Jaipur : राजस्थानमधून एक आश्चर्यकारक प्रकार समोर आलाय. एका चिमुकल्याचे 14 महिन्यांपूर्वी अपहरण करण्यात आले होते. दरम्यान, 14 महिन्यांनंतर चिमुकला सापडला. अपहरणकर्त्यालाही पोलिसांनी पकडलं. त्यानंतर चिमुकल्याला अपहरणकर्त्यांकडून सोडवून पालकांकडे सोपवताना आश्चर्यकारक प्रकार घडलाय. चिमुकला अपहरणकर्त्याला गच्च मिठ्ठी मारुण रडायला लागला. मुलाला रडताना पाहून आरोपीलाही भावना आवरता आल्या नाहीत. तोही रडू लागला. या आश्चर्यकारक प्रकाराचा व्हिडीओ समोर आलाय. 





अधिकच्या माहितीनुसार, 14 महिन्यांपूर्वी जयपूरमध्ये एका मुलाचे अपहरण झाले होते. तब्बल 14 महिन्यांनंतर पोलिसांनी मुलासह आरोपीला पकडले. मुलाला ताब्यात देण्याची वेळ आली तेव्हा अपहरणकर्त्याला सोडायला मुल तयार नव्हते. अशा परिस्थितीत पोलिसांनी आरोपीला चिकटलेल्या मुलाला बळजबरीने सोडवून कुटुंबियांच्या ताब्यात दिले. मुलाला रडताना पाहून अपहरणकर्ताही रडू लागला.


काय आहे संपूर्ण प्रकरण?


गेल्या वर्षी 14 जून रोजी 11 महिन्यांच्या पृथ्वी उर्फ ​​कुक्कूचे जयपूरच्या सांगानेर येथून अपहरण करण्यात आले होते. तब्बल 14 महिन्यांनंतर पोलिसांनी अपहरणकर्त्याला अटक करून त्याच्या ताब्यातून मुलाला सोडवले. यावेळी मुलाला त्याच्या पालकांच्या ताब्यात देण्याची वेळ आली, तेव्हा तो जोरजोरात रडू लागला. हे दृश्य पाहून पोलिसांचेही डोळे पाणावले.


मुलाला कोणतीही इजा झाली नाही, आरोपीने नवीन कपडे आणि खेळणीही दिली


सुमारे 14 महिने मुल आरोपीच्या ताब्यात होते, मात्र मुलाला कोणतीही इजा झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. उलट आरोपीने मुलाची काळजी घेतली आणि त्याला नवीन कपडे आणि खेळणीही विकत दिली. रिपोर्टनुसार, तनुज चहर असे आरोपीचे नाव असून तो उत्तर प्रदेश पोलिसात हेड कॉन्स्टेबल होता, त्याला सध्या निलंबित करण्यात आले आहे. मुलाचे अपहरण केल्यानंतर त्याने त्याचे तो पूर्णपणे बदलला आणि दाढी-मिशा वाढवून आणि भगवे वस्त्र परिधान करून संत म्हणून जगू लागला. मात्र, पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचले आणि जयपूर पोलिसांनी त्याला अलीगडमधूनच अटक केली.


कशामुळे केले होते अपहरण?


जयपूर दक्षिणचे अतिरिक्त डीसीपी पारस जैन यांच्या म्हणण्यानुसार, आरोपी तनुज चहरला अपहरण झालेल्या मुलाची पृथ्वीची आई पूनम चौधरी आणि पृथ्वी उर्फ ​​कुक्कूला आपल्यासोबत ठेवायचे होते. परंतु पूनमला आरोपीसोबत जायचे नव्हते. त्यामुळे तनुजने त्याच्या साथीदारांसह 14 जून 2023 रोजी 11 महिन्यांच्या मुलाचे अपहरण केले. या घटनेनंतरही आरोपी हेड कॉन्स्टेबल तनुज पूनमवर सतत दबाव आणत होता, ज्यामुळे तिला यूपी पोलिसातील नोकरी गमवावी लागली होती.


इतर महत्वाच्या बातम्या 


Pune Crime News: पुण्याच्या मुठा नदीतील त्या मृतदेहाचं गूढ उकलेना; पोलिसांना क्लू सापडेना, तपासासाठी आकाशात ड्रोन फिरवला