Ahilyanagar अहिल्यानगर: राज्यात होऊ घातलेले विधानसभा (Maharashtra Assembly Election 2024) निवडणुकींचे बिगूल अखेर वाजले आहे. टया अनुषंगाने आता राजकीय घडामोडींना आता वेग आले आहेत. राज्यात महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) असा सामना रंगणार असून अनेक इच्छुकांची नावे दररोज समोर येत आहे. अशातच अहिल्यानगर (Ahilyanagar)जिल्ह्यातील बहुचर्चित पारनेर विधानसभा मतदारसंघात (Parner Assembly Constituency) मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. पारनेरमध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का बसला असून माजी नगराध्यक्ष विजय औटी, धनगर समाजाचे नेते शिवाजीराव गुजर यांच्यासह प्रमुख नेत्यांनी मुंबईत पक्षाध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. 


पारनेरमध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का 


पारनेर विधानसभा मतदारसंघाचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री. सुजित झावरे, माजी बांधकाम सभापती श्री. काशिनाथ दाते, माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखेडे, माजी नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी, धनगर समाजाचे नेते शिवाजीराव गुजर यांनी आपल्या समर्थकांसह जाहीरपणे राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला पक्षप्रवेशामुळे बळ मिळाले आहे. माजी नगराध्यक्ष विजय औटी यांच्यासह बड्या नेत्यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने पारनेरमध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.


पारनेर तालुक्याचे राजकारण बदलणार?


विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीलाच पारनेर विधानसभा मतदारसंघातील माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष  सुजित झावरे, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती  काशिनाथ दाते, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य  माधवराव लामखेडे, पारनेरचे माजी नगराध्यक्ष  विजय  औटी, धनगर समाजाचे नेते  शिवाजीराव गुजर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. परिणामी, या नेत्यांच्या प्रवेशाने पारनेर तालुक्याचे राजकारण बदलणार असल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील शरद पवारांसह खासदार निलेश लंके यांना हा मोठा धक्का असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.  


शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून हर्षदा काकडे इच्छुक


अहिल्यानगरच्या (Ahilyanagar) शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये (Shevgaon Pathardi Assembly Constituency) इच्छुक उमेदवारांची संख्या वाढत आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे यांनी कुठल्याही परिस्थितीत विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी दाखवली आहे. हर्षदा काकडे (Harshada Kakade) यांच्या भूमिकेने भाजपच्या विद्यमान आमदार मोनिका राजळे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. एकेकाळी भाजपच्या जिल्हा परिषद सदस्य राहिलेल्या हर्षदा काकडे यांना 2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपकडून उमेदवारी मिळाली नाही, मात्र आता मिळेल त्या पक्षाकडून उमेदवारी करायची किंवा अपक्ष निवडणूक लढवायची असा निश्चय त्यांनी केला आहे.


हे ही वाचा