Raju Patil on Vaishali Darekar-Rane : कल्याण लोकसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने वैशाली दरेकर राणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर महायुतीकडून कल्याणची जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुत्र श्रीकांत शिंदे हेच लढणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. दरम्यान गेल्या काही आठवड्यांपासून राज ठाकरेंची मनसे महायुतीमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. आता मनसे आमदार राजू पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत कोणाचं काम करणार याबाबत भाष्य केलं आहे. 


काय म्हणाला राजू पाटील?


मनसेशी गद्दारी करणाऱ्यांचे काम करणार नाही. राज ठाकरे यांचे आदेश येणे बाकी आहे. मात्र ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली आहे, त्यांचं काम करणार नसल्याचे राजू पाटील यांनी स्पष्ट केलं. कल्याण लोकसभेसाठी उबाठा गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर राणे यांनी मनसे पक्षाशी गद्दारी केली आहे. त्यामुळे त्यांना लोकसभेमध्ये मनसे मदत करणार नसल्याचे आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांनी वक्तव्य केले आहे. तयारी आमची नेहमीच असते. 2019 ची निवडणूक तुम्ही पाहिली असेल कल्याण ग्रामीणचा अनुभव बघाल राज साहेबांनी जेमतेम 30 दिवस अगोदर निवडणूक लढवायचे सांगितले. त्या अगोदर आम्ही निवडणुक लढवणार नव्हतो. तुम्हाला आठवत असेल की व्हीव्हीएम वरून आमच्या काही पक्षांसोबत प्रेस झाली होती. त्यामुळे आम्ही महाराष्ट्र सैनिक आहोत, नेहमी तयारच असायला पाहिजे. मी स्वतःही 2014 ला लोकसभा लढलो आहे. त्यामुळे या लोकसभेची बांधणी दाटणी कशी आहे, याचे आम्हाला नॉलेज आहे, असंही राजू पाटील यांनी स्पष्ट केलं. 


लोकसभा हा ट्रेलर आहे खरा पिक्चर दिसेल विधानसभेला 


लोकसभा एकत्र लढत आहेत. विधानसभेला पिक्चर दिसेल. महापालिका निवडणुकीमध्ये यांची युती नसेल मनसे आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील असं भाकीतही राजू पाटील यांनी केलं आहे. लोकसभा हा ट्रेलर आहे खरा पिक्चर दिसेल विधानसभेला आहे. हा त्यांचा विषय आहे. मात्र येणाऱ्या काळात या घटना घडणार आहेत. पालिका लेवलला यांचे गणित बिघडेल, अशी वेळी येईल की त्यावेळी त्यांची युतीही नसेल, असं राजू पाटील यांनी सांगितले. 


कल्याणमध्ये दोन्ही शिवसेना आमने-सामने 


कल्याणमध्ये लोकसभेच्या आखाड्यात एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना आमने-सामने आहे. भाजपचा आमदाराचा विरोध असूनही देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकांत शिंदेंच्या नावाची घोषणा केली आहे. तर उद्धव ठाकरेंनी वैशाली दरेकर यांना राणे यांना मैदानात उतरवले आहे. वैशाली देरकर यांनी 2009 मध्ये यापूर्वी निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभेतून 3 लाखांच्या लीडने दणदणीत विजय मिळवला होता. राष्ट्रवादीच्या उमेदवाराला 2 लाख 15 हजार मतं मिळाली होती तर श्रीकांत शिंदे यांनी 5 लाख 59 मतं मिळवली होती. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर कल्याण आणि ठाण्याची जागा महायुतीसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Shrikant Shinde vs Vaishali Darekar : श्रीकांत शिंदे वि. वैशाली दरेकर, देशाचं लक्ष कल्याणकडे, हायव्होल्टेज लढतीत कुणाची ताकद किती?