पालघर:  पालघर लोकसभेसाठी (Palghar Lok Sabha)  महायुतीच्या (Mahayuti) जागेचा तिढा अजूनही कायम आहे. मनोर येथील रिसॉर्टमध्ये महायुतीच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. मात्र कोणत्याही उमेदवाराच्या बाबतीत चर्चा न होता महायुतीकडून जो उमेदवार दिला जाईल त्याचं काम करावं लागेल असा बैठकीत ठराव करण्यात आला.  पालघर लोकसभेचा महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला असला तरी महायुतीचा उमेदवार अजून ठरलेला नाही. पालघर लोकसभेत शिवसेनेचे राजेंद्र गावीत (Rajendra Gavit) हे खासदार आहेत. खासदार असताना ही अजून नाव  जाहीर केलेले नाही. माञ येथे भाजपानं मागील चार दिवसापासून जिल्हा कार्यालय आणि मेळाव्याचा धडाका सुरु केला आहे. त्यामुळे शिंदेचा हा ही खासदार भाजप आपल्याकडे घेऊन, कमळ चिन्हावर ही जागा लढवली जाणार का? याबाबात आता साशंकता सुरु झाली आहे. 


पालघर लोकसभेत महाविकास आघाडीचा पाच दिवसापूर्वीच उमेदवार घोषित झाला आहे. भारती कामडी यांना उमेदवारी देण्यात आली. त्याच अनुषंगाने त्यांचा पहिला मेळावा 6 एप्रिलला नालासोपा-यात झाला. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते नितीन बानगुडे-पाटील उपस्थित होते. असं असताना अद्याप महाविकास आघाडीच्या उमेदावाराच नावच घोषितच होतं नाही आहे. तरी दुसरीकडे पालघर लोकसभेत भाजपाने प्रचारास आघाडी घेण्यास सुरुवात केली आहे. 4 एप्रिलला नालासोपारा पूर्वेकडील आचोळे येथे जिल्हा कार्यालयाच उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंञी आणि पालघरचे पालकमंञी रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलं. तर रविवारी 7 एप्रिलला भाजपाने विरार पूर्वेला आर.जे. नाक्यासमोर आणि वसई पश्चिमेला झेंडाबाजार येथे दोन महायुतीचे मेळावे ही घेतले. भाजपा प्रचारात आघाडी घेत असली तरी, सध्या राजेंद्र गावीत हे शिवसेना गटाचे खासदार आहेत. त्यामुळे ही जागा शिवसेनेला जाणार आहे. माञ ज्याप्रमाणे भाजपा प्रचारात आघाडी घेत आहे. आणि विद्यमान खासदार राजेंद्र गावीत हे आपल्या कार्यक्षेञात आणि मेळाव्यात फिरत आहेत. त्यावरुन गावितांना कमळाच्या चिन्हावर लढवलं जाणार असं भाकित सध्या राजकीय वर्तुळात केलं जात आहे. 


एक दोन दिवसात पालघरचे चित्र स्पष्ट होणार 


तर पालघर लोकसभेत सहा विधानसभा आहेत. त्यातील तीन विधानसभेवर हितेंद्र ठाकुरांच्या बहुजन विकास आघाडीचे आमदार आहेत. त्यामुळे पालघर लोकसभेत बविआची ( बहुजन विकास आघाडी) महत्त्वाची भूमिका राहणार आहे. बविआने (Bahujan Vikas Aghadhi) पण आपण आपला उमेदवार उभा करणार असल्याचे संकेत दिलेत,असं असताना महायुतीच्या मेळाव्यात बॅनरवर घटक पक्ष म्हणून बविआचं नाव लिहलं जातयं. त्यामुळे एकीकडे आपला उमेदवार उभं करण्याच्या तयारीत असणाऱ्या बविआ विषयी ही संभ्रम लोकांमध्ये निर्माण करण्यात येत आहे. भाजपा आणि शिवसेनेने वरिष्ठ जो ठरवतील त्यांच काम आम्ही करणार असल्याच सांगितलं. तर बविआचे नाव टाकण्याचे आदेश वरिष्ठांनी दिल्याचे सांगितलं आहे. तर भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पाचवा टप्पा असल्याने थोडा उशिरा होतोय, एक दोन दिवसात उमेदवार स्पष्ट होईल असं सांगत, महायुतीचा उमेदवार स्पष्ट झाल्याच सूचक वक्तव्य ही यावेळी केलं. तर स्वतः गावीत यांनी  ही वरिष्ठांनी आपणाला कामाला लागा असं सांगितल्याच सांगितंल आहे. काही तांत्रिक कारणामुळे उमेदवार ठरत नसल्याच सांगून, आपणाला तिस-यांदा उमेदवारी मिळावी म्हणून आपल्या अपेक्षा असल्याच स्पष्ट केलं आहे.


महायुतीचा उमेदवार ठरेना


तर येथे हितेंद्र ठाकूर यांनी आपण ईडी, सीबीआयला घाबरत नसून, कार्यकर्त्यांशी चर्चा करुन लवकर उमेदावार स्पष्ट करणार असल्याचे थेट संकेत दिलेत. तर येथे महायुतीचा उमेदवार ठरेना यावरुन, विरोधकांनी तोंडसुख घेण्यास सुरुवात केली आहे.  यांच्याकडे माझ्याविरोधात उमेदवार मिळेना असं सांगत, मला बिनविरोध करा अशी कोपरखली महाविकास आघाडीचे उमेदवार भारती कामडी यांनी मारली आहे. 


हे ही वाचा :


कल्याण, हातकणंगले ते जळगाव आणि पालघर, ठाकरेंनी उमेदवार जाहीर केलेल्या मतदारसंघात कोण कोण भिडणार?