणार आहे, हे आम्हाला मान्य करावं लागेल. आणि त्याच्यात काय चुकीचं नाही. असेही ते म्हणाले. 


हे ही वाचा