Shiv Sena MP News Latest Update : शिवसेनेतल्या आमदारांच्या (Shivsena MLA) फुटीनंतर आता शिवसेनेच्या खासदारांचं काय हा प्रश्न उपस्थित होत आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक खासदार नाराज आहेत, त्यांच्याच दबावामुळे राष्ट्रपती निवडणुकीत शिवसेनेला निर्णयही बदलावा लागला. त्यामुळे आता खासदारांच्या नाराजीचा स्फोट कधी होणार याबद्दलही चर्चा सुरु आहेत. 


एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेचे 40 आमदार फुटले. राज्यात सत्तांतर झालं, त्यानंतर आता दिल्लीत त्याचे पडसाद काय उमटणार. खासदार किती फुटणार याची चर्चा जोरात सुरु आहे. आजपासून संसदेचं अधिवेशन सुरु होतंय. त्याचनिमित्तानं या बाबतच्या शक्यतांनी पुन्हा जोर धरला आहे. 


मागच्या आठवड्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्लीत आले होते. याच दरम्यान खासदारांची एक बैठक झाल्याचीही चर्चा होती. लोकसभेत 19 पैकी 14 खासदार हे शिंदे गटासोबत जायला उत्सुक असल्याची चर्चा आहे. महाराष्ट्राप्रमाणे दिल्लीत या बंडामुळे कुठलं सत्तांतर तर होणार नाहीय. पण अनेक महत्वाच्या विषयांवर हे खासदार भाजपला साथ देण्याची शक्यता आहे. 


खासदारांमध्ये चलबिचल कशी सुरु झालीय हे कोल्हापूरच्या उदाहरणावरुनच पाहा. संजय मंडलिक हे काही दिवसांपूर्वी बंडखोरांविरोधात मोर्चा काढत होते. पण आता कार्यकर्त्यांच्या दबावाचं कारण पुढे करत त्यांनी वेगळ्या भूमिकेचे संकेत दिलेत. 


लोकसभेत शिवसेनेचे 19 तर राज्यसभेत 3 असे एकूण 22 खासदार आहेत. महाराष्ट्रात जे सत्तांतराचं नाटय घडलं त्यानंतर मोदी-शाहांचं लक्ष्य 2024 ला खासदारांच्या संख्येवर असणार हे निश्चित. महाराष्ट्रातला आकडा कुठल्याही परिस्थितीत कमी होऊ नये हाच त्यांचा प्रयत्न असणार..त्या पार्श्वभूमीवर आता शिंदे गट किती खासदारांना गळाला लावतो हे पाहणं महत्वाचं. 


संसदेचं अधिवेशन सुरु झालंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही दिल्लीच्या दौऱ्यावर असणार आहेत. त्यामुळे पुढच्या एक दोन दिवसांतच खासदारांबाबत मोठा निर्णय होतो का हे पाहावं लागेल. 


इतर महत्वाच्या बातम्या


Maharashtra Crisis : सत्तासंघर्षावर बुधवारी सुनावणी! अपात्रतेबद्दल सेनेच्या याचिकांवर सुनावणी


येत्या दोन दिवसात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकमेकांना भेटणार? दिपाली सय्यद यांच्या ट्विटमुळं चर्चांना उधाण


ठाकरे-शिंदे एकत्र येण्यावर संजय राऊतांचंही मोठं वक्तव्य, थेटच म्हणाले...