Maharashtra Politics अमरावती :

  महायुती (Mahayuti) सरकारनं अर्थसंकल्प (Budget 2024) सादर करताना राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) सुरूवात केली. सध्या राज्यभरात या एकाच सरकारी योजनेचं नाव चर्चेत आहे. सरकारने ही योजना जाहीर केल्यापासून महिलांचा या योजनेला प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळतोय. तर दुसरीकडे विरोधक यावर टीका देखील करताना दिसताय. अशातच या योजनेवरुन अमरावतीतील आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी एक धक्कादायक वक्तव्य वक्तव्य केलं आहे.


....नाहीतर दीड हजारही काढून घेऊ! 


आमचं सरकार आल्यावर लाडकी बहिण योजनेचे 1500 रुपयेचे हे आम्ही दुप्पट म्हणजे 3 हजार रुपये करू,  तर आता त्यासाठी मला तुमचा आशीर्वाद हवा आहे. मात्र, ज्यांनी मला आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ म्हणून ते 1500 रुपये तुमच्या खात्यातून वापस घेणार, असे धक्कादायक वक्तव्य रवी राणांनी केलंय. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे प्रमानपत्र वितरण सोहळा आज अमरावतीत आमदार रवी राणा यांनी घेतला होता. या कार्यक्रमात हजारो महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमात आमदार रवी राणा यांनी हे  धक्कादायक वक्तव्य केलंय. ज्याचं खाल्लं त्याचं जागलं पाहिजे. सरकार देत राहते, पण सरकारला आशीर्वादही दिला पाहिजे असं मतही रवी राणा यावेळी बोलतांना मांडले आहे.


लाडकी बहीण योजनेचे पैसे नेमके कधी येणार?


मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा झाल्यापासूनच राज्यभरातील महिलांनी योजनेचा अर्ज भरण्यासाठी गर्दी केली होती. अशातच आता राज्यातील (Maharashtra News) महिलांना लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता खात्यात कधी येणार, याची आतुरता लागली आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी येत्या 17 तारखेला राज्यातील महिलांच्या खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हफ्ता जमा होणार असल्याचं सांगितलं. तसेच, जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे एकत्रच खात्यात जमा होणार आहे, असंदेखील सांगितलं. पण, आज अजित पवारांनी (Ajit Pawar) मालेगावात बोलताना लाडकी बहीण योजनेचे पैसे भाऊबीजेला महिलांच्या खात्यात जमा होतील, असं म्हटलं. अजित पवारांच्या वक्तव्यानं काही काळासाठी संभ्रम निर्माण झाला. पण, काही क्षणातच अजित पवारांना जाणीव झाली आणि त्यांनी लगेचच 17 ऑगस्टला महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील, असं सांगितलं. 


हेही वाचा