Uddhav Thackeray Shiv Sena Candidate Second List : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) दुसऱ्या टप्प्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरवात झाली असून, उद्धव ठाकरे गटाने (Uddhav Thackeray Group) देखील आपली उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर केली आहे. यावेळी ठाकरेंनी एकूण चार लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाची घोषणा केली असून, ज्यात कल्याण लोकसभा मतदारसंघ (Kalyan Lok Sabha Constituency), हातकणंगले लोकसभा मतदारसंघ (Hatkanangle Lok Sabha Constituency), जळगाव लोकसभा मतदारसंघ (Jalgaon Lok Sabha Constituency) आणि पालघर लोकसभा मतदारसंघाचा (Palghar Lok Sabha Constituency) समावेश आहे. त्यामुळे आता ठाकरेंनी उमेदवार जाहीर केलेल्या या मतदारसंघात कोण कोण भिडणार? याची देखील चर्चा सुरु झाली आहे. 


कल्याण लोकसभा मतदारसंघ (Kalyan Lok Sabha Constituency) 


कल्याण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार अजूनही जाहीर करण्यात आलेला नाही. मात्र, या मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांना महायुतीकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असे असतानाच श्रीकांत शिंदेंविरुद्ध ठाकरेंनी मोठी चाल चलत गेल्यावेळी मनसेकडून लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराला कल्याणमधून तिकीट दिले आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेकडून कल्याणमधून वैशाली दरेकर यांना लोकसभेचं तिकीट देण्यात आलं आहे. त्यामुळे श्रीकांत शिंदे विरुद्ध वैशाली दरेकर असा थेट सामना कल्याण लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळणार आहे.  


हातकणंगले लोकसभा मतदारसंघ (Hatkanangle Lok Sabha Constituency)


महाविकास आघाडीत मागील काही दिवसांपासून हातकणंगले लोकसभा मतदारसंघावरून खलबत सुरु असल्याचे पाहायला मिळत होते. हातकणंगलेमधून शेतकरी नेते राजू शेट्टी रिंगणात असल्याने महाविकास आघाडी उमेदवार देणार की नाही अशी चर्चा सुरु होती. मात्र, उद्धव ठाकरेंनी सत्यजित पाटील सरुडकर यांना हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. तर, महायुतीकडून धैर्यशील माने किंवा त्यांच्या आई माजी खासदार निवेदिता माने (Nivedita Mane) यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तसेच वंचितकडून राहुल आवाडे (Rahul Awade) मैदानात आहेत. त्यामुळे हातकणंगले लोकसभा मतदारसंघात चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. 


जळगाव लोकसभा मतदारसंघ (Jalgaon Lok Sabha Constituency)


जळगाव लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाने पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार (Karan Pawar) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे जळगाव जिल्ह्याचे विद्यमान खासदार खासदार उन्मेश पाटील यांचे करण पवार निकटवर्तीय आहेत. उन्मेश पाटील यांना डावलून भाजपने स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर केल्याने करण पवार देखील नाराज होते. त्यामुळे त्यांनी देखील भाजपची साथ सोडून उन्मेश पाटील यांच्यासोबत ठाकरे गटात प्रवेश केला. मात्र, त्यांच्याच गळ्यात उमेदवारीची माळ पडली. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात आता करण पवार विरुद्ध स्मिता वाघ असा सामना पाहायला मिळणार आहे. 


पालघर लोकसभा मतदारसंघ (Palghar Lok Sabha Constituency)


पालघर लोकसभेसाठी उमेदवाराबाबतीत सर्वच पक्षांचा तिढा कायम होता. मात्र, यामधील महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा तिढा सुटला असून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून पालघर लोकसभेसाठी भारती कामडी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भारती कामडी या पालघर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आहेत. शिवसेना फुटीनंतर जिल्हा परिषदेतील मोठा गट एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्यानंतरही भारती कामडी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत कायम राहिल्या. त्यांच्या याच निष्ठेचा आज त्यांना मोबदला मिळाला आहे. तर, महायुतीचा उमेदवार अजूनही ठरला नसल्याचे चित्र आहे. महायुतीत राजेंद्र गावित यांच्या नावाची चर्चा असून, त्यांना भाजपच्या स्थनिक नेत्यांचा प्रचंड विरोध होत आहे. तसेच, भाजपकडून विष्णु सवरा यांचे सुपुत्र डॉ. हेमंत सावरा यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे भारती कामडी यांचा सामना डॉ. हेमंत सावरा की राजेंद्र गावित यांच्याशी होणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Vaishali Darekar : ज्या शिवसैनिकांनी श्रीकांत शिंदेंना खासदार केलं, तेच शिवसैनिक आता त्यांना पराभूत करतील, वैशाली दरेकरांनी रणशिंग फुंकलं!