Nawab Malik Arrested : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीनं अटक केल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थान वर्षा बंगल्यावर (Varsha Bunglow) मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि शरद पवार यांच्यामध्ये तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. संध्याकाळी 6.30 वाजता ही बैठक पार पडणार आहे. मलिकांवरील अटकेच्या कारवाईमुळं सरकारच्या अडचणीत वाढ झाल्यानं या बैठकीत नवाब मलिकांवर राजीनामा देण्यासाठी दबाव वाढणार असून मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात येतेय
अजित पवार सिल्व्हर ओकवरती
थोड्याच वेळात अजित पवार सिल्व्हर ओकवरती पोहोचणार असल्याचे समजते. इतर मंत्री ही सिल्व्हर ओक या ठिकाणी पोहोचत आहेत. तिथे राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक होईल. त्यानंतर शरद पवार आणि अजित पवार एकत्रित वर्षावर जातील
नवाब मलिकांना ED कडून अटक
तब्बल आठ तासाच्या चौकशीनंतर नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची आज ईडीकडून चौकशी सुरू झाली. ईडीने ही सकाळीच नवाब मलिक यांच्या घरी धडक दिली होती. ही बातमी बाहेर येताच सकाळीच राज्यात खळबळ उडाली. नवाब मलिक हे सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ईडीच्या कार्यालयात अधिकाऱ्यांसह दाखल झाले होते. नवाब मलिक यांच्या अटकेमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून राष्ट्रवादी काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. अनिल देशमुख यांच्यानंतर मंत्रीपदावर असताना अटक झालेले मलिक हे दुसरे मंत्री आहेत. दरम्यान नवाब मलिक राजीनामा देण्याचीही शक्यता आहे,
मंत्रीपदावर असताना अटक झालेले मलिक हे दुसरे मंत्री
नवाब मलिक हे सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ईडीच्या कार्यालयात अधिकाऱ्यांसह दाखल झाले होते. नवाब मलिक यांच्या अटकेमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून राष्ट्रवादी काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. अनिल देशमुख यांच्यानंतर मंत्रीपदावर असताना अटक झालेले मलिक हे दुसरे मंत्री आहेत. नवाब मलिक यांना वैद्यकीय तपासणीसाठी जे.जे. रुग्णालयात नेण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांना कोर्टात नेण्यात येण्याची शक्यता आहे. दाऊद इब्राहिमच्या मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात नवाब मलिक यांचाही सहभाग असल्याचा पुरावे सापडले असल्याचे सूत्रांनी सांगितले. आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ईडी अधिकारी मलिक यांचे घरी दाखल झाले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवाब मलिक यांच्या भावाला ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले होते. मात्र, मलिक यांना समन्स देण्यात आले नव्हते.