Rahul Gandhi Attack Over GST Rate: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. जीएसटी दर वाढीवरून राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. जीएसटीवरून सरकारला टोला लगावत ते पुन्हा याला 'गब्बर सिंह टॅक्स', असे म्हणाले आहेत. यासोबतच राहुल गांधी यांनी देशातील बेरोजगारीच्या मुद्द्यावरूनही सरकारवर ताशेरे ओढले आहेत. काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले की, ''सरकार फक्त कर वाढवण्यात गुंतले आहे. देशात नोकऱ्या नाहीत.'' केंद्र सरकार जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.


जीएसटीवरून केंद्र सरकारला केलं लक्ष्य 


राहुल गांधी यांनी देशात जीएसटी दर वाढल्यामुळे महाग होणाऱ्या वस्तूंची यादी शेअर करताना या कराचा उल्लेख ‘गब्बर सिंह टॅक्स’ असा केला आहे. राहुल गांधी यांनी म्हणाले आहेत की, "जास्त कर, नोकरी नाही. जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था कशी नष्ट करायची यावर भाजपचा मास्टरक्लास.


दूध, दही आणि पनीरवरही 5 टक्के जीएसटी?


अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखालील जीएसटी परिषदेने दूध, दही आणि पनीर सारख्या पॅकेज केलेल्या खाद्यपदार्थांना 5 टक्के जीएसटी स्लॅबमध्ये आणण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच तांदूळ आणि गहू यांसारख्या अनपॅक केलेल्या वस्तूंनाही 5 टक्के कराच्या कक्षेत आणण्यात आले आहे. आतापर्यंत या वस्तूंना जीएसटीमधून सूट देण्यात आली होती. 


याशिवाय 1,000 रुपयांपेक्षा कमी प्रतिदिन किमतीच्या हॉटेल रूमवर 12 टक्के कर आकारला जाईल. पूर्वी हे सूटच्या श्रेणीत येत होते. तसेच रूग्णालयाच्या 5000 रुपये प्रतिदिन (आयसीयू वगळून) रूम्सच्या भाड्यावर 5 टक्के दराने जीएसटी आकारला जाईल. यासह, सौर वॉटर हीटर्सवर पूर्वीच्या 5 टक्क्यांच्या तुलनेत आता 12 टक्के जीएसटी लागू होईल. एलईडी दिव्यांवर आता 18 टक्के कर आकाराला जाईल. तर आधी12 टक्के जीएसटी लावला जात होता. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनीही सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


GST Rates Hike : महागाईचा भडका, आजपासून अन्नपदार्थांसह 'या' वस्तू महागणार
अदानी समूहाचा मोठा निर्णय, खाद्यतेलाच्या किंमतीत केली 30 रुपयांची कपात