Nawab Malik ED : आज पहाटे नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या कुर्ला स्थित घरी ईडीची (ED) टीम पोचली आणि त्यानंतर एका प्रकरणाची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली. ते प्रकरण म्हणजे नवाब मलिकांवर काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी त्यांचा संबंध दाऊद गँगशी आहेत आणि त्यांचे तसे व्यवहार देखील झाले आहेत. नेमकं काय आहे प्रकरण? जाणून घ्या


 नवाब मलिक यांच्या घरी आज सकाळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी धाड मारली आणि ही धाड 1993 सालच्य बॉम्बस्फोटातील आरोपी यांच्याकडून जमीन खरेदी प्रकरणाशी संबंधित आहे ही माहिती समोर आली.


काय आहे प्रकरण?


१) 1993 बॉम्बस्फोटातील आरोपी सरदार शाहवली खान आणि हसीना पारकर यांचा जवळचा व्यक्ती सलीम पटेल यांचे नवाब मलिकांशी व्यवसायिक संबंध.


२) नवाब मलिक यांच्या नातेवाईकांच्या कंपनीला त्या दोघांनी करोडोची जमीन कवडीमोल भावाने विकली.


३) कुर्ला येथील एलबीएस रोडला असलेल्या गोवा कंपाऊंड येथील करोडोची साडे तीन एकर जमीन 20 ते 30 लाखात मलिकांच्या नातेवाईकांना दिली.


४) दाऊद नंतर हसीना पारकर प्रॉपर्टी खरेदी करत होत्या आणि त्यामधे पावर ऑफ अटरनी सलीम पटेल यांना लावत होत्या. तीच प्रॉपर्टी नवाब मलिक यांच्या नातेवाईकांनी खरेदी केली.


आगामी काळात राज्य सरकार विरूद्ध केंद्रिय तपास यंत्रणा संघर्ष


नवाब मलिक यांच्यावर ज्यावेळी आरोप करण्यात आले होते त्याचवेळी त्यानी आपल्यावरील सर्व आरोप पत्रकार परिषद घेऊन फेटाळून लावले होते. माञ ईडीच्या सूत्रांच्या माहितीनुसार इकबाल कासकर याला अटक झाल्यानंतर नवाब मलिक यांचं एका प्रॉपर्टी खरेदी संदर्भात नाव समोर आल्याची माहिती मिळाली आहे. नवाब मलिक यांना इडीने चौकशी साठी नेल्यानंतर राज्यांतील राजकरण मात्र चांगलचं ढवळून निघालं आहे. विरोधकांनी केंद्रीय तपास यंत्रणाचा सरकार चुकीच्या पद्धतीने वापर करत असल्याचं म्हटल आहे तर शरद पवार यांनी थेट याला धार्मिक रंग दिला आहे. केंद्रिय तपास यंत्रणांच्या या कारवाईनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी थेट ईडीच्या कार्यालात घुसण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्यांना तत्काळ रोखल. तर दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आव्हान केलं. केंद्रिय तपास यंत्रणांनी नवाब मलिक यांच्यावर केलेल्या कारवाईमुळे राजकीय वातावरण चांगलचं ढवळून निघालं आहे. महविकास आघाडीतील नेत्यांनी देखील एकत्र येऊन केंद्रिय तपास यंत्रणांना उघडं पाडण्याचा पवित्रा घेतलाय त्यामुळें आगामी काळात राज्य सरकार विरूद्ध केंद्रिय तपास यंत्रणा हा संघर्ष पहिला मिळणार आहे.


तब्बल आठ तासाच्या चौकशीनंतर नवाब मलिकांना अटक


तब्बल आठ तासाच्या चौकशीनंतर नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची आज ईडीकडून चौकशी सुरू झाली. ईडीने ही सकाळीच नवाब मलिक यांच्या घरी धडक दिली होती. ही बातमी बाहेर येताच सकाळीच राज्यात खळबळ उडाली. नवाब मलिक हे सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ईडीच्या कार्यालयात अधिकाऱ्यांसह दाखल झाले होते. नवाब मलिक यांच्या अटकेमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून राष्ट्रवादी काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. अनिल देशमुख यांच्यानंतर मंत्रीपदावर असताना अटक झालेले मलिक हे दुसरे मंत्री आहेत. नवाब मलिक यांना वैद्यकीय तपासणीसाठी जे.जे. रुग्णालयात नेण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांना कोर्टात नेण्यात येण्याची शक्यता आहे. दाऊद इब्राहिमच्या मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात नवाब मलिक यांचाही सहभाग असल्याचा पुरावे सापडले असल्याचे सूत्रांनी सांगितले. 


या छापेमारीनंतर काही नेते अडचणीत येऊ शकतात


मुंबईत आणि लगतच्या परिसरात ईडीनं काही दिवसांपूर्वी छापेमारी केली होती. ईडीच्या रडारवर डॉन दाऊद इब्राहीमची मुंबईतली मालमत्ता आणि त्या संपत्तीशी निगडीत व्यवहार करणारे काही नेतेमंडळी ईडीच्या रडारवर होते. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर ईडीने ही कारवाई सुरू केली. या छापेमारीनंतर काही नेते अडचणीत येऊ शकतात याची दबक्या आवाजात चर्चा सुरु होती.


दाऊदचा भाऊ इब्राहिम कासकरला ईडी कोठडी


अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला शुक्रवारी सात दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याच्या जवळील लोकांविरोधात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तपास सुरु आहे. याप्रकरणी ईडीने इक्बाल कासकरला अटक केली होती. शुक्रवारी इक्बाल कासकरला विशेष मुंबईतील विशेष पीएमएलए  कोर्टात हजर केलं होतं. यावेळी कोर्टाने इक्बाल कासकरला सात दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे.