Narayan Rane, सिंधुदुर्ग : "दिशा सालियन प्रकरणावेळी मिलींद नार्वेकरांनी उद्धव ठाकरेंना फोन लावून दिला होता. मला म्हणाले, आदित्यला सांभाळून घ्या तुम्हालाही दोन मुलं आहेत. मग मी सांगितलं तुमच्या मुलाला असं संध्याकाळी सातनंतर सोडू नका", असा दावा रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी केलाय. ते सिंधुदुर्गमधील (Sindhudurg) पत्रकार परिषदेत बोलत होते.
आपटे कायम स्वरूपी वॉन्टेड राहू शकतो का? त्याला अटक करावी लागेल
नारायण राणे म्हणाले, विरोधकांना दुसरं काय येत. जोडो मारो आंदोलन करणारे पुतळा उभारल्यानंतर आठ महिन्यात एकदा तरी नतमस्तक होण्यासाठी आले का?
हे सगळं झाल्यानंतर डोकं आपटून घेत आहेत. आपटे कायम स्वरूपी वॉन्टेड राहू शकतो का? त्याला अटक करावी लागेल. त्याने माहिती दिल्याशिवाय बांधकाम कुठल्या दर्जाचं होतं? त्याच्यामध्ये काय दोष होता? तेव्हाच कळणार तुम्ही थोडा वेळ थांबा. विरोधकांना घाई लागली त्यापेक्षा पत्रकारांना जास्त घाई लागली आहे. थोडा वेळ थांबा काहीतरी अडचणी असू शकतात. मी एक विनंती करतो, पुतळा कोसळल्यानंतर किती दिवस झाले? आता दुसरे विषय घ्या जे लोकांच्या उपयोगी आहेत. पुतळा उभारला जाणार महाराजांचा कोणी काही केलं तरी पुतळा उभारला जाणार आणि दर्जेदार बनवणार आहे.
तू विरोधी पक्ष नेता आहेस, माझा चेला असे प्रश्न विचारतो याच दुःख मला वाटतं
नारायण राणे वडेट्टीवार यांच्याबाबत बोलताना म्हणाले, काय बोलणार विजय वडेट्टीवारला, फक्त नावात विजय आहे. मात्र शब्द उच्चारतात त्यात पराभव दिसतो. कशाला लपवून ठेवणार आपटेला? तुला सर्व मिळणार माहिती, तू विरोधी पक्ष नेता आहेस. माझा चेला असे प्रश्न विचारतो याच दुःख मला वाटतं, असंही राणे यांनी सांगितलं.
पुढे बोलताना नारायण राणे म्हणाले, शरद पवार एक-दोन दिवसानंतर एक-दोन स्टेप मागे पुढे जातात. आज बोलतील ते उद्या असेलच असं नाही. निवडणूकीच्या वेळेला काय बोलतील ते कोणी सांगू शकत नाही. तीन-चार वर्षांपूर्वी मी रेल्वे मंत्र्यांना पत्र लिहिलं होतं की वैभववाडीतून कोल्हापूर रेल्वे मार्ग झाल्यास इथल्या विकासाला चालना मिळेल. दळणवळणासाठी इकडचा माल कोल्हापूरला पाठविण्यासाठी सोपं जाईल. त्यासाठी ती लाईन आवश्यक आहे, त्यावर ते म्हणाले राणेजी मै करता हूं.
इतर महत्वाच्या बातम्या
Dhananjay Munde : साडेबारा कोटी जनतेला थेट लाभ देणारे सरकार घालवायचे का?; शरद पवारांच्या टीकेवर मुंडेंचा सवाल