एक्स्प्लोर

Rohit Pawar on Dadar Kabutar Khana: रोहित पवार तातडीने दादर कबुतरखान्यात जैनधर्मीयांच्या भेटीला, म्हणाले, 'धार्मिक आंदोलनात भावनिक बाजू समजून घेतली पाहिजे'

Dadar Kabutar khana: कोर्टाच्या आदेशापर्यंत कबुतरखान्यावरील ताडपत्री हटवणार नाही, जैनधर्मीयांच्या आंदोलनानंतर BMC ची ठाम भूमिका. आज सकाळी जैन समाजाने आक्रमक आंदोलन केले होते.

Dadar Kabutar Khana: मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई महानगरपालिकेने दादरचा कबुतरखाना बंद केल्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी जैनधर्मीयांकडून जोरदार आंदोलन करण्यात आले. दादर कबुतरखान्याच्या परिसरात झालेल्या आंदोलनात जैन समाजाने रस्त्यावरील वाहतूक रोखून धरली होती. तसेच पालिकेने ज्या ताडपत्रीने कबुतरखाना (Kabutar Khana) झाकून ठेवला होता, ती ताडपत्री खेचून फाडण्यात आली. तब्बल तासभर आंदोलन केल्यानंतर धर्मगुरुंच्या आवाहनानंतर हा जमाव शांत झाला. यानंतर शरद पवार गटाचे नेते रोहित पवार (Rohit Pawar) हे तातडीने दादरमध्ये जैनधर्मीयांच्या भेटीला गेले. त्यांनी कबुतरखान्याच्या समोरील जैन मंदिरात (Jain Mandir) आंदोलकांशी चर्चा केली. यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रोहित पवार यांनी जैन समाजाची बाजू उचलून धरत महायुती सरकारवर टीकेची तोफ डागली.

इथे पक्ष्यांना अन्नदान केले जाते. येथील कोणीही कोर्टाच्या निर्णयाविरोधात नाही. फक्त पक्षी मेले नाही पाहिजेत, ही त्यांची भूमिका आहे. महानगरपालिकेने कबुतरखान्यासंदर्भात घाईगडबडीत निर्णय घेतला. काल मुख्यमंत्र्यांसोबत जैन समाजाची बैठक झाली. अधिवेशनात हा मुद्दा सत्तेतील आमदारांनी मांडला तेव्हा उत्तर देताना उदय सामंत म्हणाले, आम्ही कबुतरखाने तातडीने बंद करुन टाकतो. पण हे कबुतरखाने बंद करताना डोकं वापरायला पाहिजे होतं. कशा पद्धतीने ते बंद करायला पाहिजेत, कशाप्रकारे झाकले पाहिजे, याचा विचार करायला हवा होता. त्या पक्ष्यांचं काय होणार, याचाही विचार पालिकेने करायला हवा होता. उच्च न्यायालयाने सरकारने सादर केलेल्या कागदपत्रांच्याआधारे निर्णय दिला. आता पुन्हा कोर्ट या सगळ्याचा संवेदनशीलपणे विचार करेल, अशी मला आशा आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले.

मी येथील जैन बांधवांशी बोललो. त्यांनी सांगितले की, नायर, के.ई.एम रुग्णालयाचा अहवाल आला आहे. त्यामध्ये इथे असलेल्या कबुतरखान्यामुळे श्वसनाचे आणि इतर रोग होतात, याबाबत तपासणी करण्यात आली आहे. हा रिपोर्ट नकारात्मक आहे. कबुतरांमुळे या परिसरात रोगराई वाढलेली नाही, असे या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे आता याप्रकरणात सरकारने हस्तक्षेप केला पाहिजे, असे रोहित पवार यांनी म्हटले.

Rohit Pawar: धार्मिक आंदोलनात भावनिक बाजू समजून घेतली पाहिजे: रोहित पवार

जेव्हा जैन समाजबांधव एखादी भूमिका घेतात, त्यामागे कुठल्याही पक्ष्याला हानी होऊ नये, हा उद्देश असतो. त्यांच्यापर्यंत रस्त्यावर कबुतरं मरुन पडल्याचे व्हिडीओ पोहोचले. हे व्हिडीओ बघून त्यांचा जीव तडफडला आणि त्यांनी भावनिक होऊन आंदोलन केले. या भावनेला किंमत द्यायला हवी. धार्मिक आंदोलनात भावनिक बाजू समजून घेतली पाहिजे, असे रोहित पवार यांनी म्हटले.

आणखी वाचा

Dadar Kabutar Khana: गुजरातच्या पतंग महोत्सवात मांजाने मान कापून पक्षी मरतात, तेव्हा तुमचा धर्म कुठे जातो; मनीषा कायंदेंचा जैनधर्मीयांना सडेतोड सवाल

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भरधाव कार झाडावर आदळली, तिघांचा जागीच मृत्यू, 2 गंभीर; मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात
भरधाव कार झाडावर आदळली, तिघांचा जागीच मृत्यू, 2 गंभीर; मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात
थरारक हत्याकांडाचा उलगडला, कारमध्ये आढळून आलेला मृतदेह; पोलिसांनी अशी फिरवली चक्रे, आरोपीला बेड्या
थरारक हत्याकांडाचा उलगडला, कारमध्ये आढळून आलेला मृतदेह; पोलिसांनी अशी फिरवली चक्रे, आरोपीला बेड्या
Gold Price : सोन्याचा दर 3 लाख रुपयांचा टप्पा पार करणार, अमेरिकन अर्थतज्ज्ञाचा मोठा दावा, आज सोने किती महागले?
सोन्याचा दर 3 लाख रुपयांचा टप्पा पार करणार, अमेरिकन अर्थतज्ज्ञाचा मोठा दावा, आज सोने किती महागले?
मोठी बातमी : 'पार्थ पवार दोषीच, अजित पवार संत नाहीत', दमानिया-कुंभार आक्रमक, पुरावे दाखवत मुख्यमंत्र्यांना खडे सवाल
मोठी बातमी : 'पार्थ पवार दोषीच, अजित पवार संत नाहीत', दमानिया-कुंभार आक्रमक, पुरावे दाखवत मुख्यमंत्र्यांना खडे सवाल

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar : मुख्यमंत्रिपद येतं-जातं, परमनंट कोणीच नाही
Sanjay Raut On Thackeray Brothers Yuti : शिवडीमधील ३ प्रभागांवरून अडकलेल्या जागावाटपाची चर्चा पूर्ण
Railway Tickit : मासिक तिकीट काढणाऱ्यांना भाडेवाढीचा फटका नाही, खिशाला कात्री बसणार
Bajirao Dharmadhikari : सोनवणेंनी खासदारकीची गरिमा संपवली, बाजीराव धर्माधिकारी यांचा हल्लाबोल
Bhagyashree Jagtap Lonavala : फळविक्रेती भाग्यश्री काल नगरसेवक बनल्या, आज पुन्हा फळगाडा लावून सेवेत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भरधाव कार झाडावर आदळली, तिघांचा जागीच मृत्यू, 2 गंभीर; मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात
भरधाव कार झाडावर आदळली, तिघांचा जागीच मृत्यू, 2 गंभीर; मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात
थरारक हत्याकांडाचा उलगडला, कारमध्ये आढळून आलेला मृतदेह; पोलिसांनी अशी फिरवली चक्रे, आरोपीला बेड्या
थरारक हत्याकांडाचा उलगडला, कारमध्ये आढळून आलेला मृतदेह; पोलिसांनी अशी फिरवली चक्रे, आरोपीला बेड्या
Gold Price : सोन्याचा दर 3 लाख रुपयांचा टप्पा पार करणार, अमेरिकन अर्थतज्ज्ञाचा मोठा दावा, आज सोने किती महागले?
सोन्याचा दर 3 लाख रुपयांचा टप्पा पार करणार, अमेरिकन अर्थतज्ज्ञाचा मोठा दावा, आज सोने किती महागले?
मोठी बातमी : 'पार्थ पवार दोषीच, अजित पवार संत नाहीत', दमानिया-कुंभार आक्रमक, पुरावे दाखवत मुख्यमंत्र्यांना खडे सवाल
मोठी बातमी : 'पार्थ पवार दोषीच, अजित पवार संत नाहीत', दमानिया-कुंभार आक्रमक, पुरावे दाखवत मुख्यमंत्र्यांना खडे सवाल
बाळापूर नगरपालिकेवर खतीब घराण्याची 65 वर्षांची सत्ता उलथवली, 30 वर्षीय डॉ.आफरीन नगराध्यक्ष, सांगितलं पहिलं काम?
बाळापूर नगरपालिकेवर खतीब घराण्याची 65 वर्षांची सत्ता उलथवली, 30 वर्षीय डॉ.आफरीन नगराध्यक्ष, सांगितलं पहिलं काम?
''मुख्यमंत्री पद ज्यांचं आहे, त्यांचंही येणार-जाणार''; सुधीर मुनगंटीवारांचं पुन्हा परखड मत, नाराजीवर म्हणाले...
''मुख्यमंत्री पद ज्यांचं आहे, त्यांचंही येणार-जाणार''; सुधीर मुनगंटीवारांचं पुन्हा परखड मत, नाराजीवर म्हणाले...
महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारांच्या मुलाखतीवेळी राडा; शिवसेना शाखाप्रमुखाला मारहाण, पोलिसांत धाव
महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारांच्या मुलाखतीवेळी राडा; शिवसेना शाखाप्रमुखाला मारहाण, पोलिसांत धाव
फळे रसाळ गोमटी! लोणावळ्यात फळ विक्रेतीचं भाग्य उजळलं, 24 तासांतच फळांच्या गाडीवर परतली नगरसेविका
फळे रसाळ गोमटी! लोणावळ्यात फळ विक्रेतीचं भाग्य उजळलं, 24 तासांतच फळांच्या गाडीवर परतली नगरसेविका
Embed widget