एक्स्प्लोर

NCP felicitates former CMs: अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून माजी मुख्यमंत्र्यांचा सत्कार कार्यक्रम; मविआच्या माजी मुख्यमंत्र्यांची पाठ, शरद पवारांनीही निर्णय कळवला! कोणते नेते राहणार उपस्थित?

NCP felicitates former CMs: आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार मुंबईत आहेत, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमाला जाण्यावरती प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या (NCP Ajit Pawar) पक्षाच्यावतीने महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आज माजी मुख्यमंत्र्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी पक्षाच्यावतीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री म्हणून निमंत्रित करण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी शरद पवारांना (Sharad Pawar) निमंत्रण दिलं आहे. त्यामुळे शरद पवार (Sharad Pawar) या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं होतं. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे, एकनाथ शिंदे, अशोक चव्हाण, सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील निमंत्रण देण्यात आलं होतं. हे सर्वजण कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना देखील कार्यक्रमाला उपस्थित राहण्याबाबत निमंत्रण दिलं आहे. मात्र हे तिन्ही मुख्यमंत्री कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता धूसर आहे, म्हणून त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून घरी जाऊन लवकरच सन्मान करण्यात येणार आहे.

मविआशी संबंधित माजी मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमाकडे फिरवली पाठ 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महाराष्ट्र दिनानिमित आयोजित केलेल्या माजी मुख्यमंत्र्यांच्या सत्कार सोहळ्याकडे महाविकास आघाडीशी संबंधित माजी मुख्यमंत्र्यांनी पाठ फिरवली आहे. तर महायुतीशी संबंधित माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे मुख्यमंत्री कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती आहे. आज माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार मुंबईत आहेत. मात्र, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्टेजवर जाणं टाळलं आहे. 

शरद पवार कार्यक्रमाबाबत काय म्हणाले?

शरद पवारांना आपण माजी मुख्यमंत्र्यांच्या सन्मान सोहळ्याला उपस्थित राहणार का? असा प्रश्न एबीपी माझाने विचारला असता संबंधित कार्यक्रम एका महायुतीशी संबंधित पक्षाचा आहे. त्यामुळे त्यांच्या स्टेजवर जाण्याचा सवाल उपस्थित होतं नाही, असं उत्तर पवारांकडून देण्यात आलं आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीशी संबंधित पृथ्वीराज चव्हाण यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कळवलं आहे. तर सुशीलकुमार शिंदे यांनी अद्याप होकार अथवा नकार देखील कळवलेला नाही तर उद्धव ठाकरे हे सध्या परदेशात आहेत. त्यामुळे ते देखील कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लवकरच या मुख्यमंत्र्यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. दुसरीकडे महायुतीशी संबंधित असणारे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नारायण राणे, अशोक चव्हाण आणि सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मात्र कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Sanjay Raut: भाजपने कसला विकास केला, नक्षलवाद संपवला तो उद्योगपतींसाठी; संजय राऊतांचा हल्लाबोल
भाजपने कसला विकास केला, नक्षलवाद संपवला तो उद्योगपतींसाठी; संजय राऊतांचा हल्लाबोल
Abhay Patil: आधी काँग्रेस सोडली, आता शिंदेंची भेट; अकोल्यातील बड्या नेत्याचा राजकीय निर्णय ठरला? 15 ऑगस्टला चित्र स्पष्ट होणार
आधी काँग्रेस सोडली, आता शिंदेंची भेट; अकोल्यातील बड्या नेत्याचा राजकीय निर्णय ठरला? 15 ऑगस्टला चित्र स्पष्ट होणार
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
ODI World Cup 2027 : कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Embed widget