PM Modi Mother Heeraben Death Live Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन अनंतात विलीन

PM Narendra Modi Mother Heeraben Death : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचं आज निधन झालं आहे. वयाच्या 100 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 30 Dec 2022 09:35 AM
Heeraben Modi Death : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन अनंतात विलीन

Heeraben Modi Death : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन अनंतात विलीन झाल्या आहेत. गांधीनगरमधील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पंतप्रधान मोदी आणि त्यांचे धाकटे बंधू पंकज मोदी यांनी हिराबेन यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला.

PM Modi Mother Death : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई श्रीमती हिरा बा यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दु:खद आहे. या कठीण प्रसंगी, मी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना माझ्या मनापासून संवेदना आणि प्रेम व्यक्त करतो."

PM Modi Mother Death : पंतप्रधान मोदी आणि हिराबेन यांच्यातील प्रेम, श्रद्धा आणि जिव्हाळा जगाला दिसायचा : एकनाथ शिंदे

PM Modi Mother Death : पंतप्रधान मोदी जेव्हा जेव्हा त्यांच्या आईला भेटायचे तेव्हा तेव्हा त्या दोघांमधील प्रेम, श्रद्धा, जिव्हाळा जगाला दिसायचा. ते खऱ्या अर्थाने आदर्श माता आणि आदर्श पुत्र आहेत, अशा भावना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केल्या.   

PM Modi Mother Death : पंतप्रधान मोदी यांच्या आईच्या निधनावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शोक व्यक्त केला आहे. "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबा यांचे शंभर वर्षांचे संघर्षमय जीवन हे भारतीय आदर्शांचे प्रतीक आहे. मोदींनी आपल्या जीवनात #मातृदेवोभव आणि हिराबाची मूल्ये आत्मसात केली. पवित्र आत्म्याला शांती लाभो ही प्रार्थना. कुटुंबासाठी माझ्या संवेदना!", असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे.





PM Modi Mother Death : नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात, मोदी आणि त्यांच्या भावाने त्यांना खांदा दिला

PM Modi Mother Death : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली आहे. पीएम मोदी आणि त्यांच्या भावाने त्यांना खांदा दिला.



PM Modi Mother Death : "नरेंद्रभाई, तुमच्या आईच्या निधनाची बातमी ऐकून मला खूप दुःख झाले. आयुष्यात कधीही भरुन न येणारं नुकसाना आहे. आईच्या आत्म्याला चिरशांती लाभो," अशा शद्बात शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

PM Modi Schedule : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचं आज निधन झालं. परंतु पंतप्रधानांच्या नियोजित कार्यक्रमांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. पीएम नरेंद्र मोदी हे पश्चिम बंगालमधील आजच्या नियोजित कार्यक्रमांमध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सामील होतील. या कार्यक्रमांमध्ये कनेक्टिव्हिटीशी संबंधित महत्त्वाच्या प्रकल्पांचा शुभारंभ आणि राष्ट्रीय गंगा परिषदेची बैठक यांचा समावेश आहे.


Heeraben Modi Death : पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या धाकट्या भावाच्या गांधीनगर इथल्या घरी पोहोचले

Heeraben Modi Death : पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचे धाकटे भाऊ पंकज मोदी यांच्या गांधीनगर इथल्या घरी पोहोचले. आई हिराबेन मोदी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्काराची तयारी सुरु आहे.

PM Modi Mother Death : काही वेळातच पंतप्रधान मोदी गांधीनगरमधील आपल्या धाकट्या भावाच्या घरी दाखल होत आईचं अंत्यदर्शन घेणार




PM Modi Mother Death : पंतप्रधान मोदींचे धाकटे भाऊ पंकज मोदी यांचं घर विमानतळापासून 20 मिनिटांच्या अंतरावर आहे. पंतप्रधान काही वेळातच इथे दाखल होत आपल्या आईचे अंत्यदर्शन घेतील. यानंतर हिराबेन मोदी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.





रॉबर्ट वाड्रा यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईच्या निधनावर दु:ख व्यक्त

Heeraben Modi Death : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी एबीपी न्यूजसोबत फोनवरुन संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईच्या निधनावर दु:ख करत कुटुंबियांचं सांत्वन केलं आहे.

PM Modi Mother Death : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांच्या निधनावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. "पंतप्रधान मा.नरेंद्र मोदीजी यांच्या मातोश्री हिराबेन यांचे निधन झाल्याची बातमी ऐकून अतीव दुःख झाले. आम्ही सर्व नरेंद्र मोदीजी यांच्या दुःखात सहभागी आहोत. परमेश्वर त्यांच्या मातोश्रींच्या आत्म्यास सद्गती प्रदान करो हीच प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली," असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.



PM Modi Reached Ahmedabad : पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादला पोहोचले, विमानतळावरुन थेट धाकटे बंधू पंकज मोदी यांच्या घरी जाणार

PM Modi Reached Ahmedabad : पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादला पोहोचले आहेत. विमानतळावरुन ते थेट गांधीनगरमधील त्यांचे धाकटे भाऊ पंकज मोदी यांच्या घरी जाणार आहेत. इथेच हिराबेन मोदी यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं आहे.

PM Modi Mother Death : मातृदेवो भवः ही आपली संस्कृती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबा यांचे निधन अत्यंत दु:खद आहे. हिराबा आणि मोदीजी हे वर्षानुवर्षे आई-मुलाच्या प्रेमाचे अनोखे उदाहरण आहेत. मोदीजी, आईचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी असतील. हिराबा यांना भावपूर्ण श्रद्धांजली!, अशा शब्दात भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी हिराबेन मोदी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला.



PM Modi Mother Death : महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांना भावपूर्ण श्रद्धांजली

PM Modi Mother Death : "माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या मातोश्री श्रीमती हिराबाबेन मोदी यांचे निधन झाल्याचे समजून दुःख झाले. त्याग, समर्पण, निष्काम कर्मयोगी जीवनाचा शतकाचा प्रवास आज संपला. मातृवियोगाचे दुःख मोठे असून ते सहन करण्याची शक्ती पंतप्रधान महोदयांना मिळो. आम्ही सर्व मा. पंतप्रधान आणि मोदी परिवाराच्या दुःखात सहभागी आहोत. स्वर्गीय हिराबाबेन यांना भावपूर्ण श्रद्धांजली." अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.

Heeraben Modi Death : उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बसपा प्रमुख मायावती यांनीही पंतप्रधान मोदींच्या आईच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्वीट केलं आहे की, “पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांच्या निधनाची बातमी अत्यंत दु:खद आहे. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाप्रती माझ्या मनापासून संवेदना. त्यांना आणि त्यांच्या सर्व प्रियजनांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो.



PM Modi Mother Death : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान मोदींच्या आईच्या निधनावर शोक व्यक्त केला असून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी ट्विट केलं आहे की, “मुलासाठी आई ही संपूर्ण जग असते. आईचे निधन हे मुलासाठी असह्य आणि कधीही भरुन न येणारे नुकसान आहे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रींचं निधन अत्यंत दुःखद आहे. प्रभू श्री राम दिवंगत पुण्य आत्म्यास आपल्या पावन चरणी स्थान देवो. ओम शांती!



Heeraben Modi Death : गुजरातचे गृहमंत्री हर्ष सिंघवी अंत्यदर्शनासाठी पोहोचले




Heeraben Modi Death : गुजरातचे गृहमंत्री हर्ष सिंघवी हे हिराबेन मोदी यांच्या अंत्यदर्शनासाठी गांधीनगरमध्ये पोहोचले





Heeraben Modi : पीएम मोदींचे धाकटे बंधू पंकज मोदी यांच्या घरी पार्थिव ठेवलं

Heeraben Modi : हिराबेन मोदी यांचं पार्थिव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धाकटे बंधू पंकज मोदी यांच्या घरी ठेवण्यात आलं आहे. पंकज मोदी यांचं घर गांधीनगरच्या रायसणमधील वृंदावन सोसायटीमध्ये आहे.

PM Modi Mother Death : हिराबेन यांच्यावर गांधीनगरमधील सेक्टर 30 मधील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार

PM Modi Mother Death : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांच्यावर गांधीनगरमधील सेक्टर 30 मधील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहे. त्याआधी त्यांची अंत्ययात्रा निघेल

Heeraben Modi Death : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईच्या निधनावर शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी ट्वीट केलं आहे की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रीच्या निधनाचं वृत्त अतिशय दु:खद आहे. आई ही आपल्या आयुष्यातील पहिली गुरु असते जिला गमावल्याचं दुःख हे सर्वात मोठं असतं. 


 





हिराबेन यांचं पार्थिव घरी आणलं, गांधीनगरमध्येच अंत्यसंस्कार होणार

Heeraben Modi Death : पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांचं पार्थिव घरी आणण्यात आलं आहे. गांधीनगरमध्येच त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांचे पुत्र पंकज मोदी यांच्या रायसणमधील घरापासून सकाळी आठ वाजता अंत्ययात्रा सुरु होईल. तर सेक्टर 30 मधील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. 

PM Modi Mother Death :

आईच्या निधनाची वार्ता समजताच पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळीच अहमदाबादला रवाना झाले आहेत. मात्र आजचे त्यांचे नियोजित कार्यक्रम रद्द होण्याची शक्यता कमी आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे.



पार्श्वभूमी

PM Narendra Modi Mother Heeraben Death : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या आई हिराबेन मोदी (Heeraben Modi) यांचं आज (30 डिसेंबर) निधन झालं आहे. वयाच्या 100 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून हिराबेन यांच्यावर अहमदाबादच्या (Ahmedabad) यूएन मेहता रुग्णालयात (U N Mehta Hospital Ahmedabad) उपचार सुरु होते. आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली


18 जून रोजी हिराबेन यांनी साजरा केला होता 100 वा वाढदिवस


हिराबेन यांनी 18 जून 2022 रोजी आपला 100 वा वाढदिवस साजरा केला होता. आईच्या निधनाची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अहमदाबादकडे रवाना झाले आहेत. 


आईमध्ये नेहमीच त्रिमूर्तीचा भास व्हायचा : नरेंद्र मोदी


हिराबेन यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमध्ये रुग्णालयात येऊन आईची विचारपूस केली होती. हिराबेन यांना श्वास घेण्याचा त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर उपचार सुरु असताना आज त्यांचे निधन झालं. आईच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरुन शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे. आईमध्ये नेहमीच एका त्रिमूर्तीचा भास व्हायचा असं मोदींनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.






मोदींनी 4 डिसेंबर रोजी गांधीनगरमध्ये जाऊन घेतली होती आईची भेट 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 डिसेंबर रोजी गांधीनगरमध्ये आई हिराबेन यांची भेट घेतली होती. पंतप्रधान मोदींनी आईसोबत बराच वेळ गप्पाही मारल्या होत्या. त्यानंतर त्यांनी आईच्या पायाल स्पर्श करत आशीर्वाद घेतले होते. त्यावेळी मोदी आणि त्यांच्या आईसोबतच्या भेटीचे फोटो समोर आले होते. ज्यामध्ये ते हिराबेन यांचे आशीर्वाद घेताना दिसले. मोदींनी जवळपास 46 मिनिटे आईसोबत गप्पा मारल्या होत्या. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांचे जुने चित्र त्यांच्या निवासस्थानातील भिंतीवर देखील आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.