नवी दिल्ली : आपल्यावर सातत्याने हुकूमशहा असल्याचा आरोप केला जातोय, अनेकदा अपमानही केला जातो, पण जगातला कोणता हुकूमशहा इतरांच्या शिव्या खातो? शिव्या खाणारा हुकूमशहा कुठे असतो का असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केला. 'एबीपी माझा'ला एक्स्क्लुझिव्ह मुलाखत देताना नरेंद्र मोदी यांनी हे वक्तव्य केलं. येत्या काळात देशाला जगातली तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था करणार बनवणार असून त्याचा रोडमॅप तयार असल्याचंही मोदी म्हणाले. 


नरेंद्र मोदी म्हणाले की, विरोधक मला हुकूमशहा म्हणतात आणि शिव्या देतात. हुकूमशहाचे इतके अवमूल्यन झाले आहे कुठे होते का? ही व्यक्ती हुकूमशहा असल्याच्या शिव्या ऐकते आणि तरीही काही बोलत नाही. लहानपणापासून मला अपमान सहन करण्याची सवय आहे. मी नेहमी म्हणतो की विरोधक नामदार आहेत आणि मी कामदार आहे. 


चहा थंड झाला की ग्राहक कानाखाली मारायचे


लहानपणी आपण चहा विकायचं काम करायचो, हॉटेलमध्ये नाश्त्याच्या प्लेट धुवायचो असं नरेंद्र मोदींनी सांगितलं. ते म्हणाले की, मी ज्या दुकानात काम करायचो तेही मला कधी कधी शिव्या द्यायचे. कधी कधी कुणाला थंड चहा दिले तर ते कानाखाली मारायचे. त्यावेळी चहाला एक रुपयाही लागत नव्हता. त्यामुळे अशा गोष्टींबद्दल माझी कोणतीही तक्रार नाही.


निकालाच्या दिवशी पंतप्रधान मोदींचा दिनक्रम काय असतो? 


निकालाच्या दिवशी त्यापासून दूर राहण्यासाठी मी जास्त जागरूक असल्याचे नरेंद्र मोदी म्हणाले. त्यादिवशी माझ्या खोलीत कोणीही प्रवेश करत नाहीत. 2002 मध्ये गुजरातमध्ये निवडणुका होत्या. एक वाजता माझ्या घराबाहेर ढोल वाजायला सुरुवात झाली. पक्षाच्या कार्यकर्त्यांना तुम्हाला भेटायचे आहे, असे पत्र मला आले. मग मला कळले की निकाल काय आला असेल. खाली आल्यावर मी छान हार आणि मिठाईची ऑर्डर दिली. यानंतर मी केशुभाई पटेल यांच्या घरी जाऊन त्यांना पुष्पहार अर्पण केला आणि मिठाई खाऊ घालून त्यांचा सत्कार केला. त्यानंतर निकाल साजरा करण्यात आला. निकालाच्या दिवशी मी अलिप्त मूडमध्ये असतो. मी ट्रेंडकडे लक्ष देत नाही आणि परिणामांकडे लक्ष देत नाही. 


गरिबांकडून लुटलेला पैसा त्यांना परत करणार


पंतप्रधान मोदींनी मुलाखतीदरम्यान सांगितले की, मला वाटते की गरिबांचे पैसे त्यांन परत मिळाले पाहिजेत. बिहारमध्ये नोकरीच्या बदल्यात जमिनीचा घोटाळा झाला. ती कोणाची जमीन आहे आणि कोणत्या कुटुंबाला नोकरी मिळाली आहे हे सगळ्यांना माहिती आहे. मी अधिकाऱ्यांना त्यांची जमीन परत करण्याचा मार्ग काढण्यास सांगितले.


तिसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेचा रोडमॅप तयार


जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या रोडमॅपच्या प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "याआधी देशाची अर्थव्यवस्था 11 व्या क्रमांकावर होती, ती आता आम्ही पाचव्या स्थानी आणली. त्यामुळे देशात काय घडते ते पाहणे महत्त्वाचं आहे. यापूर्वी किती किलोमीटरचा रस्ता बांधण्यात आला होता? यापूर्वी गरिबांसाठी किती घरे बांधली गेली? गरिबांना पूर्वी किती धान्य मिळाले? यापूर्वी गरिबांना आरोग्यासाठी कोणत्या सुविधा मिळत होत्या? आज तुम्हाला किती मिळतात? कोणत्याही पॅरामीटरवरून ते पहा. कुटुंबातील एक व्यक्ती कमावते, तर त्या उत्पन्नाचा वापर कसा करायचा यावर कुटुंब आपले बजेट बनवते. जेव्हा दोन लोक कमाई करू लागतात तेव्हा त्याच तारखेपासून त्यांच्या बजेटचे स्वरूप बदलते. जेव्हा अर्थव्यवस्था वाढते, तेव्हा तुमच्याकडे कार्यक्षमता असते. आपण ते चांगले वितरित करू शकता. जेव्हा अर्थव्यवस्था 11 वरून 5 वर जाते तेव्हा तुमचं महत्व वाढतं. जर ती आता पाच वरून तिसऱ्या स्थानी पोहोचली तर भारताची शक्ती वाढेल. यामुळे जगाचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. जर त्यांनी उदारपणे वित्तपुरवठा केला तर ओझे कमी होईल. मला विश्वास आहे की आम्ही घेतलेले निर्णय आणि गेल्या 10 वर्षात आम्ही केलेले ग्राउंड वर्क त्याचा परिणाम आता दिसून येईल. 


ही बातमी वाचा: