Manoj Jarange & Nitesh Rane: देवेंद्र फडणवीसांच्या आईबद्दल अपशब्द काढल्यास आम्ही वळवळणारी जीभ हातात काढून...; नितेश राणेंचा मनोज जरांगेंना इशारा
Nitesh Rane & Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांनी आपण देवेंद्र फडणवीस यांच्या आईविषयी अपशब्द उच्चारल्याचा दावा फेटाळून लावला आहे. चित्रा वाघ, नितेश राणेंची टीका

Nitesh Rane & Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटीवरुन मुंबईच्या दिशेने मोर्चा काढण्याच्या तयारीत असलेले मनोज जरांगे पाटील आणि भाजप नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी रविवारी बीडमध्ये झालेल्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या आईविषयी अपशब्द उच्चारल्याचा आरोप भाजप (BJP) नेत्यांकडून केला जात आहे. भाजपच्या नेत्यांकडून आज सकाळपासून सोशल मीडियावर यासंदर्भात पोस्ट टाकल्या जात आहेत. या सगळ्या वादात आता भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उडी घेतली आहे. त्यांनी भाजपच्या अन्य नेत्यांच्या पुढे जात मनोज जरांगे पाटील यांना टोकाचा इशारा दिला आहे.
जे रक्ताने मराठा असतात ते कधीच कुणाच्या आईबद्दल अपशब्द वापरत नाहीत. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण आदर करतो, त्यांनीही कायम कोणाच्याही आई-बहिणींचा आदर केला. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाची लढाई लढावी. मात्र, आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आईबद्दल अपशब्द उच्चारण्याची हिंमत कोणी करत असेल तर ती वळवळणारी जीभ हातात काढून देण्याचे सामर्थ्य आमच्यासारख्या 96 कुळी मराठ्यांमध्ये आहे, हे मनोज जरांगे यांनी लक्षात ठेवावे, असा इशारा नितेश राणे यांनी दिला. या टीकेला आता मनोज जरांगे पाटील काय प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
Manoj Jaragne Patil: मनोज जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले?
मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईविषयी काही बोललोच नाही. मी त्यांच्या आईवर कुठे आणि केव्हा बोललो. परंतु बोलण्याच्या ओघातून माझ्या तोंडातून तसा काही शब्द गेला असेल तर तो मी माघारी घेईन, असे वक्तव्य मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केले.पण मग देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांना आरक्षण (Maratha Reservation) द्यावे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले. ज्या पोलिसांना सस्पेंड करायला पाहिजे होते, त्यांना तू मोठी पदं दिली. पोलिसांनी आमच्या आई-बहिणींना मारले तेव्हा त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. तुझी आई तुला प्रिय आहे तशी आम्हाला आमची आई प्रिय आहे. तू मराठ्यांना आरक्षण दे तुझ्या आईची पूजा करतो, असेही मनोज जरांगे यांनी म्हटले.
आणखी वाचा
आमची आई रक्ताच्या थारोळ्यात पडली तेव्हा कुठे झोपली होतीस? मनोज जरांगें चित्रा वाघांवर संतापले

























