Tanaji Sawant, धाराशिव : आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी गाव संवाद दौऱ्यात व्यथा मांडण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याची औकात काढली आहे. कुणाची तर सुपारी घ्यायची आणि कार्यक्रमात उभा राहून बोलायचं, चांगल्या कामात मिठाचा खडा टाकायचा आम्हालाही कळतं,आम्ही xxx चे मोजतो. अवकातीत राहून बोलायचं म्हणत आरोग्यमंत्री तानाजी सावंतांनी ग्रामस्थाला  दम भरला. धाराशिवच्या वाशी तालुक्यातील कोठावळा पिंपळगाव गावात प्रकार घडला. 


गावच्या शेजारी असलेल्या बंधाऱ्यावर दरवाजे बसवल्यास आजूबाजूच्या शेतात पाणी जाईल हे म्हणणे मांडण्यासाठी शेतकरी आला होता.  धाराशिवच्या वाशी तालुक्यातील कोठावळा पिंपळगाव गावात हा प्रकार घडला. प्रसंगावधान राखून पोलिसांनी ग्रामस्थाला  बाजूला नेले. 


शेतकऱ्याला तानाजी सावंत काय म्हणाले ?


शेतकऱ्याने त्यांच मत मांडल्यानंतर सावंत म्हणाले, तुमचं मत लक्षात आलं तुम्ही खाली बसा. मी स्वत: इंजिनिअर आहे, तुम्ही बसा. तुमचं समाधान होण्याशी कारण आहे. तुम्ही आता सांगताय. गेल्या 10 वर्षात तुम्ही बोलले नाहीत, आज बोलताय. आपण विकासाचं बोलण्यासाठी आलोय. विकासाचं ऐका. कोणाची तरी सुपारी घेऊन चांगल्या कामात मिठाचा खडा टाकायचा नाही. गेले 15 वर्ष आपण ब्र शब्द काढला नाही. रस्तावर पाठिभर मुरुम कोणी टाकला पाहिलं नाही. 35 वर्ष फक्त पाण्याचं स्वप्न दाखवलं. 55 टक्के पाणी आपल्या भागात येत आहे. सुपारी घेऊन बोलायचं नाही. ऐकून घेतो म्हणजे काहीही बोलायचं नाही. मी गेल्या पाच वर्षात कोणालाही माघारी पाठवलं नाही. मी विठ्ठलाचा भक्त आहे. 


तानाजी सावंत काय काय म्हणाले? 


तानाजी सावंत म्हणाले, व्यक्ती बघून मतदान करायचं नाही. पाहुण्यांना पाहून मतदान करायचं नाही. भावनिक होऊन तर मतदान अजिबात करायचं नाही. जो आपला प्रश्न सोडवेल. आपल्या लेकरा-बाळाचा प्रश्न सोडवेन. पुढील पिढीचा विचार करुन विकास आणेल. त्यालाच मतदान करायचं. उद्या तानाजी सावंतने इथला विकास नाही केला, तुमचं काम केलं नाही, त्याला वेशीच्या आत येऊ द्यायचं नाही. हे मी स्वत: तुम्हाला सांगतो. विकास होत असेल विकास केला असेल तरच मतदान करायचं. हे मी सांगतोय. 


पुढे बोलताना सावंत म्हणाले, बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल. गेले 30 ते 35 वर्ष तुम्हाला झुलवत ठेवलं. विकास कागदावर आणि फ्लेक्सवर दाखवायचा. तुम्ही मतदान केलं की पाच वर्ष गायब व्हायचं. 


इतर महत्वाच्या बातम्या


Madha : सहावेळा आमदार झालोय, आता मुलाला निवडून द्या; अजितदादांच्या आमदाराची मतदारांना साद