एक्स्प्लोर

मोदी म्हणाले, तुमचा आवाज बसलाय, जागरण कमी करा; पंतप्रधानांचं गुणगान गात शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

ही निवडणूक देशाच्या विकासाची, सामान्य माणसाच्या जीवनात बदल घडविणारी, देशाला महासत्तेकडे वाटचाल करण्यासाठी आहे. जगभरात लोकप्रियतेमधे 1 नंबर लभलेले प्रधांनमंत्री मोदीं आहेत.

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीडसह राज्यातील 11 लोकसभा मतदारसंघात 13 मे रोजी मतदान होत आहे. त्यामुळे, येथील मतदारसंघात दिग्गज नेत्यांच्या तोफा धडकत आहेत. संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) आज शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचीही (Eknath Shinde) सभा होत आहे. एकनाथ शिंदेंनी उमेदवार संदीपान भुमरेंच्या (Sandipan Bhumare) प्रचारार्थ सभा घेत उद्वव ठाकरेंवर निशाणा साधला. तर, पक्ष विलिनीकरणावरुन शरद पवारांनाही लक्ष्य केलं. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुकही केलं. आज मोदी साहेब मला बोलले आवाज बैठ गया है, काळजी घ्या, जागरण कमी करा असंही म्हणाले, कितीही आपुलकी आहे. एकीकडे देशाचे प्रधानमंत्री बालाकोट सर्जिकल स्ट्राईक करणारे आहेत, तर दुसरीकडे विचारपूस करणारे देखील पंतप्रधान मी कधी पाहिला नाही 

ही निवडणूक देशाच्या विकासाची, सामान्य माणसाच्या जीवनात बदल घडविणारी, देशाला महासत्तेकडे वाटचाल करण्यासाठी आहे. जगभरात लोकप्रियतेमधे 1 नंबर लभलेले प्रधांनमंत्री मोदीं आहेत. दाओसमध्ये उद्योगपती मला भेटल्यावर म्हणाले, केंद्र सरकारचे आणि तुमचे कसे आहे. मी म्हणालो आम्ही एकच आहोत. उद्योजक उद्योग आणण्यासाठी ही माहिती घेत असतात. अगोदर उद्योजकांच्या घरात जिलेटीन ठेवले जायचे, मात्र आता उद्योजक सुरक्षित आहेत, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला 

संदीपान भुमरेंचं कौतुक करत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, भुमरे मामा शब्दाला पक्के आहेत. ते माझ्या घरी आले आणि म्हणाले आपल्याला निर्णय घ्यायचे आहेत. ते म्हणाले बाळासाहेबांच्या विचाराची तडजोड झाली, सावरकरांचा अपमान केला जात आहे. कुणी भेटत न्हाई, विकास निधी देत नाही. भुमरेनी  पहिल्या दिवशी जी भूमिका घेतली ती शेवटपर्यंत तीच भूमिका त्यांची राहिली. जेव्हा भुमरे यांना मंत्रीपद मिळाला तेव्हा तत्कालीन नेते म्हणाले यांना मंत्रीपद काय करणार, त्यांच्यासाठी मी भांडलो आणि त्यांना मंत्री बनवलं, असा किस्साही एकनाथ शिंदेंनी सांगितला. तसेच, त्यांना एक पोटदुखी आहे, त्यांना खटकलं की ते मागून बोलायचे, मला मंत्री बनवल्यानंतरही फार काही मी ऐकलं, असेही शिंदेंनी सांगितलं. त्यांना मोठ मोठ्या सभा लागतात, पण तेवढे कार्यकर्ते त्यांच्याकडे नाहीत. सर्व शिवसैनिक आमच्याकडे आहेत. कारण, असली शिवसेना आपली आहे, तरनकली शिवसेना तिकडे आहे ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले, असे शिंदेंनी म्हटले.  

छत्रपती संभाजीनगर आमचं जीव की प्राण

तुकाराम ओंबळेंनी कसाबच्या सर्व गोळ्या अंगावर झेलल्या आणि हे शहिदांचा अपमान करीत आहेत. निवडणुकीनंतर देशात फटाके फुटले पाहिजे, पाकिस्तानात नको असे एकनाथ शिंदेंनी म्हटले. शिवसैनिकांच्या खच्चीकरण होताना कसं बघणार, पुढे काय होणार हे माहिती नव्हते, या लोकांनी विश्वास दिला. कारण मी त्यांच्या सुखा दुःखात सहभागी होतो.  संभाजीनगर बाबत ठराव घेतला तो बेकायदेशीर घेतला, कारण आम्ही 50 जन त्यावेळी गुवाहटीला होतो. तो निर्णय महायुतीने घेतला.  हे म्हणतात 100 कोटी हिंदूंची कत्तल करणार नविन संसद भवन झालं तेंव्हा महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय मोदींनी घेतला.  छत्रपती संभाजीनगर आमचं जीव की प्राण आहे, असेही शिंदेंनी म्हटले. तर, प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसमध्ये विलीन झालं पाहिजे ही भाषा कधी केली जाते जेंव्हा ताकत कमजोर होते. त्यांची ताकत सर्वांना माहिती आहे, उबाठाची पण ताकत सर्वांना माहिती आहे, असे म्हणत शिंदेंनी शरद पवार व उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. 

महाराष्ट्र भवन होणारच

बाळासाहेबांना फक्त देशभक्ती, देश प्रेम होतं. आज बाळासाहेब असते तर राम मंदिर बांधलं म्हणून तोंड भरुन मोदींचं कौतुक केलं असतं. अगोदर म्हटले जायचे राम मंदिर बनले तर बॉम्बस्फोट होईल, पण काहीही झालं नाही. पूर्वी लाल चौकात बॉम्ब फुटायचे, फारुक अब्दुल्ला म्हणतो महाराष्ट्र भवन होऊन देणार नाही. तुझ्या सात पिढ्यादेखील खाली आल्या तरी महारष्ट्र भवन होणार, असा गर्भित इशाराही एकनाथ शिंदेनी दिला.  कुणी म्हणत अब की बार तडीपार. अरे तुम्हाला तर जनतेने तडीपार केले आहे. घरी फेसबुक लाईव्ह करून सरकार चालत नाही. हा एकनाथ शिंदे रस्त्यावर, रुग्णालयात ppe कीट घालून फिरत होता. मोदींना गाडायची भाषा केली जाते.आज मोदी म्हणाले जिवंतपणी काय मेल्यावर देखील तुम्ही मला गाडू शकत नाही, फक्त शिव्या शाप, बाकी काही नाही. मोदी म्हणाले जितनी गाली दोगे उतने साथी मिलेंगे. एकीकडे देशभक्ती आहे दुसरीकडे देशाची बदनामी करणारे देशद्रोही आहे. मोदी है तो मुमकीन है, मोदी बघत नाहीत, मात्र, एक नजर फिरवली की काय होईल...? तुमची मर्यादा किती बोलता किती, कुणाल तरी खुश करण्यासाठी असे म्हणत शिंदेंनी इशाराही दिला.   

इंटेलिजन्सचे रिपोर्ट आहेत

ताकत किती तुमच्यात, गर्व से कहो हिंदू है म्हणू शकतात का? आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललो आहे. माझ्याकडे इंटेलिजन्स, पोलिस इत्यादींची इत्यंभूत माहिती माझ्याकडे येते. या तीन टप्प्यात महायुती सर्वात आघाडीवर आहे, खुसूर पुसूर करणारे हे लोक महायुतीचे आहेत, असे म्हणत महायुतीचा विजय होणार असल्याचे शिंदेंनी सांगितले. 

संदीपान भुमरे काय म्हणाले

ज्यांनी कधी निवडणूक लढविली नाही, ते अनिल परब आणि अनिल देसाई आमचे इंटरव्ह्यू घेतात, असे म्हणत संदीपान भुमेर यांनी शिवसेना नेत्यांवर हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत खैरे गद्दार आहेत, हे टेंभा घेऊन उभे आहेत. कुणी त्याला कुल्फी म्हणते, असे म्हणत भुमरेंनी मशाल चिन्हाची खिल्ली उडवली. तसेच, खरे गद्दार हे आहेत. आम्हीच खरे शिवसैनिक, आम्हीच एकनाथ शिंदे यांना निर्णय घेण्यास तयार केले.साहेबांनी मला फोन तेव्हा आम्ही विचारलंसुद्धा नाही कुठे जायचं आहे. आम्ही बॅगा ही घेतल्या नव्हत्या, बॅग म्हणजे कपड्याची असा किस्सा भुमरेंनी सांगितला, यावेळी एकच हशा पिकला. 

मी तुमच्यातीलच एक असून हात दाखवा गाडी थांबवा असा नेता आहे. उठ म्हटले की उठ, बस म्हटले की बस एवढा गरीब खासदार तुम्हाला भेटणार नाही, असे भुमरे यांनी म्हटले. यावेळी, गुवाहाटीला जाण्याअगोदरचा किस्साही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर सांगितला. जेंव्हा गुजराती भाषेतील बोर्ड दिसला, तेंव्हा आम्हाला कळाले की गुजरातला किंवा सुरतला जायचे आहे, असे भुमरेंनी म्हटले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सॉल्टची जागा कोण घेणार ? हैदराबादविरोधात कोलकात्याची संभाव्य प्लेईंग 11 
सॉल्टची जागा कोण घेणार ? हैदराबादविरोधात कोलकात्याची संभाव्य प्लेईंग 11 
IPL 2024 Playoffs : आरसीबी किती एलिमिनेटर सामने खेळला, काय सांगतात आकडे, यंदा राजस्थानचा अडथळा दूर करणार?
IPL 2024 Playoffs : आरसीबी किती एलिमिनेटर सामने खेळला, काय सांगतात आकडे, यंदा राजस्थानचा अडथळा दूर करणार?
Bhiwandi : बोगस मतदान, मतदारांना धमकावणे... भिवंडीत कपिल पाटील- बाळ्यामामा म्हात्रेंचे आरोप-प्रत्यारोप
बोगस मतदान, मतदारांना धमकावणे... भिवंडीत कपिल पाटील- बाळ्यामामा म्हात्रेंचे आरोप-प्रत्यारोप
IPL 2024 : 17 वर्षांचं स्वप्न पूर्ण होणार, यंदा RCB चषकावर नाव कोरणार, ही घ्या 3 मोठी कारणं 
IPL 2024 : 17 वर्षांचं स्वप्न पूर्ण होणार, यंदा RCB चषकावर नाव कोरणार, ही घ्या 3 मोठी कारणं 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 20 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Voting Misconduct Special Report : राडा, गोंधळ, मनस्ताप...मतदारांचा संताप!Voting issues in Election Mumbai Kalyan : मतदानाची स्लो ट्रेन, आरोपांची एक्सप्रेस! Special ReportLok Sabha Elections 2024 Missing Names Special Report : यादी तयार पण नावच गायब...जबाबदार कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सॉल्टची जागा कोण घेणार ? हैदराबादविरोधात कोलकात्याची संभाव्य प्लेईंग 11 
सॉल्टची जागा कोण घेणार ? हैदराबादविरोधात कोलकात्याची संभाव्य प्लेईंग 11 
IPL 2024 Playoffs : आरसीबी किती एलिमिनेटर सामने खेळला, काय सांगतात आकडे, यंदा राजस्थानचा अडथळा दूर करणार?
IPL 2024 Playoffs : आरसीबी किती एलिमिनेटर सामने खेळला, काय सांगतात आकडे, यंदा राजस्थानचा अडथळा दूर करणार?
Bhiwandi : बोगस मतदान, मतदारांना धमकावणे... भिवंडीत कपिल पाटील- बाळ्यामामा म्हात्रेंचे आरोप-प्रत्यारोप
बोगस मतदान, मतदारांना धमकावणे... भिवंडीत कपिल पाटील- बाळ्यामामा म्हात्रेंचे आरोप-प्रत्यारोप
IPL 2024 : 17 वर्षांचं स्वप्न पूर्ण होणार, यंदा RCB चषकावर नाव कोरणार, ही घ्या 3 मोठी कारणं 
IPL 2024 : 17 वर्षांचं स्वप्न पूर्ण होणार, यंदा RCB चषकावर नाव कोरणार, ही घ्या 3 मोठी कारणं 
पती शिंदे गटात, पुत्र ठाकरे गटात, अमोल किर्तिकर यांच्या मातोश्री म्हणाल्या, शिंदेंना सलाम ठोकणे पटत नाही, माझं मत...
पती शिंदे गटात, पुत्र ठाकरे गटात, अमोल किर्तिकर यांच्या मातोश्री म्हणाल्या, शिंदेंना सलाम ठोकणे पटत नाही, माझं मत...
IND vs PAK : पार्किंग लॉटमध्ये होणार भारत-पाकिस्तान सामना, विश्वचषकासाठी मैदान सज्ज
IND vs PAK : पार्किंग लॉटमध्ये होणार भारत-पाकिस्तान सामना, विश्वचषकासाठी मैदान सज्ज
IPL 2024 Final: चेन्नईमध्ये IPL फायनलचा थरार, तिकिटांची विक्री सुरु, सर्वात स्वस्त तिकिट किती रुपयांचं?  
IPL 2024 Final: चेन्नईमध्ये IPL फायनलचा थरार, तिकिटांची विक्री सुरु, सर्वात स्वस्त तिकिट किती रुपयांचं?  
Cyber Crime : तब्बल 18 लाखांहून अधिक सिम बंद होणार, सायबर गुन्ह्यांवरील नियंत्रणासाठी सरकारचं मोठं पाऊल
Cyber Crime : तब्बल 18 लाखांहून अधिक सिम बंद होणार, सायबर गुन्ह्यांवरील नियंत्रणासाठी सरकारचं मोठं पाऊल
Embed widget