Sanjay Shirsat: उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे आकाशवाणी केंद्र तर आहेच, मात्र ते कार्टून चाळे ज्याला म्हणतात ते करण्यामध्ये परफेक्ट असलेला माणूस म्हणजे संजय राऊत (Sanjay Raut) आहे. अशी बोचरी टीका शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केली आहे. संजय राऊत यांची जर आपण प्रेस पाहिली तर असं होतं की ते देशाचं राजकारण चालवतात, अशा अविर्भावात ते बोलतात. मात्र पक्षाचे रोज तुकडे तुकडे पडलेले विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी प्रत्येक पक्षात इनकमिंग सुरू आहे. मात्र यांच्याकडून आउटगोइंग सुरू झाली असल्याचेही ते म्हणाले. ते छत्रपती संभाजी नगर (Chhatrapati Sambhaji Nagar) येथे बोलत होते.
संजय राऊत हे काय ब्रह्मदेव आहेत का?
कोण कोणामुळे पडलं आणि कोण कुणामुळे जिंकून येईल, हे येणाऱ्या विधानसभेत दिसेल.संजय राऊत यांच्या पाठिंब्यामुळे जर काँग्रेस पुढे गेली असेल तर ,काँग्रेसने लक्ष द्यावे.काँग्रेस यांना जुमानत नाही, शेवटच्या घडी महाविकास आघाडी राहणार नाही. संजय राऊतांच्या वक्तव्याला किंमत नसते, ते काहीही बोलतात. असा टोलाही आमदार संजय शिरसाट यांनी संजय राऊतांना लगावला आहे. शेवटच्या क्षणाला महाविकास आघाडी तुटणार असेही संजय शिरसाट यावेळी म्हणाले.
संजय राऊत यांच्या बोलण्याला काहीही किंमत नसते. ते काहीही बोलतात. हे राहणार नाही, ते होणार नाही. ते जे बोलतात त्याच्या विपरीत घडलेलं आजपर्यंतचा इतिहास आहे. त्यामुळे येणारे सरकारसुद्धा महायुतीचेच राहणार आहे. असा विश्वासही संजय शिरसाट यांनी बोलताना व्यक्त केला आहे. संजय राऊत यांच्या बोलल्याने काहही परिणाम होत नाही. त्यामुळे संजय राऊत हे काही ब्रह्मदेव आहेत का? असा सवालही संजय शिरसाट यांनी केलाय. झोपेतून उठून डोळे चोळत चोळत ते जे बोलतात त्याचा राजकारणावर काहीही परिणाम होत नसल्याचेही ते म्हणाले.
राजकारणात कोणतीही गोष्टी अशक्य नाही
आमदार बच्चू कडू यांचा तो आत्मविश्वास आहे. त्यांनी काय रणनीती आखलेली आहे ते त्यांनाच माहिती आहे. म्हणून भविष्यामध्ये असं काहीही घडू शकतं. राजकारणात कोणतीही गोष्टी अशक्य नाही आणि राजकारणात काय घडेल हेही सांगता येत नाही. म्हणून त्यांची ती भविष्यवाणी असेल. त्या उद्देशाने ते बोलले असावे. असे म्हणत राज्यात महाशक्तीचाच मुख्यमंत्री असेल या बच्चू कडू यांच्या दाव्यावर संजय शिरसाट यांनी भाष्य केले आहे.
...तर पहिल्यांदा इम्तियाज जलील यांच्यावर कारवाई करा
इम्तियाज जलील यांनी मोर्चा काढावा. मात्र त्यांचा उद्देश वेगळा आहे. इम्तियाज जलील यांना त्या रामगिरी महाराजांविषयी काहीही घेणं देणं नाही. धर्माशी घेणं देणं नाही. त्यांना आपल्या पक्षाशी घेणं देणं आहे आणि आपली ताकद वाढवण्यासाठी काढलेला तो मोर्चा असणार आहे. त्यामुळे कारवाई करायची असेल तर पहिल्यांदा इम्तियाज जलील यांच्यावर कारवाई करण्यात यावी. एका अर्थाने काँग्रेसची बी टीम होण्यासाठी त्याचा सगळा प्रयत्न सुरू आहे. त्या अर्थाने हा मोर्चा काढला जात असल्याची टीकाही संजय शिरसाट यांनी इम्तियाज जलील यांच्यावर केली आहे.
हे ही वाचा