Nitin Gadkari on Ramdas Athawale, नागूपर : "आम्हाला चौथ्यांदा सरकार येण्याची गॅंरटी नाही. मात्र रामदास आठवले (Nitin Gadkari) यांना सरकार येऊन ते पुन्हा मंत्री होण्याची गॅंरटी आहे. सरकार कोणाचेही आले तरी रामदास आठवले (Nitin Gadkari)यांचे मंत्रिपद पक्के आहे",असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे. ते नागपुरात एका पुरस्कार वितरण कार्यक्रमात बोलत होते.
तीनवेळा केंद्रात मंत्रीपद मिळाले आणि चौथ्यांदा सरकार आल्यावर मंत्री होणारच,आठवलेंना विश्वास
मारवाडी फाऊंडेशनर्फे देण्यात येणारा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार आज नागपुरात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते देण्यात आला. त्यावेळी बोलताना रामदास आठवले यांनी त्यांच्या भाषणात आतापर्यंत तीनवेळा केंद्रात मंत्रीपद मिळाले आणि चौथ्यांदा सरकार आल्यावर मंत्री होणारच असे मत व्यक्त केले.
रामदास आठवले राजकारणातील हवामान शास्त्रज्ञ आहेत
रामदास आठवले यांनी मंत्रिपदाबाबत भाष्य केल्यानंतर नितीन गडकरी म्हणाले, आम्हाला चौथ्यांदा सरकार येण्याची गँरटी नाही. मात्र रामदास आठवले यांना सरकार येऊन ते पुन्हा मंत्री होण्याची गॅंरटी आहे. सरकार कोणाचेही आले तरी रामदास आठवले यांचे मंत्रिपद पक्के आहे. रामदास आठवले राजकारणातील हवामान शास्त्रज्ञ आहेत. त्यांना हवा कुठल्या दिशेने चालत आहे याचा अंदाज येतो. लालूप्रसाद यादव हे ही रामविलास पासवान यांच्याबद्दल तसेच म्हणायचे,अशी आठवण ही गडकरी यांनी बोलून दाखवली.
पुढे बोलताना नितीन गडकरी म्हणाले, मी रामदास आठवलेंना मनापासून शुभेच्छा देतो. त्यांना उत्तम आयुष्य आणि निरोगी जीवन प्राप्त व्हावं. आपणा सर्वांच्या वतीने मी प्रार्थना करतो. मला विश्वास आहे की, त्यांचं आयुष्य त्यांनी दलित, पीडित आणि शोषित माणसांसाठी दिलेलं आहे. या माध्यमातून ते सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन करण्यात यशस्वी होतील.
रामदास आठवले पत्रकार परिषदेत काय काय म्हणाले?
संविधान जो मानत नसेल त्याला देशात राहण्याचा अधिकार नाही. कायद्यात बदल किंवा दुरुस्ती म्हणजे संविधान बदलणे नाही. जरांगे यांची मागणी रास्त पण राज्याला हा अधिकार नाही त्यामुळे मराठा समाजासाठी वेगळा प्रवर्ग तयार करता येईल का यावर विचार व्हावा. विधानसभेसाठी 10 ते 12 जागा द्यावी अशी आमची मागणी आहे, चंद्रपूर ची जागा आरपीआय आठवले गटाला देण्यात यावी अशी आम्ही मागणी करणार आहोत, असंही रामदास आठवले म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या
Numerology : प्रचंड श्रीमंत असतात 'या' जन्मतारखेचे लोक; पैसा कसा कमवायचा हे यांना बरोबर ठाऊक, डोक्याने असतात फारच स्मार्ट