PM Narendra Modi In Yavatmal : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या याच दौऱ्याच्या निमित्ताने आज यवतमाळ जिल्ह्यातील अनेक दैनिकांमध्ये महायुतीकडून मोदींच्या स्वागताच्या जाहिराती देण्यात आल्या आहेत. मात्र, नरेंद्र मोदी यांच्या स्वागतच्या महायुतीच्या वर्तमानपत्रातील जाहिरातीत खासदार भावना गवळी (Bhavna Gawli) यांचे फोटो गायब असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदी यांनी भावना गवळी यांच्या हस्ते राखी बांधून त्यांना आपली बहीण मानलेले आहे. त्यामुळे महायुतीच्या जाहिरातीतून 'मोदींच्या बहिणी'चाच फोटो गायब असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे. 


पंतप्रधान मोदी यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असल्याने महायुतीकडून मोदींच्या स्वागताच्या जाहिराती देण्यात आल्या आहेत. यवतमाळ जिल्ह्यात महायुतीच्या जाहिरातीत पालकमंत्री संजय राठोड यांच्यासह सर्व आमदारांचे फोटो आहेत. मात्र, याच जाहिरातमध्ये खासदार भावना गवळी यांचा फोटो नाही. त्यामुळे खासदार गवळींच्या यंदाच्या लोकसभा निवडणुकीतील उमेदवारीवरबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. तर, यावर स्वतः गवळी यांनी खुलासा केला आहे. 


फोटो,जाहिरातमध्ये काहीही नाही : भावना गवळी 


महायुतीकडून मोदींच्या स्वागतासाठी छापण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये भावना गवळी यांचा फोटो नसल्याच्या चर्चेवर बोलतांना भावना गवळी म्हणाल्यात की, “मला असे वाटते की, त्या जाहिरातीत काय पडले आहेत. फोटोमध्ये काय आहे. मोदी येत आहेत त्याचा जल्लोष करा, त्या फोटो आणि जाहिरातमध्ये काहीही नाही, असे म्हणत भावना गवळी यांच्याकडून प्रत्युत्तर देण्यात आले. 


मोदी देशातील कोट्यवधी बहिणीचे भाऊ


मी भाऊ म्हणून मोदी यांना राखी बांधेतच, पण ते देशातील करोडे बहिणीचे देखील भाऊ आहेत. देशातील एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या महिलांबद्दल पहिल्यांदा विचार करणारे व्यक्तिमत्व हे नरेंद्र मोदी यांचे आहे. मोदी या महिलांचे भाऊ आणि पिता देखील आहेत. त्यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे महिलांच्या जीवनात अनेक बदल झाले असल्याने ते आमचे भाऊ आहेत. 


मै अपनी झांसी नही दूंगी...


राज्याच्या बदललेल्या राजकीय समीकरणात महायुतीच्या जागा वाटपात भाजपला यंदा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ यवतमाळ - वाशिम हवा आहे. त्याच अनुषंगाने भाजपचे प्रयत्नही सुरू आहेत. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळला येत असताना भावना गवळी यांचा मतदारसंघ भाजप यंदा आपल्याकडे घेणार की पुन्हा एकदा भावना गवळी यांनाच उमेदवारी मिळणार असा प्रश्न जोरात चर्चेत आहे. त्याच वेळेस भावना गवळी यांनी मी 25 वर्षापासून खासदार आहे, अनेक दिग्गजांना मी या मतदारसंघात धूळ चारली आहे, संसदेमध्ये महिला आरक्षणाचा कायदा होत असताना मला उमेदवारी न देण्याचा विचार येऊच कसा शकतो? ही चर्चा कुठून सुरू होते? वरिष्ठांना असा माझा प्रश्न आहे? असे म्हटले आहे. तसेच, मै अपनी झांसी नही दूंगी, असे सूचक वक्तव्य करत मोदी है तो सब मुमकीन है असही भावना गवळी म्हणाल्या आहेत. 



इतर महत्वाच्या बातम्या : 


पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर; दीड लाखांहून अधिक बचत गटाच्या महिलांना संबोधित करणार