एक्स्प्लोर

Video : ''खोटा नेरेटीव्ह पसरवणाऱ्यांची बोलती बंद''; वारकऱ्यांना शुभेच्छा, मविआवर निशाणा, मोदींचे मुंबईतील संपूर्ण भाषण

महाराष्ट्राच्या सर्व बंधु-भगिनींना माझा नमस्कार म्हणत पंतप्रधानांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. मुंबईत आज 30 हजार कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन व लोकार्पण करण्याची संधी मिळाली आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) पहिल्यांदाच महाराष्ट्रात आणि विशेषत: मुंबईत आले होते. मुंबईतील (Mumbai) पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्प (तिसरा टप्पा) अंतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळा बोगद्याच्या कामाचे भूमिपूजन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. गोरेगाव येथील नेस्को एक्झिबिशन सेंटर येथे हा सोहळा पार पडत असून तब्बल 30 हजार कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन मोदींच्याहस्ते झालं. या उद्घाटन आणि लोकार्पण सोहळ्यानंतर भाषण करातना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारकडून होत असलेल्या योजनांची माहिती देण्यात आली. तसेच, महाविकास आघाडीच्या (Mahavikas aghadi) खोट्या नेरेटीव्हवरही मोदींनी हल्लाबोल केला. तर, पंढरपूरच्या वारकऱ्यांना शुभेच्छा देत पंढरीच्या विठ्ठलाला प्रणाम करतो, असेही म्हटले. 

महाराष्ट्राच्या सर्व बंधु-भगिनींना माझा नमस्कार म्हणत पंतप्रधानांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. मुंबईत आज 30 हजार कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन व लोकार्पण करण्याची संधी मिळाली आहे. या प्रकल्पातून मुंबई व नजीकच्या क्षेत्रातील कनेक्टीव्हीटी चांगली होईल. या रोड व रेल्वे प्रकल्पांसह महाराष्ट्रातील तरुणांसाठीच्या कौशल्य विकासाची योजना आहे. या योजनेतून महाराष्ट्रात मोठ्या संख्येने रोजगार निर्मिती होईल, दोन ते तीन आठवड्यांपूर्वी केंद्र सरकारने वाढवण बंदराला देखील मंजुरी दिली. तब्बल 76 हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पामुळे 10 लाख रोजगारां निर्मिती होईल, असे मोदींनी म्हटले. 

मुंबईला आर्थिक राजधानी बनवायची आहे. 

गेल्या एका महिन्यात मुंबई ही देश व विदेशातील गुंतवणूकदारांची साक्षीदार राहिली आहे, आमच्या सरकारच्या तिसऱ्या टर्मचे गुंतवणूकदारांनी स्वागत केले आहे. लोकांना माहिती आहे, एनडीए सरकारच स्थिरता देऊ शकते, मी तिसऱ्यांदा शपथ घेतली तेव्हा सांगितले होते. आम्ही तिप्पट वेगाने काम करु, आज आपण हे होताना पाहत आहोत. महाराष्ट्राजवळ गौरवशाली इतिहास आहे, महाराष्ट्रात सशक्त वर्तमान आहे, आणि महाराष्ट्राजवळ समृद्ध विकासाचे स्वप्न आहे. महाराष्ट्राचा विकसित भारतात मोठा वाटा आहे, महाराष्ट्रात उद्योग, शेती, फायनान्स सेक्टरची पॉवर आहे. म्हणून मुंबई ही पॉवर हब आहे, महाराष्ट्राला जगाचे सर्वात मोठे आर्थिक पॉवर हाऊस तयार करायचे आहे, मुंबईला जगाचे फिनटेक कॅपिटल करण्याचे माझे स्वप्न आहे, असे म्हणत मोदींनी मुंबईला जगाची आर्थिक राजधानी बनवण्याचे स्वप्न बाळगल्याचे म्हटले. 

विकसित भारतात मुंबईकरांचा मोठा वाटा असेल

छत्रपतींचे किल्ले हे शौर्याचे साक्षीदार आहेत, येथे मेडिकल टुरिझमला संधी आहे. महाराष्ट्र ही विकासाची नवी गाथा लिहिणार आहे, आपण याचे सहयात्री असून आजचे प्रकल्प हे त्याचेच प्रतिक आहेत. 25 वर्षे या शतकाचे उलटले असून वेगाने विकास होण्याची लोकांची अपेक्षा आहे. पुढील 25 वर्षांत लोकांना देशाला विकसित झालेले पाहायचे आहे. त्यामध्ये मुंबईकरांचा वाटा मोठा असेल, येथील लोकांचे आयुष्यमान चांगले असावे, हा आमचा प्रयत्न आहे. म्हणून मुंबईकरांसाठी पायाभूत सुविधा देत आहेत, कोस्टल अटल सेतू आता पूर्ण झाले आहेत. जेव्हा अटल सेतू तयार होत होता, तेव्हा विरोधात गोष्टी बोलल्या गेल्या, काम थांबवण्याचे अनेक प्रयत्न झाले. पण, या अटल सेतूचे किती फायदे होत आहेत, हे दिसतंय. दररोज 20 हजार गाड्या रोड या सेतूवर प्रवास करत आहेत. 20 ते 25 लाख रुपयांचे इंधन दररोज वाचत आहे. तर, पनवेलला जाण्यासाठी केवळ 45 मिनिटांचा कालवधी लागत आहे. म्हणजे वेळेची व पर्यावरणाची बचत होतेय, याच प्रकारे मुंबईची वाहतूक व्यवस्था आधुनिक करत आहोत, मेट्रोचाही विस्तार वेगाने होतोय, असे मोदींनी म्हटले. 

मेट्रोचे जाळे वाढले

मुंबईत 10 वर्षापूर्वी फक्त 8 किलोमीटर मेट्रो लाईन होती, आज ती 80 किलोमीटर झाली आहे. मुंबईत जवळपास 200 किलोमीटर मेट्रो नेटवर्कवर काम होतंय. आज भारतीय रेल्वेचा जो कायाकल्प होतोय, त्याचा मुंबई व महाराष्ट्राला फायदा होतोय. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल व नागपूर रिडिव्हेलपमेंट वेगाने काम प्रगतीपथावर आहे. लोकमान्य टिळक टर्मिनसवर नव्या फलाटाचे लोकार्पण झाले, त्यामुळे 24 कोच असलेली रेल्वे याठिकाणी धावू शकेल. महाराष्ट्रात राष्ट्रीय महामार्गाची संख्या तिप्पटीने वाढली आहे. बोरिवली ठाणे ट्विन टनल हा प्रगती व प्रकृती यांची सांगड घालण्याचं हे चांगले उदाहरण आहे. 

वारकऱ्यांना मराठीतून शुभेच्छा

एनडीए सरकारचे प्रयत्न आहेत की, तीर्थक्षेत्रांचा विकास झाला पाहिजे, सुविधा वाढल्या पाहिजे. आज पंढरपूर वारीत लाखो वारकरी भक्तीभावाने सामील झाले आहेत. पुणे ते पंढरपूर हा प्रवास सुकर व्हावा, यासाठीची काळजी सरकार घेत आहे. संत ज्ञानेश्वर व तुकाराम महाराज पालखी मार्गाचे काम सुरू असून लवकरच हे मार्ग वारकऱ्यांसाठी खुले केले जातील, असे मोदींनी म्हटले. यावेळी, मराठीत वारकऱ्यांना शुभेच्छाही दिल्या. सर्व वारकऱ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो, आणि पंढरीच्या विठ्ठलाला प्रणाम करतो, असे मोदींनी म्हटले. 

महाविकास आघाडीवर मोदींचा निशाणा 

महाराष्ट्रात महायुतीचे सरकार काम करत आहे, मला आनंद आहे की, महाराष्ट्र सरकारने प्रत्येक वर्षी 10 लाख तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देण्याचा संकल्प केला आहे. या प्रशिक्षणादरम्यान शिष्यवृत्ती दिली जाणार आहे, कौशल्य विकास प्रशिक्षण ही आपली जरूरत आहे. गेल्या चार ते पाच वर्षांत कोरोनासारख्या संकटानंतर भारतात रेकॉर्ड ब्रेक रोजगार निर्मिती झाली आहे. आरबीआयच्या रिपोर्टरनुसार देशात 8 कोटी नवे रोजगार मिळाले आहेत. खोटा नरेटीव्ह पसरवू पाहणाऱ्यांची या आकड्यांमुळे बोलती बंद झाली आहे. हे विरोधक देशाच्या विरोधात आहेत, त्यांची निती विकासाविरोधात आहे. पण त्यांची पोलखोल होत आहे, लोक त्यांना नाकारत आहेत. जेव्हा कुठे पूल, रेल्वे ट्रॅक, रस्ता बनतो, तर कुणाला ना कुणाला रोजगार मिळतोच. जसे पायाभूत सुविधा तयार होण्याचा वेग वाढतोय, तसे रोजगार वाढत आहेत. येत्या काळात गुंतवणूक वाढीमुळे या संधी वाढणार आहेत, असेही मोदींनी म्हटले. 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नागाने काढला फणा, 3 मुंगसांनी घातली झडप; विमानतळावरील झुंज, व्हिडिओ व्हायरल
नागाने काढला फणा, 3 मुंगसांनी घातली झडप; विमानतळावरील झुंज, व्हिडिओ व्हायरल
Manoj Jarange : 'छगन भुजबळ पागल झालेत', मनोज जरांगेंचा पुन्हा हल्लाबोल, शरद पवारांच्या भूमिकेवरही रोखठोक वक्तव्य!
'छगन भुजबळ पागल झालेत', मनोज जरांगेंचा पुन्हा हल्लाबोल, शरद पवारांच्या भूमिकेवरही रोखठोक वक्तव्य!
Ravi Rana : 'लाडकी बहीण'बाबत पैसे काढून घेण्याचं ते वक्तव्य गंमतीने केलं होतं, रवी राणांचे स्पष्टीकरण
'लाडकी बहीण'बाबत पैसे काढून घेण्याचं ते वक्तव्य गंमतीने केलं होतं, रवी राणांचे स्पष्टीकरण
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2024 | सोमवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sambhajiraje Chhatrapati..तर तुम्हाला जबाबदार धरणार,भर बैठकीत संभाजीराजेंचा Hasan Mushrifयांना इशाराKirit Somaiya Mumbai : अदानी आणि माधवी बुच यांची एकत्र गुंतवणूक, सोमय्या काय म्हणाले?Nagpur Tiranga Bike Rally : नागपूरमध्ये तिरंगा बाईक रॅली, मनपा, अग्निशमन दलाचे जवान सहभागीABP Majha Headlines : 5 PM : 12 August 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नागाने काढला फणा, 3 मुंगसांनी घातली झडप; विमानतळावरील झुंज, व्हिडिओ व्हायरल
नागाने काढला फणा, 3 मुंगसांनी घातली झडप; विमानतळावरील झुंज, व्हिडिओ व्हायरल
Manoj Jarange : 'छगन भुजबळ पागल झालेत', मनोज जरांगेंचा पुन्हा हल्लाबोल, शरद पवारांच्या भूमिकेवरही रोखठोक वक्तव्य!
'छगन भुजबळ पागल झालेत', मनोज जरांगेंचा पुन्हा हल्लाबोल, शरद पवारांच्या भूमिकेवरही रोखठोक वक्तव्य!
Ravi Rana : 'लाडकी बहीण'बाबत पैसे काढून घेण्याचं ते वक्तव्य गंमतीने केलं होतं, रवी राणांचे स्पष्टीकरण
'लाडकी बहीण'बाबत पैसे काढून घेण्याचं ते वक्तव्य गंमतीने केलं होतं, रवी राणांचे स्पष्टीकरण
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2024 | सोमवार
जगातील सर्वाधिक कर्जबाजारी देशांची यादी समोर, पहिल्या चारमध्ये कोणते देश? भारतावर किती कर्ज?
जगातील सर्वाधिक कर्जबाजारी देश कोणते? पहिलं नाव वाचून धक्का बसेल, भारतावर किती कर्ज?
'..मग तोही दिवस स्वातंत्र्य दिवस मानायचा का?'अशोक चव्हाण यांचे नाना पटोलेंना जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले, 'नाना आत्मस्तुतीत मग्न राहणारे नेते..'
'..मग तोही दिवस स्वातंत्र्य दिवस मानायचा का?'अशोक चव्हाण यांचे नाना पटोलेंना जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले, 'नाना आत्मस्तुतीत मग्न राहणारे नेते..'
'आम्हाला डिवचू नका, सुरुवात तुम्ही केली तर शेवट आम्ही करणार'; राज ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्याआधी मनसेचा थेट इशारा
'आम्हाला डिवचू नका, सुरुवात तुम्ही केली तर शेवट आम्ही करणार'; राज ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्याआधी मनसेचा थेट इशारा
Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीचा उद्या नाशकात समारोप, सीबीएस येथे जंगी सभा, वाहतूक मार्गात मोठे बदल, पर्यायी रस्ते कुठले?
मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीचा उद्या नाशकात समारोप, सीबीएस येथे जंगी सभा, वाहतूक मार्गात मोठे बदल, पर्यायी रस्ते कुठले?
Embed widget