एक्स्प्लोर

Shahajibapu Patil: Shahajibapu Patil: मनोज जरांगेंचे आंदोलन बदनाम करण्यासाठी मुंबईत दंगली घडवण्याचा डाव; रसद पुरवून..., शहाजीबापू पाटलांनी मविआवर डागली तोफ

Shahajibapu Patil: मनोज जरांगे यांचे आंदोलन मुंबईत पोचल्यावर महाविकास आघाडीचे काही मराठा नेत्यांनी असा प्रयत्न केला असल्याचा गौप्यस्फोट शहाजी बापू यांनी केला आहे.

सांगोला: मनोज दादा जरांगे यांचे आंदोलन मुंबईत पोचल्यावर दुर्दैवाने काही लोकांनी मुंबईत दंगली घडविण्याचा डाव आखला होता. मुख्यमंत्र्यांनी तातडीने दंगलीसाठी रसत पुरविणाऱ्यांची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी शहाजी बापूंनी केली आहे. मनोज जरांगे यांचे आंदोलन मुंबईत पोचल्यावर महाविकास आघाडीचे काही मराठा नेत्यांनी असा प्रयत्न केला असल्याचा गौप्यस्फोट शहाजी बापू यांनी केला आहे. त्यात नामांकित घराणे आणि त्यातील युवक नेत्याचाही समावेश असल्याचा टोला रोहित पवार यांचे नाव न घेता शहाजी बापू यांनी लगावला आहे. 

असं असलं तरी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला न्याय देत ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता हा प्रश्न सोडवल्याने विरोध करणारे नेते तोंडावर पडले. या आंदोलनाला ज्यांनी भाजी भाकरी चांगली रसद पुरवली त्यांना यश आले आणि ज्यांनी दंगली घडविण्यासाठी रसद पुरवली ते तोंडावर पडले असा टोला लगावला. तर संजय राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना हा संजय राऊतांचा जळफळाट सुरू असून ते वाटच बघत होते, कधी दंगल पेटती आणि हे सरकार अडचणीत येते. मराठा आंदोलन मुंबईत आल्यावर संपूर्ण मुंबईकर विविध पद्धतीची मदत मराठा आंदोलकांना देत असताना लालबागच्या राजाच्या गणपती समोर सुरू असलेली जेवण कोणी बंद केली याचे उत्तर राऊत यांनी द्यावे असा सवाल शहाजी बापू पाटील यांनी केला आहे. 

महायुती सरकार बदनाम करण्याचा प्रयत्न

दुर्दैवाने हे आंदोलन मुंबईत आल्यानंतर काही विरोधी लोकांनी या दंगल घडवून आणण्याचा आणि महायुती सरकार बदनाम करण्याचा प्रयत्न काहींनी अतिशय वेगात केले परंतु या प्रयत्नाला यश आलं नाही. महायुती सरकारमधील देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी मिळून हा प्रश्न अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळला. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मार्ग सुकर केला. हे आंदोलन यशस्वी झालं. दुर्दैवाने कपटनीती करणाऱ्या लोकांना यातून राजकारणाची स्वतःची पोळी भाजण्याचा प्रयत्न केला होता, ते सर्व लोक आज या ठिकाणी उघडे पडले आहेत, माझे स्पष्ट मत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी याची सखोल चौकशी करून यामध्ये कोण समाजकंटक होते आणि या मराठा आंदोलनाला दंगल घडवून मनोज जरांगे यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत होते, ते शोधून काढावे, त्यांना कायद्यानुसार शिक्षा द्यावी असेही पुढे शहाजी बापू पाटील यांनी म्हटलं आहे. 

रसद पुरवून दंगल घडवणारा दुसरा एक वर्ग

मराठा आंदोलनात रसद पुरवणारा प्रामाणिक वर्ग ही होता, आणि रसद पुरवून दंगल घडवणारा दुसरा एक वर्ग होता. त्यामुळे प्रामाणिकपणाने ज्यांनी भाजी भाकरी आंदोलकांना पुरवली. त्या भाजी भाकरीला यश आलं आणि ज्यांनी दंगल घडवण्यासाठी रसद पुरवली होती. ते सगळे उघडे पडले. जे सुरुवातीला अनेक नेते आहेत, नाव घेण्यात अर्थ नाही ते महाविकास आघाडीचे नेते आहेत, मोठ्या घराण्यातील मोठे आणि तरुण काही मंडळी आहेत, ज्यांनी कारण नसताना राजकारणात या आंदोलनाचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवानं त्यांनी तरी असं करायला नको होतं, असं मला वाटतं, असंही पुढे शहाजी बापू पाटील यांनी म्हटलं आहे

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Drought: दुष्काळाची दाहकता! बुलढाणा जिल्ह्यासह राज्यात तातडीने कृत्रिम पावसाच्या प्रयोग राबवा; केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधवांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
दुष्काळाची दाहकता! बुलढाणा जिल्ह्यासह राज्यात तातडीने कृत्रिम पावसाच्या प्रयोग राबवा; केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधवांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
DJ Dolby ban: डीजे आणि डॉल्बीवर बंदी आणतात येणार नाही, साताऱ्याच्या एसपींनी सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले...
डीजे आणि डॉल्बीवर बंदी आणतात येणार नाही, साताऱ्याच्या एसपींनी सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले...
'राहुल गांधी पंतप्रधान पदावर दावा करु शकतात' थेट डाव्या पक्षातील तगड्या नेत्याची 'मन की बात'; राजकीय भूवया उंचावल्या
'राहुल गांधी पंतप्रधान पदावर दावा करु शकतात' थेट डाव्या पक्षातील तगड्या नेत्याची 'मन की बात'; राजकीय भूवया उंचावल्या
Lavani Dance: पारंपरिक लावणीच्या नावाखाली अश्लील डीजे लावणीला लगाम कधी? राष्ट्रवादीचं थेट देवेंद्र फडणवीसांना पत्र, नेमकं काय घडलं?
पारंपरिक लावणीच्या नावाखाली अश्लील डीजे लावणीला लगाम कधी? राष्ट्रवादीचं थेट देवेंद्र फडणवीसांना पत्र, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Pune DJ Morcha : पुण्यात डीजेविरोधात मोर्चा, विद्यानंद बापटांच्या दांडीची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Uposhan : जरांगेंची आरपारची लढाई, मिशन आरक्षण Special Report
Rahul Gandhi on MPSC : MPSC वर भाजपचा ताबा? Special Report
OBC Vs Maratha : 2 सप्टेंबरचा GR रद्द करा, मनोज जरांगेंच्या अंतरवालीत ओबीसी आक्रमक
Raj Thackeray Thane Speech : अमित ठाकरेंनी पंतप्रधानांचा फोटो हटवला; आता राज ठाकरे इशारा देत म्हणाले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur Crime News: नागपूरच्या आमदार निवास परिसरात तरूणाला संपवलं, मध्यरात्री घडली घटना, जुन्या वादातून घटना घडल्याचा संशय; मृतक रेकॉर्डवरचा गुन्हेगार
नागपूरच्या आमदार निवास परिसरात तरूणाला संपवलं, मध्यरात्री घडली घटना, जुन्या वादातून घटना घडल्याचा संशय; मृतक रेकॉर्डवरचा गुन्हेगार
'राहुल गांधी पंतप्रधान पदावर दावा करु शकतात' थेट डाव्या पक्षातील तगड्या नेत्याची 'मन की बात'; राजकीय भूवया उंचावल्या
'राहुल गांधी पंतप्रधान पदावर दावा करु शकतात' थेट डाव्या पक्षातील तगड्या नेत्याची 'मन की बात'; राजकीय भूवया उंचावल्या
DJ Dolby ban: डीजे आणि डॉल्बीवर बंदी आणतात येणार नाही, साताऱ्याच्या एसपींनी सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले...
डीजे आणि डॉल्बीवर बंदी आणतात येणार नाही, साताऱ्याच्या एसपींनी सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले...
Sensex : सेन्सेक्स 250 अंकांनी कोसळला, निफ्टी 24 हजारांच्या खाली, इन्फोसिससह आयटी कंपन्यांना फटका
सेन्सेक्स 250 अंकांनी कोसळला, निफ्टी 24 हजारांच्या खाली, इन्फोसिससह आयटी कंपन्यांना फटका
Lavani Dance: पारंपरिक लावणीच्या नावाखाली अश्लील डीजे लावणीला लगाम कधी? राष्ट्रवादीचं थेट देवेंद्र फडणवीसांना पत्र, नेमकं काय घडलं?
पारंपरिक लावणीच्या नावाखाली अश्लील डीजे लावणीला लगाम कधी? राष्ट्रवादीचं थेट देवेंद्र फडणवीसांना पत्र, नेमकं काय घडलं?
Gokul Election: हसन मुश्रीफांविरोधात शड्डू ठोकलेल्या आमदार शिवाजी पाटलांचा करेक्ट कार्यक्रम? गोकुळमध्ये महायुतीकडून मोठ्या हालचाली
हसन मुश्रीफांविरोधात शड्डू ठोकलेल्या आमदार शिवाजी पाटलांचा करेक्ट कार्यक्रम? गोकुळमध्ये महायुतीकडून मोठ्या हालचाली
ॲमेझॉन कार्गो प्लेन रनवेवरून घसरून थेट पार्किंग झोनमध्ये घुसलं, अनेक कारना धडका देत आगीचा भडका; 5 जणांचा होरपळून अंत
ॲमेझॉन कार्गो प्लेन रनवेवरून घसरून थेट पार्किंग झोनमध्ये घुसलं, अनेक कारना धडका देत आगीचा भडका; 5 जणांचा होरपळून अंत
Video: तिलक वर्मा वैभव सुर्यवंशीला म्हणाला, ' काय उपकॅप्टन, अजून तू बच्चा आहेस, धावा करू शकणार नाहीस...' वैभव सुद्धा जोरदार पलटवार करत म्हणाला, दोघांच्या जुगलबंदीचा व्हिडिओ व्हायरल
Video: तिलक वर्मा वैभव सुर्यवंशीला म्हणाला, ' काय उपकॅप्टन, अजून तू बच्चा आहेस, धावा करू शकणार नाहीस...' वैभव सुद्धा जोरदार पलटवार करत म्हणाला, दोघांच्या जुगलबंदीचा व्हिडिओ व्हायरल
Embed widget