Ashok Chavan on Nana Patole: राज्यात विधानसभा निवडणुकांच्या (Vidhansabha eletion) तोंडावर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि भाजप खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. अशोक चव्हाण यांच्या भाजप पक्षप्रवेशामुळे नांदेडला स्वातंत्र्य मिळाल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली होती. यावरून अशोक चव्हाण यांनी नाना पटोले यांना चांगलंच सुनावल आहे. नाना पटोले आत्मस्तुतीत मग्न असणाऱ्या नेते आहे असं म्हणत त्यांनी काँग्रेस- भाजप- काँग्रेस असा नाना पटोले यांचा राजकीय प्रवास उलगडून दाखवला.
माझा भाजप प्रवेश हे दुसरं स्वातंत्र्य असेल तर 25 जुलै 2009 रोजी नानांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. तो दिवस साकोली मतदारसंघाचा स्वातंत्र्य दिवस मानायचा का असा सवाल भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी केला. 11 जानेवारी 2018 ला भाजप सोडून पुन्हा काँग्रेसमध्ये गेले. मी प्रदेशाध्यक्ष असल्याने ह्या गोष्टी जवळून पाहिल्या आहेत. हा दिवस साकोली मतदारसंघासाठी पारतंत्र्याचा झाला का? ते गेले आणि परत स्वगृही परत आले. असे चव्हाण म्हणाले.यावेळी काँग्रेस सोडल्याच्या दिवशीचा पेपर वाचून दाखवत अशोक चव्हाण यांनी नाना पटोले यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
काँग्रेस सोडताना केलेल्या आरोपांवर आता तुमची भूमिका काय?
काँग्रेसने ओबीसी आणि शेतकऱ्यांची निराशा केल्याची टीका करत काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेले होते. त्यांची हीच भूमिका आज कायम आहे का? असा सवाल अशोक चव्हाण यांनी केला. आता तुम्ही काँग्रेसमध्ये आहात तुमची याविषयी भूमिका काय याचा खुलासा करावा असं चव्हाण म्हणाले. ते काँग्रेसमध्ये केव्हा आले हे फार सोयीने विसरतात.
नाना पटोले आत्मस्तूतीत मग्न
नाना पटोले आत्मस्तुतीत मग्न राहणारे नेते आहेत. जे काही पक्षात घडलं ते माझ्यामुळे झाला असं त्यांना वाटतं. लोकसभेत त्यांना जानपेक्षित यश मिळालं तो केवळ अपघात होता. गैरसमज आणि अपप्रचार यातून नानांना लॉटरी लागली आहे. हे त्यांचे व्यक्तिगत यश असल्याचा गैरसमज आहे. नांदेड महानगरपालिकेत एकाहाती सत्ता आणला होता. एकेकाळी विधानसभेत नऊच्या नऊ जागा काँग्रेस-राष्ट्रवादीचा निवडून आणलेल्या आहेत. यांनी स्वतःच्या काळात किती जागा निवडून आणल्या? तुमच्या परफॉर्मन्सकडे तुम्हीच लक्ष द्यायला पाहिजे असेही ते म्हणाले.
काँग्रेसच्या गटबाजीमुळे चांगली माणंसं बाहेर फेकली गेली
नाना पाटोले यांचा कधीच राजकारण होऊ शकलं नाही. काँग्रेसमध्ये असताना बंद खोलीमध्ये ते बोलत होते. आता चार चौघात बोलायची संधी ते त्यांनी सोडली नाही. यात काहीही नवीन नाही. अशा पद्धतीने आपला सहकार्यांविषयी लूज टॉक करण्याचं काम ते करत आहेत. आता तर त्यांना उघडपणे संधीच मिळाली. काँग्रेस मधून जी चांगली माणसं बाहेर फेकली गेली ती काँग्रेस मधल्या गटबाजीमुळे फेकली गेली असं अशोक चव्हाण म्हणाले. यांना फक्त यांच्या जवळचेच लोक पाहिजेत.
हेही वाचा: