Nilesh Lanke on Sujay Vikhe : विखे कुटुंबांची हीच खासियत, त्यांना पराभव मान्यच नाही, यांच्या आजोबांनी हेच केलं, निलेश लंकेंचा हल्लाबोल
Nilesh Lanke on Sujay Vikhe, Ahmednagar : "देशात एवढे खासदार निवडून आले, मात्र त्यांच्याबाबत कोणी आक्षेप घेतला नाही. विखे कुटुंबांची हीच खासियत आहे, त्यांना पराभव मान्यच नाही. यांच्या आजोबांनी हेच केलं आणि हे देखील तेच करत आहे", असं म्हणत अहमदनगर दक्षिणचे खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी भाजप नेते सुजय विखे (Sujay Vikhe) यांच्यावर निशाणा साधला.
Nilesh Lanke on Sujay Vikhe, Ahmednagar : "देशात एवढे खासदार निवडून आले, मात्र त्यांच्याबाबत कोणी आक्षेप घेतला नाही. विखे कुटुंबांची हीच खासियत आहे, त्यांना पराभव मान्यच नाही. यांच्या आजोबांनी हेच केलं आणि हे देखील तेच करत आहे", असं म्हणत अहमदनगर दक्षिणचे खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी भाजप नेते सुजय विखे (Sujay Vikhe) यांच्यावर निशाणा साधला. निलेश लंके यांनी आज अहमदनगर महापालिकेमध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची आढावा बैठक घेतली. त्यानंतर ते बोलत होते. सुजय विखे यांनी ही ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅड पडताळणीची मागणी केली आहे, सोबतच प्रचारादरम्यान निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी आपली बदनामी केलाचा आरोप देखील विखे यांनी केला आहे. त्यावर बोलताना निलेश लंके यांनी जोरदार टीका केली आहे.
त्यांच्याकडे कुठलेही काम नाही म्हणून कोर्ट कचऱ्याचे काम त्यांच्याकडे देऊन टाकले
निलेश लंके म्हणाले, पाच वर्षासाठी मी लोकसभेचा खासदार म्हणून निवडून आलो आहे. त्यामुळे माझ्याकडे काम आहे की या मतदारसंघात विकासाचे गंगा घराघरापर्यंत कसे पोहोचेल हा भाग माझ्याकडे आहे. त्यांच्याकडे कुठलेही काम नाही म्हणून कोर्ट कचऱ्याचे काम त्यांच्याकडे देऊन टाकले आहे, असं म्हणत निलेश लंके यांनी नाव न घेता सुजय विखे यांच्यावरती टीका केली.
इंदुर सारखी महापालिका स्वच्छतेच्या बाबतीत देशात एक नंबर येऊ शकते, तर आपले महानगरपालिका का नाही?
राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके यांनी आज अहमदनगर महापालिकेमध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची आढावा बैठक घेतली. येत्या घातलेल्या काळात अहमदनगर शहरात विविध नागरी समस्या कशा सुटतील यासाठी आमचा प्रयत्न असेल, असे निलेश लंके यावेळी म्हणाले. जर इंदुर सारखी महापालिका स्वच्छतेच्या बाबतीत देशात एक नंबर येऊ शकते, तर आपले महानगरपालिका का नाही? असा सवालही निलेश लंके यांनी केला. शिवाय त्यासाठी आम्ही अधिकाऱ्यांना दोष न देता सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याचेही ते म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या