एक्स्प्लोर

NEET Maharashtra Protest: वर्षा बंगल्यावर अतिरिक्त बंदोबस्त तैनात, मंत्रालय परिसरात कडक सुरक्षा; मुख्यमंत्री, मंत्री, आमदारांच्या सुरक्षेत वाढ, निवासस्थानी सुद्धा बंदोबस्त; सरकारच्या निर्णयावर संजय राऊतांची खोचक टिप्पणी

NEET Maharashtra Protest: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’वर अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

NEET Maharashtra Protest: दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला महाराष्ट्रातून सर्वाधिक बळं मिळालं आहे. मुंबईपासून ते पुण्यापर्यंत ते संपूर्ण महाराष्ट्रात हजारो विद्यार्थ्यांचा आक्रोश सुरु आहे. या सर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिसांनी राज्यभर सतर्कतेचा इशारा देण्यात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह, मंत्री, आमदार आणि महत्त्वाच्या शासकीय इमारतींच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. 

वर्षा निवासस्थानी अतिरिक्त बंदोबस्त तैनात 

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’वर अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याही शासकीय निवासस्थानाची सुरक्षा वाढविण्यात आली असून, मंत्री, खासदार आणि आमदारांच्या निवासस्थानी सुद्धा अतिरिक्त पोलिस तैनात करण्यात आला आहे. इतकेच नाही, तर मंत्रालय परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. संवेदनशील ठिकाणी ‘एसआरपीएफ’च्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. 

गद्दार मंडळीनी तर भुमिगत व्हावे

दरम्यान, वाढवण्यात आलेल्या बंदोबस्तावर खासदार संजय राऊत यांनी खोचक टिप्पणी केली आहे.  राऊत यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, गृहमंत्री म्हणून देवेंद्रजी यांनी घेतलेला आता पर्यंतचा visionery निर्णय आहे. सर्व मंत्री व सरकारी आमदार खासदाराना माझी ही विनंती आहे बाहेर फिरू नका, घरीच रहा  धोका पत्करू नका, बाहेर वादळ घोंगावत आहे. गद्दार मंडळीनी तर भुमिगत व्हावे.  

मुंबईत ऐतिहासिक 'तिरंगा मोर्चा'

दुसरीकडे, राजधानी मुंबईत शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेकडून शिवाजी पार्कवर तिरंगा मार्च काढण्यात आला.  यात कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा न वापरता केवळ राष्ट्रध्वज तिरंगा हातात घेऊन हजारो तरुण सहभागी झाले होते. आमदार आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे या दोन्ही युवा नेत्यांनी पहिल्यांदाच विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावर एकत्र येत व्यासपीठ शेअर केले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी "केंद्राकडे लाठ्या आणि अश्रूधूर असतील, पण आमच्या विद्यार्थ्यांच्या हातात राष्ट्रध्वज आहे," अशा शब्दांत केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. तर अमित ठाकरे यांनी विद्यार्थी आंदोलकांवरील पोलीस कारवाई तातडीने मागे घेण्याची मागणी केली.

राज्यातील इतर शहरांतही आंदोलनाचा वणवा

दिल्लीतील कारवाईचे पडसाद केवळ मुंबई-पुण्यापुरते मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये उमटले आहेत. नागपूरमध्येही विविध विद्यार्थी संघटनांनी रस्त्यावर उतरून केंद्र सरकारविरोधात निदर्शने केली आणि शिक्षण मंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न केला. नाशिकमध्येही शेकडो विद्यार्थ्यांनी एकत्र येत रात्री कॅन्डल मार्च काढून दिल्लीतील जखमी आंदोलक विद्यार्थ्यांशी संवेदना व्यक्त केली. छत्रपती संभाजीनगरमध्येही क्रांती चौकात विद्यार्थ्यांचे मोठे आंदोलन झाले, ज्याला काँग्रेस, डावे पक्ष आणि AIMIM च्या स्थानिक कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला.  

इतर महत्वाच्या बातम्या

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
न्यायालय एकनाथ शिंदेंच्याच बाजूने निर्णय देणार, धनुष्यबाण पेलण्याची ताकद फक्त शिंदेंसाहेबांमध्येच, बच्चू कडूंचा दावा
न्यायालय एकनाथ शिंदेंच्याच बाजूने निर्णय देणार, धनुष्यबाण पेलण्याची ताकद फक्त शिंदेंसाहेबांमध्येच, बच्चू कडूंचा दावा
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
Advertisement

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
Embed widget