Numerology : प्रचंड श्रीमंत असतात 'या' जन्मतारखेचे लोक; पैसा कसा कमवायचा हे यांना बरोबर ठाऊक, डोक्याने असतात फारच स्मार्ट

Numerology : अंकशास्त्रानुसार या जन्मतारखेच्या लोकांकडे पैशांची कमी नसते. या व्यक्ती फार हुशार असतात, पैसा कमावण्यात देखील ते आपल्या हुशारीचा वापर करतात.

Continues below advertisement

Numerology Mulank 6

Continues below advertisement
1/9
मूलांक 6 चे लोक डोक्याने फार हुशार असतात. अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 6, 15 किंवा 24 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 6 असतो.
2/9
मूलांक 6 असलेल्या लोकांचं व्यक्तिमत्व खूप खास असतं. मूलांक 6 चा स्वामी शुक्र आहे. 6, 15 किंवा 24 तारखेला जन्मलेल्या मुलांवर शुक्राचा प्रभाव असतो. या जन्मतारखेच्या व्यक्ती फार श्रीमंत असतात, त्यांना कधी पैशाची कमी जाणवत नाही.
3/9
शुक्राच्या प्रभावामुळे हे लोक जीवनात खूप नाव आणि पैसा कमावतात. या मूलांकाशी (Numerology) संबंधित आणखी काही खास गोष्टी जाणून घेऊया.
4/9
हे लोक डोक्याने फार स्मार्ट असल्याने कामात देखील ते त्यांच्या स्मार्टनेसचा वापर करतात. पैसे कसे कमवायचे हे त्यांना बरोबर माहीत असतं. या व्यक्तींकडे एकाहून अधिक उत्पन्नाचे स्रोत असतात.
5/9
मूलांक 6 च्या लोकांना त्यांच्या आयुष्यात चांगली प्रसिद्धी मिळते, अर्थात यासाठी ते लोक तितकीच मेहनत देखील घेतात. मूलांक 6 चे लोक ज्या क्षेत्रात काम करतील तिथे चांगलं नाव कमावतात. समाजात देखील त्यांना विशेष मान दिला जातो.
Continues below advertisement
6/9
मूलांक 6 च्या व्यक्ती दिसायला आकर्षक, सुंदर असतात आणि शारिरीकदृष्ट्या मजबूत असतात. या लोकांना म्हातारपण लवकर येत नाही.
7/9
हे लोक कलाप्रेमींकडे आणि सौंदर्याकडे लवकर आकर्षित होतात. 6, 15 किंवा 24 जन्मतारखेच्या व्यक्ती फार रोमँटिक देखील असतात.
8/9
मूलांक 6 चे लोक आपल्या जोडीदाराला नेहमी आनंदी ठेवतात. ते त्यांच्या रिलेशनमध्ये एक स्पार्क जागा ठेवतात.
9/9
जोडीदाराच्या पडत्या काळात ते खंबीर उभे राहतात आणि साथ देतात. जोडीदाराच्या दु:खात ते त्याची सोबत देतात आणि तिला शांत करतात. (टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Sponsored Links by Taboola