Nitin Gadkari, अमरावती : जो माणूस आदल्या जन्मी पाप करतो तो पुढील जन्मी साखर कारखाना टाकतो किंवा वर्तमानपत्र काढतो, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अमरावती येथील एका वर्तमानपत्राच्या महोत्सवी कार्यक्रमात बोलले. नितीन गडकरींच्या वक्तव्याने सभेत एकच हशा पिकला. 


विरोधात जर वृत्तपत्रात बातमी छापली तर लगेच संपादकांना फोन जातो


गडकरी पुढे म्हणाले की, राजकारण बदलत चाललं आहे, लोकशाही  4 पिल्लरवर उभी आहे , पण त्या चार स्तंभाचा समतोल राहिला नाही तर लोकशाही धोक्यात येते. ज्यावेळी देशावर संकट आले तेव्हा पत्रकारांनी देशाला मार्गदर्शन केले आहे. एखाद्याच्या विरोधात जर वृत्तपत्रात बातमी छापली तर लगेच संपादकांना फोन जातो. जे काही चुकीचं आहे ते मीडियाच छापण्याच काम आहे, ते आपण स्वीकारण्याच काम आहे. चुकीचं लिहण्याचा देखील अधिकार पत्रकारांना आहे, लिहण्याचा अधिकार संपुष्टात येता कामा नये, असेही नितीन गडकरी म्हणाले.


पुढे बोलताना गडकरी म्हणाले,आज आपल्या देशात विचार भिन्नता ही समस्या नाही. विचार शून्यता ही समस्या आहे. साधारण एक प्रथा आहे. जी आपली विचारधारा होती, त्या विचारधारेप्रमाणे बाळासाहेब मराठे यांनी हिंदूस्तानला दिशा दिली. नवीन आमदार बनलो होते. आज हिंदूस्तानने जी पत्रकारीता जोपासली आहे. ती पत्रकारीता आणि विचार आपल्या सर्वांकरता आदरणीय आहेत.  


इंग्लंड आणि अमेरिकेपेक्षा आपली लोकशाही प्रगल्भ आहे. त्यामध्ये वर्तमानपत्राचं कार्य लोकप्रबोधनाचं आहे. मला आठवतं ज्यावेळी देशावर संकट येतं. तेव्हा पत्रकारांनी केलेलं मार्गदर्शन कोणीही विसरु शकत नाही. लोकमान्य टिळकांनी इंग्रजांना वृत्तपत्राच्या ठणकावून सांगितलं होतं.  स्वातंत्र्यानंतरची स्थिती आणि आजची स्थिती यामध्ये बरच अंतर पडलेलं आहे. लोकशाही सदृढ झाली पाहिजे, असंही नितीन गडकरी म्हणाले. 







इतर महत्वाच्या बातम्या 


Video : स्टॉकहोम सिंड्रोम म्हणावं की प्रेमाची जादू, हरवलेला चिमुकला 14 महिन्यांनी सापडला पण किडनॅपरला सोडून जाताना रडायला लागला