Nana Patole on Ashok Chavan : 24 फेब्रुवारीला नांदेडला (Nanded) स्वातंत्र्य मिळालं, असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजप खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्यावर निशाणा साधला. 24 फेब्रुवारी रोजी अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला होता, त्यावरुन नाना पटोले यांनी टीका केली. मागच्या लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) मराठवाड्यात काँग्रेसची एकही जागा नव्हती, पण आता तीनही जागा निवडून आल्या, म्हणजे 100 टक्के परफॉर्मन्स असल्याचे पटोले म्हणाले. जो लॅक्युना होता तो भाजपने नेला, त्यामुळं भाजपाचे धन्यवाद असेही पटोले म्हणाले.


मुख्यमंत्री पदाचा महाविकास आघाडीचा चेहरा कोण?


मुख्यमंत्री पदाचा महाविकास आघाडीचा चेहरा कोण? या प्रश्नावर नाना पटोले यांनी त्यांचा चेहरा कोण असा प्रतीसवाल केला. आपले ठेवावे झाकून आणि दुसऱ्याचे सांगावे असा हा प्रकार असल्याचे पटोले म्हणाले.


समृद्धी महामार्गात भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई करणार


शक्तिपीठ महामार्गाला काँग्रेसचा विरोध असल्याचे नाना पटोले म्हणाले. आमचं सरकार आल्यावर समृद्धी महामार्गात भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याची प्रतिक्रिया नाना पटोले यांनी  दिली. समृद्धी महामार्गामुळं यांची समृद्धी झाली आणि लोकांचे नुकसान झाले. आमचं सरकार आल्यावर श्वेतपत्रिका जाहीर करणार आहे. ज्यांनी भ्रष्टाचार केला, महामार्गालगत जमिनी घेतल्या आणि सरकारच्या पैशांची लूट केली त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे नाना पटोले म्हणाले.


महत्वाच्या बातम्या:


अशोक चव्हाणांच्या पत्नी आणि मुलीला मराठा समाजाचा घेराव; आरक्षण दिल्यानंतरच गावात पाय ठेवा, आंदोलकांचा इशारा