Sharad Pawar On Lok Sabha Vidhan Sabha Seats : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी बुधवारी (17 मे) पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीत लोकसभा (Lok Sabha) आणि विधानसभेच्या (Vidhan Sabha) क्रमांक दोनवर असलेल्या जागांवर फोकस करण्याचा आदेश दिला आहे. या जागा नेमक्या किती आहेत आणि कोणते मतदारसंघ आहेत किंवा या जागांवर विजयी उमेदवार कोण आहेत म्हणजेच राष्ट्रवादीच्या क्रमांक दोनची कुठल्या पक्षाच्या क्रमांक एकच्या उमेदवारासोबत लढत झाली होती याचाच आढावा घेण्याचा प्रयत्न केला असता काही धक्कादायक बाबी समोर आले आहेत.
2019 साली पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विधानसभेच्या निवडणुकीत राज्यातील 288 मतदारसंघापैकी 48 मतदारसंघामध्ये क्रमांक दोनची मते मिळाली होती. तर लोकसभेच्या 48 मतदारसंघांपैकी पंधरा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीला क्रमांक दोनची मते मिळाली आहेत. विधानसभा निवडणुकीचा विचार केला असता राष्ट्रवादीच्या बहुतेक लढती या शिवसेनेसोबत झाले आहेत. राज्यातील 48 विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीला क्रमांक दोनची मते मिळाली आहेत. यातील 18 मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीची लढत ही शिवसेनेसोबत होती. तर लोकसभेच्या निवडणुकीचा विचार केला असता राज्यातील 15 लोकसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीला क्रमांक दोनची मते होती. यापैकी आठ मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीची लढत शिवसेनेसोबत झाली होती. त्यामुळे आगामी काळात जागांवरुन राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेत वाद उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
विधानसभा मतदारसंघ
1) सिंदखेडा : जयकुमार रावल (भाजप) - संदीप बेडसे (राष्ट्रवादी)
2) चोपडा : लताबाई सोनवणे (शिवसेना) - जगदीशचंद्र वाळवी ( राष्ट्रवादी)
3) जळगाव शहर : सुरेश भोळे (भाजप) - अभिषेक पाटील (राष्ट्रवादी)
4) एरंडोल - चिमणराव पाटील (शिवसेना) - अण्णासाहेब पाटील (राष्ट्रवादी)
5) चाळीसगाव : मंगेश चव्हाण (भाजप) - राजीव देशमुख (राष्ट्रवादी)
6) जामनेर : गिरीश महाजन (भाजप) - संजय गरुड (राष्ट्रवादी)
7) मुक्ताईनगर : चंद्रकांत पाटील (अपक्ष) - एकनाथ खडसे (राष्ट्रवादी)
8) कारंजा : राजेंद्र पाटनी (भाजप) - प्रकाश ढाके (राष्ट्रवादी)
9) हिंगणघाट- समीर कुणावार (भाजप) - राजू तिमांडे (राष्ट्रवादी)
10) हिंगणा : समीर मेघे (भाजप) - विजयबाबू घोडमारे (राष्ट्रवादी)
11) तिरोरा : विजय राहांगडाले ( भाजप) - रविकांत बोपचे (राष्ट्रवादी)
12) किनवट : भिमराव केराम (भाजप) - प्रदीप नाईक (राष्ट्रवादी)
13) जिंतूर : मेघना बोर्डीकर (भाजप) - विजय भांबळे (राष्ट्रवादी)
14) बदनापूर : नारायण कुचे (भाजप) - रुपकुमार चौधरी (राष्ट्रवादी)
15) भोकरदन : संतोष दानवे (भाजप)- चंद्रकांत दानवे (राष्ट्रवादी)
16) पैठण : संदीपनराव भुमरे (शिवसेना) - दत्तात्रय गोरडे (राष्ट्रवादी)
17) गंगापूर : प्रशांत बंब (भाजप) - संतोष माने-पाटील (राष्ट्रवादी)
18) वैजापूर : रमेश बोरनारे (शिवसेना) - अभय पाटील (राष्ट्रवादी)
19) नांदगाव : सुहास कांदे (शिवसेना) - पंकज भुजबळ (राष्ट्रवादी)
20) बागलन : दिलीप बोरसे (भाजप) - दीपिका चव्हाण (राष्ट्रवादी)
21 ) नाशिक पूर्व : राहुल ढिकले (भाजप) - बाळासाहेब सानप (राष्ट्रवादी)
22) नाशिक पश्चिम : सीमा हिरे (भाजप) - अपुर्व हिरे (राष्ट्रवादी)
23) मुरबाड : किसन काठोरे (भाजप) - प्रमोद हिंदुराव (राष्ट्रवादी)
24) उल्हासनगर : कुमार ऐलानी (भाजप) - ज्योती कलाणी (राष्ट्रवादी)
25) ऐरोली : गणेश नाईक (भाजप) - गणेश शिंदे (राष्ट्रवादी)
26) बेलापूर : मंदा म्हात्रे (भाजप) - अशोक गावडे (राष्ट्रवादी)
27) विक्रोळी : सुनील राऊत (शिवसेना) - धनंजय पिसाळ (राष्ट्रवादी)
28) दिंडोशी - सुनील प्रभू (शिवसेना) - विद्या चव्हाण (राष्ट्रवादी)
29) कुर्ला : मंगेश कुडाळकर (शिवसेना) - मिलिंद कांबळे (राष्ट्रवादी)
30) वरळी : आदित्य ठाकरे (शिवसेना) - अॅड. सुरेश माने (राष्ट्रवादी)
31) कर्जत : महेंद्र थोरवे (शिवसेना)- सुरेशभाऊ लाड ( राष्ट्रवादी)
32) दौंड : राहुल कुल (भाजप) - रमेश थोरात (राष्ट्रवादी)
33) खडकवासला : भिमराव तापकीर (भाजप) - सचिन दोडके (राष्ट्रवादी)
34) पर्वती : माधुरी मिसाळ (भाजप) - अश्विनी कदम (राष्ट्रवादी)
35) शेवगाव : मोनिका राजाळे (भाजप) - प्रतापराव ढाकणे (राष्ट्रवादी)
36) श्रीगोंदा : बबनराव पाचपुते (भाजप) - घनश्याम शेलार (राष्ट्रवादी)
37) गेवराई : लक्ष्मण पवार (भाजप) - विजयसिंह पंडित (राष्ट्रवादी)
38) केज : नमिता मुंदडा (भाजप) - पृथ्वीराज साठे (राष्ट्रवादी)
39) धाराशिव : कैलास पाटील (शिवसेना) - संजय निंबाळकर (राष्ट्रवादी)
40) परांडा : तानाजी सावंत (शिवसेना) - राहुल मोटे (राष्ट्रवादी)
41) माळशिरस : राम सातपुते (भाजप) - उत्तमराव जानकर (राष्ट्रवादी)
42) कोरेगाव : महेश शिंदे (शिवसेना) - शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी)
43) पाटण : शंभुराजे देसाई (शिवसेना) - सत्यजित पाटणकर (राष्ट्रवादी)
44) सातारा : शिवेंद्रराजे (भाजप) - दीपक पवार (राष्ट्रवादी)
45) दापोली: योगेश कदम (शिवसेना) - संजय कदम (राष्ट्रवादी)
46) गुहागर : भास्कर जाधव (शिवसेना) - सहदेव बेटकर (राष्ट्रवादी)
47) रत्नागिरी : उदय सामंत (शिवसेना) - सुदेश मयेकर (राष्ट्रवादी)
48) राधानगरी : प्रकाश अबिटकर (शिवसेना) - के पी पाटील (राष्ट्रवादी)
लोकसभा मतदारसंघ
1) जळगाव : उमेश पाटील (भाजप) - गुलाबराव देवकर (राष्ट्रवादी)
2) बुलढाणा : प्रतापराव जाधव (शिवसेना) - राजेंद्र शिंगणे (राष्ट्रवादी)
3) भंडारा गोंदिया : सुनील मेंढे (भाजपा) - नाना पंचबुद्धे (राष्ट्रवादी)
4) परभणी : संजय जाधव (शिवसेना) - राजेश विटेकर (राष्ट्रवादी)
5) दिंडोरी : भारती पवार (भाजप)- धनराज महाले (राष्ट्रवादी)
6) नाशिक : हेमंत गोडसे (शिवसेना)- समीर भुजबळ (राष्ट्रवादी)
7) कल्याण : श्रीकांत शिंदे (शिवसेना) - बाबाजी पाटील (राष्ट्रवादी)
8) ठाणे : राजन विचारे (शिवसेना) - आनंद परांजपे (राष्ट्रवादी)
9) मुंबई उत्तर पूर्व : मनोज कोटक (भाजपा) - संजय दिना पाटील (राष्ट्रवादी)
10) मावळ : श्रीरंग बारणे (शिवसेना) - पार्थ पवार (राष्ट्रवादी)
11) अहमदनगर : सुजय विखे पाटील (भाजपा) - संग्राम जगताप (राष्ट्रवादी)
12) बीड : डॉक्टर प्रीतम मुंडे (भाजप) - बजरंग सोनवणे (राष्ट्रवादी)
13) उस्मानाबाद :ओमराजे निंबाळकर (शिवसेना) - राणा जगजीत सिंह पाटील (राष्ट्रवादी)
14) माढा : रणजितसिंह नाईक निंबाळकर (भाजप) - संजय शिंदे (राष्ट्रवादी)
15) कोल्हापूर : संजय मंडलिक (शिवसेना) - धनंजय महाडिक (राष्ट्रवादी)
हेही वाचा
Maharashtra Politics: मविआच्या बैठकीत ठरलं! लोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्र लढवणार, जागा वाटपाचे काय?