एक्स्प्लोर

नितेश राणे म्हणाले, फक्त हिंदूंशीच व्यवहार करा; मुस्लिमांबद्दलची वक्तव्यं खपवून घेणार नाही, अजितदादांचा थेट इशारा

Nitesh Rane: भाजप नेते नितेश राणे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. फक्त हिंदूंसोबतच व्यवहार करा, सर्वधर्मसमभाव मानू नका, असं नितेश राणे म्हणाले आहेत.

Nitesh Rane Controversial Statement: मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांच्या (Vidhan Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं सत्र पाहायला मिळत आहेत. एकीकडे विरोधक सातत्यानं सत्ताधाऱ्यांना फैलावर घेत आहेत. तर, दुसरीकडे सत्ताधारी विरोधकांना सडेतोड उत्तरं देत आहेत. पण, अशातच भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे विरोधकांकडून टीकेची तोफ डागली जात आहे. मात्र, सत्ताधारी महायुतीची पुरती गोची झाल्याचं पाहायला मिळत आहे. नितेश राणेंच्या वक्तव्याचा समाचार विरोधकांसोबतच महायुतीतील नेत्यांनी देखील घेतल्याचं पाहायला मिळत आहे. 

भाजप नेते नितेश राणे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. फक्त हिंदूंसोबतच व्यवहार करा, सर्वधर्मसमभाव मानू नका, असं नितेश राणे म्हणाले आहेत. मुस्लिमांसोबत व्यवहार करु नका, असं सांगताना त्यांनी खालच्या भाषेत टीका केली आहे. दरम्यान, नितेश राणेंच्या वक्तव्यावरुन अजित पवारांनी संताप व्यक्त केला आहे. एखाद्या समाजघटकाविरोधातली वक्तव्य खपवून घेणार नाही, असं अजित पवार म्हणाले आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेनंही नितेश राणे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. नितेश राणेंना खतपाणी घालून जातीय तेढ निर्माण करण्याचं षडयंत्र भाजपनं केल्याचं ठाकरेंच्या शिवनसेनेचे नेते शरद कोळी म्हणाले आहेत. 

काय म्हणालेले नितेश राणे? 

फक्त हिंदूंसोबतच व्यवहार करा, सर्वधर्मसमभाव मानू नका, असं वादग्रस्त वक्तव्य भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी केलं आहे. मुस्लिमांसोबत व्यवहार करु नका, असं सांगताना नितेश राणे खालच्या भाषेत टीका केली. त्यांच्या याच वक्तव्यावरुन विरोधकांसोबतच त्यांच्या मित्रपक्षांकडूनही त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. 

एकीकडे नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य, तर दुसरीकडे त्यांच्याच मित्रपक्षाकडून मुस्लिम महिलांना बुरखा वाटप

एकीकडे नितेश राणे मुस्लिमांसोबत व्यवहार करु नका असं सांगत आहेत. मात्र, दुसरीकडे त्यांच्याच महायुतीतल्या आमदार यामिनी जाधव यांनी मुस्लिम महिलांना बुरखा वाटप केलं आहे. यामिनी जाधव या शिंदेंच्या शिवसेनेच्या भायखळ्याच्या आमदार आहेत. या संदर्भातला एक बॅनर मुंबईतल्या भायखळा भागात लावण्यात आला होता. हा बॅनर सध्या जोरदार व्हायरल होत आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत मुस्लिमांची मतं मिळवण्यासाठी यामिनी जाधव यांनी बुरखा वाटप केलं का? अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत. बुरखा वाटप कार्यक्रमामुळे स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या शिंदेंच्या शिवसेनेला अचानक मुस्लिमांची आठवण कशी झाली? असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जातोय. भाजपनंही यामिनी जाधवांच्या बुरखा वाटप कार्यक्रमावर आक्षेप घेतला आहे. 

दरम्यान, व्यवहार करताना फक्त हिंदुंशीच करा, असं म्हणत नितेश राणेंनी गरळ ओकली आहे. आणि त्यावरून आता राजकीय आरोप सुरू झाले आहेत. तर दुसरीकडे शिंदे गटाच्या नेत्या यामिनी जाधव यांनी बुरख्यांचं वाटप केलं आहे. तर तिसरीकडे ठाकरे गट यंदा मुस्लिम उमेदवार देण्याची शक्यता असल्याची माहिती समोर येत आहे. एकूणच सध्याचं राजकारण या ना, त्या कारणानं मुस्लिम विषयाभोवती फिरताना दिसतंय. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'जरांगेंना बिग बॉसमध्ये घ्या' ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना टोला, म्हणाले, 'या माणसाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री..'
'जरांगेंना बिग बॉसमध्ये घ्या' ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना टोला, म्हणाले, 'या माणसाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री..'
Shivdeep Lande: बिहारचा सिंघम IPS शिवदीप लांडेंचा पोलीस सेवेतून राजीनामा, कारण गुलदस्त्यात, पुढे काय करणार?
बिहारचा सिंघम IPS शिवदीप लांडेंचा पोलीस सेवेतून राजीनामा, कारण गुलदस्त्यात, पुढे काय करणार?
Lebanon Pager Serial Blasts : 'मोसाद'च्या 3 ग्रॅम स्फोटकात 5 हजार जीव होरपळले; निष्पाप माणसं मारत सुटलेल्या इस्त्रायलला युद्धाचा नियम लागू होत नाही का?
'मोसाद'च्या 3 ग्रॅम स्फोटकात 5 हजार जीव होरपळले; निष्पाप माणसं मारत सुटलेल्या इस्त्रायलला युद्धाचा नियम लागू होत नाही का?
Sarkari Yojana : काय आहे PM आशा योजना? सरकारनं केली 35000 कोटींची तरतूद, शेतकऱ्यांना होणार फायदा
काय आहे PM आशा योजना? सरकारनं केली 35000 कोटींची तरतूद, शेतकऱ्यांना होणार फायदा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Buldhana CM Eknath Shinde Welcome : बुलढाण्यात मुख्यमंत्र्यांचं स्वागत, कार्यकर्त्यांची मोठी गर्दीAmaravati Textiles Park :उद्या अमरावती टेक्सटाईल पार्कचं भूमिपूजन, मोदींच्या हस्ते उद्या ई-भूमिपूजनRatnagiri Khed Case : स्वप्नातील गोष्ट खरी ठरली कोकणातल्या खेडमधील प्रकारMNs Worli Vision : मनसेकडून व्हिजन वरळी कार्यक्रमाचं नियोजन, आदित्य ठाकरेंनाही निमंत्रण देणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'जरांगेंना बिग बॉसमध्ये घ्या' ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना टोला, म्हणाले, 'या माणसाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री..'
'जरांगेंना बिग बॉसमध्ये घ्या' ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना टोला, म्हणाले, 'या माणसाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री..'
Shivdeep Lande: बिहारचा सिंघम IPS शिवदीप लांडेंचा पोलीस सेवेतून राजीनामा, कारण गुलदस्त्यात, पुढे काय करणार?
बिहारचा सिंघम IPS शिवदीप लांडेंचा पोलीस सेवेतून राजीनामा, कारण गुलदस्त्यात, पुढे काय करणार?
Lebanon Pager Serial Blasts : 'मोसाद'च्या 3 ग्रॅम स्फोटकात 5 हजार जीव होरपळले; निष्पाप माणसं मारत सुटलेल्या इस्त्रायलला युद्धाचा नियम लागू होत नाही का?
'मोसाद'च्या 3 ग्रॅम स्फोटकात 5 हजार जीव होरपळले; निष्पाप माणसं मारत सुटलेल्या इस्त्रायलला युद्धाचा नियम लागू होत नाही का?
Sarkari Yojana : काय आहे PM आशा योजना? सरकारनं केली 35000 कोटींची तरतूद, शेतकऱ्यांना होणार फायदा
काय आहे PM आशा योजना? सरकारनं केली 35000 कोटींची तरतूद, शेतकऱ्यांना होणार फायदा
Ashwini Jagtap: अश्विनी जगताप शरद पवार गटात जाण्याची चर्चा, अखेर स्पष्टच बोलल्या, ' दीराला उमेदवारी मिळाली तर मग मी..'
अश्विनी जगताप शरद पवार गटात जाण्याची चर्चा, अखेर स्पष्टच बोलल्या, ' दीराला उमेदवारी मिळाली तर मग मी..'
Rakhi Sawant : घर विकलं अन् म्युझिक अल्बम बनवला, किंग खाननेही केलं होतं राखीचं कौतुक...
घर विकलं अन् म्युझिक अल्बम बनवला, किंग खाननेही केलं होतं राखीचं कौतुक...
Success Story: लाखोंच्या कमाईला कोथिंबिरीचा सुवास! केवळ 50 गुंठ्यातून शिरुरच्या या शेतकऱ्यानं महिन्याभरात कमवले...
लाखोंच्या कमाईला कोथिंबिरीचा सुवास! केवळ 50 गुंठ्यातून शिरुरच्या या शेतकऱ्यानं महिन्याभरात कमवले...
Liquor Policy: मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
Embed widget