एक्स्प्लोर

Nitesh Rane meets Parth Pawar: घरातला कर्ता माणूस गेलाय ओ, जरा भान ठेवा, नीचपणे वागू नका; नितेश राणेंची संजय राऊतांवर आगपाखड

Sanjay Raut on Ajit Pawar plane Crash: भाजपच्या भ्रष्टाचाराच्या फाईल माझ्याकडे आहेत, असं अजित पवारांनी १५ जानेवारीच्या एका भाषणात सांगितलं होतं. हे पुरावे अजित पवार स्वत:जवळ ठेवत.

Nitesh Rane and Sanjay Raut: अजित पवार यांनी भाजपच्या भ्रष्टाचाराचा उल्लेख केल्यानंतर 10 दिवसांमध्ये त्यांच्या विमानाचा अपघात झाला. अजित पवार भाजपच्या (BJP) भ्रष्टाचाराची फाईल नेहमी त्यांच्यासोबत घेऊन फिरायचे. अपघाताच्या दिवशीही ही फाईल विमानामध्ये असावी, असा संशय ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बोलून दाखला होता. त्यांच्या या वक्तव्याचा भाजपचे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी समाचार घेतला. अजित पवार यांना जाऊन फक्त चार-पाच दिवस झालेत. त्यावर तरी राजकारण करु नका, असे नितेश राणे यांनी म्हटले. नितेश राणे यांनी मंगळवारी बारामती येथे जाऊन पवार कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

अजितदादा यांना जाऊन आता जेमतेम 3 ते 4 दिवस झाले. त्यावर तरी राजकारण करू नका. त्यांच्या आत्म्याला जरा शांती मिळू द्या. हे सगळे विषय नंतर बोलता येत नाहीत का? काय घाई लागली आहे तुम्हाला? कुठले तर्क लावताय तुम्ही? काय संबंध आहे अमित शहांचा आणि पवार साहेबांच्या पक्षाचा? पवार कुटुंबाची अवस्था बघा. मी त्यांच्या घरात जाऊन आलो. तेवढीही माणुसकी संजय राऊतांनी दाखवली नाही. मी घरात जाऊन आलोय. काय अवस्था आहे ना त्या घराची, जाऊन त्यांनी बघून यावी आणि मग टीका करावी. सगळीकडे राजकारण? काहीतरी भान ठेवा. अगोदर आपण माणूस आहोत, मग कोण राजकारणी, कोण खेळाडू आहे. सगळीकडे राजकारण बरोबर नाही. एवढा नीचपणा राजकारणामध्ये पण बरोबर नाही. कुठेतरी स्तर राजकारणाला असला पाहिजे. कुठेतरी मर्यादा असल्या पाहिजेत. माणूस गेलाय हो, कर्ता माणूस घरातला गेलाय. जरा तरी भान ठेवा. सगळीकडे नीचपणाने वागू नका. महाराष्ट्राच्या कल्चरसाठी पण बरोबर नाही. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, असे नितेश राणे यांनी म्हटले.

सगळीकडे राजकारण करणं बरोबर नाही. संजय राऊत यांना फिलिंग्स आहेत का कोणाच्या कुटुंबाबद्दल? मी त्या माणसाच्या प्रश्नांना उत्तर का देऊ? आणि कुठली फाईल, कुठे आहे? हे संजय राऊतांना कोण सांगून करतंय का? अशाने संजय राऊत यांना कोण विचारणार नाही, असे नितेश राणे यांनी म्हटले.

आणखी वाचा

ऑपरेशन लोटसच्या माध्यमातून अजित पवारांचं काही बरंवाईट...; संजय राऊतांच्या 'त्या' कुशंकेने चर्चांना उधाण

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुम्ही गद्दार म्हणत राहा; तुमचा पक्ष संपतोय, शिंदेंचे आमदार-खासदार वाढतायत, रामदास कदमांचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल
तुम्ही गद्दार म्हणत राहा; तुमचा पक्ष संपतोय, शिंदेंचे आमदार-खासदार वाढतायत, रामदास कदमांचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
सत्तरीनंतर निवृत्तीची शाल पांघरली पाहिजे असं मोहन भागवतांनी सांगितलं होतं, पण मोदींनी सत्तरी ओलांडली तरी... अंधारेंचा टोला
सत्तरीनंतर निवृत्तीची शाल पांघरली पाहिजे असं मोहन भागवतांनी सांगितलं होतं, पण मोदींनी सत्तरी ओलांडली तरी... अंधारेंचा टोला

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Embed widget