Prophet Remarks Row: भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. प्रेषित मोहम्मद यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी त्यांनी आपल्याविरुद्ध नोंदवलेल्या सर्व एफआयआर दिल्लीला हस्तांतरित करण्याची विनंती केली आहे. त्या म्हणाल्या आहेत की, याआधी माझी मागणी फेटाळून लावत सर्वोच्च न्यायालयाने खडे बोल सुनावले होते. माझ्या जीवाला आणखी धोका वाढला आहे. मला बलात्कार आणि खुनाच्या धमक्या मिळत आहेत.
नुपूर शर्मा यांनी एका टीव्ही डिबेट शोमध्ये प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर देशभरात त्यांच्याविरोधात निषेध व्यक्त करण्यात आला होता. यानंतर भाजपने त्यांना निलंबित केले. त्यांच्या विरोधात अनेक राज्यांमध्ये एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. कोलकाता पोलिसांनी त्यांना अनेकदा समन्सही बजावले आहेत. त्यांच्याविरोधात लुकआउट नोटीसही जारी करण्यात आली आहे.
याआधीही नुपूर शर्मा यांनी त्यांच्याविरुद्ध दाखल झालेले सर्व खटले दिल्लीत हलवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने त्यांच्यावर यावेळी कडक टिप्पणी केली होती. त्यांच्या वक्तव्यानंतर देशात पसरलेल्या जातीय हिंसाचाराला त्याच जबाबदार असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली होती. नुपूर शर्मा यांनी देशाची माफी मागावी. न्यायालयाने त्यांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला. यानंतर त्यांनी याचिका मागे घेतली.
सर्वोच्च न्यायालयाच्या टीकेनंतर नुपूर शर्मा यांनी आता असा युक्तिवाद केला आहे की, त्यांना असामाजिक तत्वांकडून पुन्हा बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. यापूर्वीच्या याचिकेत त्यांनी जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचं सांगितलं होतं. त्यांच्याविरोधात दिल्लीत पहिली एफआयआर नोंदवण्यात आली होती. नुपूर शर्मा यांच्याविरोधात दिल्ली, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि तेलंगणामध्ये 9 गुन्हे दाखल आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या:
Presidential Election : राष्ट्रपती निवडणुकीसाठी संसदेत 99.18 टक्के मतदान, राज्यातील 283 आमदारांनी बजावला अधिकार, काय घडलं दिवसभरात?
Rahul Gandhi on GST: देशात नोकऱ्या नाहीत, मात्र केंद्र सरकार फक्त कर वाढवण्यात गुंतली आहे: राहुल गांधी