Nagpur News : नागपूर जिल्हा परिषदेत चार सभापती पदासाठी निवडणूक होणार आहे. गेल्या वेळी पाच महिला पदाधिकारी होत्या. अध्यक्ष आणि उपाध्यक्षही महिला आहे. महिला पदाधिकाऱ्यांची संख्या जास्त असल्याने पुरुष सदस्यांमध्ये नाराजी असून सभापती पदांवर तीन पुरुषांची वर्णी लावत तीन-तीनचा फॉर्म्युला वापरावा, असा सूर सदस्यांचा आहे.
नागपूर जिल्हा परिषदेत (ZP) गेल्या वेळी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष महिला होत्या. यावेळीही महिलांवरच जबाबदारी टाकण्यात आली आहे. तर चारपैकी तीन सभापती महिला आहेत. शिवाय सत्ताधारी पक्षनेत्याची जबाबदारीही महिला सदस्याकडे आहे. आता चार सभापती पदांसाठी 1 नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे. चारपैकी तीन पदांवर महिला आहेत. महिला व बाल कल्याण सभापती पदावर महिला सदस्यांची नियुक्ती करणे बंधनकारक आहे. सध्या हे पद राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे (NCP) असून उज्ज्वला बोढारे सभापती आहेत. तर शिक्षण व अर्थ सभापतीपदी भारती पाटील आणि समाज कल्याण सभापती नेमावली माटे आहेत.
कृषी व पशुसंवर्धन पदावर एकमेव पुरुष सदस्य तापेश्वर वैद्य आहेत. तर सत्तापक्ष नेतेपद अवंतिका लेकुरवाळे यांच्याकडे आहे. सत्ता पक्ष नेते म्हणून त्या अपयशी ठरल्याची टीका होत आहे. सदस्यांमध्ये नाराजी असताना याची साधी माहिती त्यांना नव्हती. सदस्यांच्या संपर्कात नसल्याने त्यांना कोणतीही माहिती नसल्याची टीका झाली. पदावर महिला सदस्य असल्या तरी कारभार दुसऱ्याच्या हाती होता, असे सदस्य सांगतात. महिला सभापती फारसा प्रभाव टाकू शकल्या नाही.
उर्वरित पदे तरी पुरुष सदस्यांना द्या!
एक महिला सभापतीमुळे जिल्हा परिषदेवर नामुष्कीही ओढवली. सर्वाधिक तक्रारी त्यांच्या होत्या. सध्या दोन महिला पदाधिकारी असून एक पदाधिकारी महिला होणार आहे. त्यामुळे उर्वरित तीन पदावर पुरुष सदस्याची नियुक्ती करण्याचा सूर आहे. सत्ताधारी सदस्यांमधील नाराजी अध्यक्ष आणि उपाध्यक्षाच्या निवडणुकीत दिसून आली. सभापती पदांवर पुरुषांची नियुक्ती न झाल्यास सदस्यांमधील नाराजीत अधिक भर पडणार असल्याची स्थिती आहे.
महत्त्वाची बातमी