एक्स्प्लोर

राष्ट्रवादीचा वर्धापन दिन, जयंत पाटील म्हणाले, मला पदमुक्त करा; अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली, 7 वर्षांचा कालावधी दिला. शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणे आवश्यक आहे. तुम्हा सर्वांदेखत साहेबांना विनंती करेन, मला प्रदेशाध्यक्ष पदावरुन मुक्त करावे

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज 26 वा वर्धापन दिन पुण्यात (Pune) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे ज्या शरद पवारांनी या पक्षाची स्थापन केली त्यांनी आणि अजित पवारांनी देखील पुण्यातच वर्धापन साजरा केल्याने पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे एकाच दिवशी दोन वर्धापन दिन साजरे झाले. मात्र, यंदाचा वर्धापन सोहळा गाजला तो प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भाषणाने. 'मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली, 7 वर्षांचा कालावधी दिला. शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणे आवश्यक आहे, मला पदमुक्त करा' अशी विनंतीच जयंत पाटील यांनी केली. जयंत पाटील (Jayant patil) यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा रंगली आहे. आता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.  

'मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली, 7 वर्षांचा कालावधी दिला. शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणे आवश्यक आहे. तुम्हा सर्वांदेखत साहेबांना विनंती करेन, मला प्रदेशाध्यक्ष पदावरुन मुक्त करावे. शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे, पवार साहेबांनी यावर योग्य निर्णय घ्यावा, आपल्याला बरेच पुढे जायचे आहे, असे म्हणत जयंत पाटील यांनी आपल्याला प्रदेशाध्यक्ष पदावरुन मुक्त करण्याची विनंती आज वर्धापन दिनाच्या सोहळ्यात केली. जयंत पाटील यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यावर, अजित पवारांनी दोन वाक्यात विषय संपवला. 

''जयंत पाटील काय बोलले हे मला माहित नाही. मात्र, त्यांना काय बोलायचं हे त्यांच्या संघटनेचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यामध्ये मी पडण्याची गरज नाही,'' अशा शब्दात अजित पवार यांनी जयंत पाटलांच्या वक्तव्यावर भाष्य केलं. या प्रश्नावर अजित पवारांनी अधिक बोलणे टाळले. 

कार्यकर्त्यांची निवडणूक 

दरम्यान, अजित पवार यांनी देखील पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मेळाव्यातून कार्यकर्त्यांना ऊर्जा दिली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचे व तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये समर्थकांना वेगवेगळी पद द्यायची असतात. लोकसभा आणि विधानसभेवेळी कार्यकर्ते स्वतःला झोकून देतात. मग, या कार्यकर्त्यांना ही संधी द्यावी लागते, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांना न्याय द्यावा लागतो. आता या निवडणुका ऑक्टोबरपर्यंत येतील. राज्य निवडणूक आयोग त्या कामाला लागलेली आहे, असे अजित पवार यांनी म्हटले. 

लाडकी बहीण योजना कायमस्वरुपी आहे

लाडक्या बहिणींचे पैसे थकलेले नव्हते. विरोधक जाणीवपूर्वक गरज सरो, वैद्य मरो अशी अफवा पसरवत होते. आम्ही गेल्या सरकारसारखे नाही. याउलट आम्ही जाहीर केलेली योजना योग्यरीत्या राबवत आहोत. लाडक्या बहिणी, शेतकरी यांच्यासाठी मदतीचं धोरण कायम असेल, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.  

पाटील समर्थकांकडून सभागृहात घोषणाबाजी

दरम्यान, सभागृहात जयंत पाटील यांच्या वक्तव्यानंतर त्यांच्या समर्थकांनी सभागृहात घोषणाबाजी केली. तेव्हा जयंत पाटील यांनी आपल्या समर्थकांना शांत बसण्याचे आवाहन केले. शेवटी पक्ष हा पवार साहेबांचा आहे. पवार साहेबांनी योग्य तो निर्णय घ्यावा. आता आपल्याला बरंच पुढे जायचं आहे. त्यामुळे आतापर्यंत दिलेल्या संधीसाठी मी पवार साहेबांचे आभार मानतो, असे जयंत पाटील यांनी म्हटले.

हेही वाचा

आधी लोकसभा उमेदवाराने साथ सोडली, आता विधानसभा उमेदवाराचा जय महाराष्ट्र; ठाकरेंच्या शिवसेनेला 'दे धक्का'

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Parth Pawar on Baramati By Election: बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती, पण काही लोकांनी...; पार्थ पवारांचा मोठा दावा
बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती, पण काही लोकांनी...; पार्थ पवारांचा मोठा दावा
Sudhir Mungantiwar vs Kishor Jorgewar: 'हा वाद माझ्या आटोक्याबाहेर'; चंद्रपुरातील मुनगंटीवार-जोरगेवार वादासमोर भाजप प्रदेशाध्यक्षांनी टेकले हात, आता थेट दिल्लीतून होणार फैसला, नेमकं काय घडलं?
'हा वाद माझ्या आटोक्याबाहेर'; चंद्रपुरातील मुनगंटीवार-जोरगेवार वादासमोर भाजप प्रदेशाध्यक्षांनी टेकले हात, आता थेट दिल्लीतून होणार फैसला, नेमकं काय घडलं?
Ameet Satam BMC Fund: बीएमसीच्या निधी वाटपात ‘साटम फॅक्टर’ची जोरदार चर्चा; भाजपमध्ये अंतर्गत नाराजीचा सूर?
बीएमसीच्या निधी वाटपात ‘साटम फॅक्टर’ची जोरदार चर्चा; भाजपमध्ये अंतर्गत नाराजीचा सूर?
Bhendwal Ghatmandni Bhavishyvani 2026: देशाचा राजा खुर्चीवर कायम राहील, पण...; भेंडवळच्या घटमांडणीत कोणकोणते भाकीत वर्तवले?
देशाचा राजा खुर्चीवर कायम राहील, पण...; भेंडवळच्या घटमांडणीत कोणकोणते भाकीत वर्तवले?

व्हिडीओ

Navneet Rana vs Vijay Wadettiwar | महिला आरक्षणावरुन राणा विरुद्ध काँग्रेस Special Report
Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका
Special Report Mumbai Local : मुंबईमध्ये आता अंडरग्राऊंड लोकल सुरु होणार?
Shyam Manav Akola : अशोक खरात प्रकरण सरकारचंच पाप, श्याम मानव यांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rashid Khan: 'आयपीएलच्या 2023 च्या मोसमात मला अफगाणिस्तान सोडून...' राशिद खानचा सनसनाटी खुलासा! नेमकं काय म्हणाला फिरकी स्टार?
'आयपीएलच्या 2023 च्या मोसमात मला अफगाणिस्तान सोडून...' राशिद खानचा सनसनाटी खुलासा! नेमकं काय म्हणाला फिरकी स्टार?
Kolhapur Crime: ऑनलाईन गेमिंगमध्ये लावलेले सगळे पैसे हरला, कोल्हापुरात तरुणाने नैराश्याच्या भरात आयुष्य संपवलं; अवघ्या वर्षभरापूर्वीच वडिलांचे निधन
ऑनलाईन गेमिंगमध्ये लावलेले सगळे पैसे हरला, कोल्हापुरात तरुणाने नैराश्याच्या भरात आयुष्य संपवलं; अवघ्या वर्षभरापूर्वीच वडिलांचे निधन
Hingoli Crime : अनैसर्गिक संबंधांसाठी नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालयातील लिपिकाचा तगादा, सततच्या त्रासाला कंटाळून 24 वर्षीय तरुणाने आयुष्य संपवलं, कळमनुरी हादरलं!
अनैसर्गिक संबंधांसाठी नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालयातील लिपिकाचा तगादा, सततच्या त्रासाला कंटाळून 24 वर्षीय तरुणाने आयुष्य संपवलं, कळमनुरी हादरलं!
Sudhir Mungantiwar vs Kishor Jorgewar: 'हा वाद माझ्या आटोक्याबाहेर'; चंद्रपुरातील मुनगंटीवार-जोरगेवार वादासमोर भाजप प्रदेशाध्यक्षांनी टेकले हात, आता थेट दिल्लीतून होणार फैसला, नेमकं काय घडलं?
'हा वाद माझ्या आटोक्याबाहेर'; चंद्रपुरातील मुनगंटीवार-जोरगेवार वादासमोर भाजप प्रदेशाध्यक्षांनी टेकले हात, आता थेट दिल्लीतून होणार फैसला, नेमकं काय घडलं?
Bigg Boss Marathi 6 Deepali Sayed Post: पाच लाखांची पैशांची बॅग खाली ठेवली; बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली..
पाच लाखांची पैशांची बॅग खाली ठेवली; बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली..
Local Train Accident Dombivli: मोठी बातमी: डोंबिवलीत लोकल ट्रेनचा डबा रुळावरुन खाली घसरला, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
मोठी बातमी: डोंबिवलीत लोकल ट्रेनचा डबा रुळावरुन खाली घसरला, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
Ameet Satam BMC Fund: बीएमसीच्या निधी वाटपात ‘साटम फॅक्टर’ची जोरदार चर्चा; भाजपमध्ये अंतर्गत नाराजीचा सूर?
बीएमसीच्या निधी वाटपात ‘साटम फॅक्टर’ची जोरदार चर्चा; भाजपमध्ये अंतर्गत नाराजीचा सूर?
Nashik Crime News: घरी हलाखीची परिस्थिती, वडील अंथरुणाला खिळलेले, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पीडितेने नको नको ते सहन केलं; नाशिकमधील धर्मांतर प्रकरणाची हादरवणारी कहाणी
घरी हलाखीची परिस्थिती, वडील अंथरुणाला खिळलेले, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पीडितेने नको नको ते सहन केलं; नाशिकमधील धर्मांतर प्रकरणाची हादरवणारी कहाणी
Embed widget